Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Hum Aapke Hain Koun..! ३१ वर्षांचा झाला….
नव्वदच्या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा ब्लॉक बस्टर ‘हम आपके है कौन‘ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ प्रदर्शित झाला . आज हा सिनेमा प्रदर्शित होवून ३० वर्ष पूर्ण होत आहेत. जाणून घेऊयात त्याच्या मेकिंगची गोष्ट. भारतीय परंपरेला साजेशी अशी संगीतमय प्रेम कथा यामध्ये गुंफली होती. या चित्रपटात भारताच्या उच्च नीतिमूल्यांचा, संस्कारांचा आणि त्यागाचा मोठा उपयोग करून घेण्यात आला होता. हा चित्रपट म्हणजे लग्नाची व्हिडीओ कॅसेट अशी संभावना देखील करण्यात आली.

भारतीय संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याला अतिशय मोठे असे महत्त्व आहे आणि या सोहळ्यातील प्रत्येक क्षणाचे मोठ्या कलात्मक पद्धतीने चित्रीकरण केल्याने या चित्रपटाला ग्लोबल लेव्हल वर देखील मोठे यश प्राप्त झाले. वस्तुतः राजश्रीचा हा चित्रपट म्हणजे त्यांच्या पूर्वीच्या ‘नदिया के पार’ या चित्रपटाचा रिमेक होता या चित्रपटाने आजवर दोन बिल्लियन म्हणजेच २०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि सर्वाधिक उत्पन्न कमावणारा चित्रपट म्हणून याची गणना झाली. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या व्यवसायाची गणिते पूर्ण बदलून टाकली.

सेक्स आणि हिंसाचार टाळून जर चित्रपट व्यवस्थित वितरित केला तर त्याला मोठे यश लाभू शकते हा आशावाद चित्रपट सृष्टीत निर्माण झाला . ‘द बिगेस्ट ब्लॉकबस्टर ऑफ द इरा’ हा किताब या चित्रपटाने प्राप्त केला. यात तब्बल चौदा गाणी होते त्याकाळच्या चित्रपटाच्या ट्रेंडनुसार हि संख्या खूप मोठी होती. हा चित्रपट तेलगू भाषेमध्ये ‘प्रेमालयम’ या नावाने डब झाला व त्या चित्रपटाने देखील मोठा व्यवसाय केला. यातील १४ गाण्यांपैकी तब्बल ११ गाण्यात सूरश्री लता मंगेशकर यांचा स्वर होता हा देखील विक्रम म्हणावा लागेल! पाच फिल्मफेअर अवॉर्ड तसेच राष्ट्रीय पुरस्कारावर चित्रपटाने आपली मोहर उमटवली. चित्रपटाचा समाज जीवना वरील प्रभाव मोठा असतो. या सिनेमाच्या अभूतपूर्व अशा यशाने भारतीय समाजातील विवाह सोहळ्यामध्ये अमुलाग्र असे बदल झाले . विवाह आणखी डिटेल आणि देखणे होवू लागले!
================================
हे देखील वाचा: जेव्हा माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर पुणे स्टेशनवर बुरखा घालून अवतरले!
=================================
चित्रपटाचे कथानक ‘नदिया के पार’चेच असले तरी त्यात अनेक बदल सुचवले गेले. प्रेम (सलमान खान) आणि त्याचा मोठा भाऊ राजेश (मोहनिष बहल) आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या काकांकडे म्हणजेच कैलाशनाथ (अलोकनाथ) कडे राहत असतात. राजेश हा कौटुंबिक व्यवसाय सांभाळत असतो. प्राध्यापक सिद्धार्थ चौधरी (अनुपम खेर) हे काशिनाथचे जुने मित्र असतात त्यांची पत्नी मिसेस चौधरी (रीमा लागू) आणि त्यांच्या दोन मुली पूजा (रेणुका शहाणे) आणि निशा (माधुरी दीक्षित) हे नागपूरला राहत असतात. खूप वर्षानंतर जेव्हा दोन जुन्या मित्रांची भेट होती त्यावेळेला सिद्धार्थ चौधरी यांची मोठी मुलगी निशा हिचे लग्न कैलाशनाथ यांचा मोठा मुलगा राजेश सोबत करण्याचे ठरते. या लग्नाच्या पार्श्वभूमीवरच निशा आणि प्रेम यांची ‘आंख मिचौली’ सुरू होते! संपूर्ण लग्न समारंभ मध्ये या दोघांच्या खोड्या, एकमेकांची खेचाखेची असा रोमॅण्टिक माहोल असतो.

प्रेमला आपल्या निशा भाभीचं खूप कौतुक असते. लग्नानंतरचा उत्सवी उत्साहाचा कालखंड चालू असतो त्यातच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल लागते पुन्हा घरात त्याचे सेलिब्रेशन्स सुरू होतात. या सर्व आनंदमय क्षणांमध्ये निशा आणि प्रेम यांच्यात प्रेम फुलू लागते. पूजाचा अपवाद वगळता यांच्या प्रेमाची आणखी कुणाला जाणीव नसते. पूजाच्या बाळाच्या जन्माच्या वेळी निशा तिथे आवर्जून उपस्थित असते. बाळाचा जन्म कुटुंबासाठी आणखी मोठा आनंद सोहळा असतो. निशा आणि प्रेम यांच्यातील मधुर संबंध आणखी गहिरे झालेले असतात. पण त्याचवेळी एक अकल्पित,अघटित अशी दुर्दैवी घटना घडते . पूजा जिन्यावरून पाय घसरून खाली पडते आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू होतो.

