Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा यशराज फिल्म्सचा आणखी एक स्पाय चित्रपट ‘वॉर २’ (War 2) लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी ‘वॉर २’ चा धमाकेदार टीझर आज म्हणजेच २० मे रोजी प्रदर्शित झाला आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे ‘वॉर २’ च्या निमित्ताने ज्युनिअर एन.टी.आरने (Jr NTR) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून आजचं त्याचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे ह्रतिक रोशनने (Hrithik Roshan) एन.टी.आरला टीझर स्वरुपात वाढदिवसाचं गिफ्ट दिलं असं म्हणण्यास हरकत नाही. दरम्यान, दोन सुपरस्टार असलेल्या या ‘वॉर २’ च्या टीझरमध्ये नेमकं आहे तरी काय जाणून घेऊयात…(Bollywood movies)

अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर २ च्या टीझरची सुरुवात ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर यांच्या इंट्रोडक्शनने होते. ह्रतिक (कबीर) चित्रपटात स्पाय एजंट आणि सैनिक दाखवला असून ज्युनिअर एन.टी.आर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.याशिवाय कियारा अडवाणीचा (Kiara Advani) बोल्ड लूकही प्रेक्षकांचं लक्ष नक्कीच वेधून घेतं. आता नेमकं या स्पाय चित्रपटात तिची काय भूमिका आहे हे लवकरच उलगडेल. तसेच, यशराज फिल्म्सच्या स्पाय चित्रपटांची खासियत असणारे अॅक्शन सीन्सही उत्सुकता अधिक वाढवणारे आहेत. पण ज्युनिअर एन.टी.आरचा डेब्यू हिंदी चित्रपट ‘वॉर २’ प्रेक्षकांना नक्कीच चक्रावून सोडणार यात वादच नाही. (Bollywood spy movies)
तसेच, यशराज फिल्म्सच्या (YashRaj Films) स्पाय युनिवर्समधील ‘वॉर २’ हा सहावा चित्रपट आहे. यापूर्वी ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger), ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’, आणि ‘टायगर ३’ (Tiger 3) आत्तापर्यंत रिलीज झाल्या आहेत. तर, लवकरच पहिला फिमेल स्पाय चित्रपट ‘अल्फा’ (Alpha) भेटीला येणार असून यात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. (War 2 teaser release)
================================
हे देखील वाचा: Jr NTR : ‘सारा त्रास क्षणात…’; ‘नातु नातु’च्या ऑस्कर विजयावर NTRची भावनिक प्रतिक्रिया
=================================
दरम्यान, २०१९ मध्ये आलेल्या’ वॉर’ चित्रपटाचा ‘वॉर २’ (War 2) हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात ह्रतिक रोशन, वाणी कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता दुसऱ्या भागात ज्युनिअर एन.टी.आर आणि कियारा अडवाणीची एन्ट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘वॉर २’ चित्रपटाचं बजेट २०० कोटींचं असून या चित्रपटासाठी ह्रतिकने ४८ कोटी, ज्युनिअर एन.टी.आर ने ३० कोटी तर कियाराने १५ कोटी मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. आता इतर बिग बजेट फिल्म्सच्या रांगेत War 2 कोणतं स्थान पटकावतो आणि ज्युनिअर एन.टी.आर चं बॉलिवूड पदार्पण किती यशस्वी ठरतं यासाठी १४ ऑगस्ट २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे. (bollywood movies box office collection)