घरातील आनंदाचे वातावरण क्षणार्धात बदलले जाते . पूजाच्या अकाली जाण्याने बाळाची काळजी कोण घेणार हा प्रश्न निर्माण होतो. सर्वानुमते निशाने ही जबाबदारी घ्यावी असे ठरते आणि निशाने राजेश सोबत लग्न करावे असा विचार पुढे येतो. निशा आणि प्रेम दोघे या निर्णयाने हादरून जातात. पण प्रसंगच तसा बाका असतो की त्यांना आपल्या भावना मुक्तपणे व्यक्तही करता येत नाहीत .बाळाच्या भवितव्यासाठी निशा आणि प्रेम आपल्या प्रेमाचा बळी द्यायला तयार होतात. त्यांच्या मते बाळ ही त्यांची टॉप मोस्ट प्रायॉरिटी आहे. पण शेवटी विजय खऱ्या प्रेमाचा होतो . अशा काही घटना घडतात ज्यामुळे निशा आणि प्रेम एकत्र येतात!

या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सूरज बडजात्या यांना तब्बल एक वर्ष नऊ महिने हा कालावधी चित्रपटाची कथा लिहिण्यामध्ये लागला. ‘नदिया के पार’ चा रिमेक जरी असला तरी त्याला मॉडर्न लूक देण्यात आला. या चित्र संस्थेचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांना या चित्रपटातील ‘धिकताना धिकताना’ हे गाणे खूप आवडले होते. दुर्दैवाने चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित होईपर्यंत त्यांचे निधन झाले होते. या चित्रपटात सुरुवातीला आमिर खानला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती परंतु त्याने नकार दिल्याने ही भूमिका सलमानकडे आली. माधुरी दीक्षितला या चित्रपटाकरिता दोन कोटी पंचाहत्तर लाख एवढे मानधन देण्यात आले. राजश्री चित्रपट वितरण आणि प्रदर्शन करण्याचे अनोख्या पद्धतीने चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. त्याचप्रमाणे व्हिडिओ पायरसीला आवर घातला तर चित्रपट प्रचंड यशस्वी ठरू शकतो हे सिद्ध झाले.

या चित्रपटातील गाणी रवींद्र रावल आणि देव कोहली यांनी लिहिली होती. लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम, कुमार सानू, उदित नारायण , शैलेंद्रसिंह, शारदा सिन्हा यांनी गाणी गायली होती. चित्रपटातील गाण्यांच्या कालावधीच तब्बल एकाहत्तर मिनिटांचा होता. मुंबईच्या लिबर्टी थिएटर मध्ये ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट पाहणे हा प्रेस्टीज इश्यू झाला होता. या चित्रपटात ने स्वच्छ कौटुंबिक मनोरंजनाचा नवा पायंडा पाडला. लोकांना थिएटरपर्यंत आणण्याचे मोठे श्रेय या चित्रपटाकडे जाते.प्रेक्षकांचा ओढा पुन्हा थिएटर कडे सुरु झाला. त्यामुळे चित्रपटगृहांची अपग्रेडेशन सुरू झाले . साऊंड क्वालिटी कडे जाणीवपूर्वक लक्ष देवू लागले. या आणि यानंतरच्या वर्षात आलेल्या ‘ दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाने थिएटर्सची संख्या आणि आणि रिनोवेटेड झालेल्या थिएटर च्या संख्या ४० टक्क्यांनी वाढली.

हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शित होऊन या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ३१ वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने या चित्रपटातील काही महत्वाच्या पण अनोळखी गोष्टींचा उहापोह करणे आवश्यक ठरेल. राजश्रीचा हा चित्रपट त्यांच्याच १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नदिया के पार’ चा रिमेक होता . ‘नदिया के पार’ ची प्रेम कथा एका ग्रामीण भागात फुलणारी होती तर ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचे कथानक संपूर्णतः शहरी भागातून फुलताना दाखवले आहे. हा चित्रपट प्रख्यात चित्रकार एम एफ हुसेन यांनी तब्बल ८५ वेळा हा चित्रपट पाहीला आणि माधुरी दीक्षित चे प्रचंड चाहते बनले. त्यांनी माधुरीच्या अनेक पेंटिंग बनवल्या.( पुढे माधुरीला घेऊन त्यांनी ‘गजगामिनी’ हा चित्रपट बनवला पण दुर्दैवाने या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अजिबात यश मिळाले नाही.)
================================
हे देखील वाचा: शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन
=================================
या चित्रपटात करता माधुरी दीक्षित ला दोन कोटी पंचाहत्तर लाख रुपये मानधन म्हणून मिळाले होते. कुठल्याही भारतीय नायिकेसाठी हा उच्चांकी आकडा होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल दोनशे कोटी रुपयांचे दणदणीत यश मिळवले. या चित्रपटावर फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी बरसातच केली. सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, चित्रपट आणि पटकथा हे पुरस्कार मिळाले. माधुरी दीक्षितला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शनाचा (जय बोराडे) यांना मिळालं. ‘दिदी तेरा देवर दिवाना’ हे भारतातील सर्व लग्नसमारंभात जास्तीत जास्त वेळेला सादर केलेले गीत ठरले. वस्तुत” हे गीत नुसरत फतेह अली खान यांच्या’ सारे नाबियान ‘ या गाण्यावर बेतले होते.