Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

“मी शाहरुख खान बनू शकलो नाही पण…”; Akshaye Khanna याचं ते विधान चर्चेत
‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटामुळे सध्या सोशल मिडिया सेन्सेशन ठरलेला अक्षय खन्ना चांगलाच चर्चेत आहे… ‘छावा’, ‘दृष्यम २’ नंतर ‘धुरंधर’मध्ये अक्षयने आपल्या अभिनयाची अशी काय जादू केली आहे की सर्वत्र त्याची चर्चा आणि त्याचेच व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत… खरं तर आलिया भट्ट, सलमान खान, आर्यन खान यांच्याप्रमाणेच अक्षय खन्ना (Akshaye Khanna) हा देखील स्टार किड आहे… सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा असूनही अक्षयला त्यांच्या इतकं २००० च्या दशकात अभिनय क्षेत्रात यश मिळालं नाही हे तितकंच खरं… हिरो म्हणून जरी प्रसिद्धी त्याला मिळाली नसली तरी आता निगेटीव्ह भूमिका साकारुन तो नायकांनाही मागे टाकतोय… सध्या अक्षयचा मी शाहरुख खान का झालो नाही याबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे… यात नेमकं तो काय म्हणाला आहे जाणून घेऊयात… (Bollywood Nepokids)
तर, १९९७ मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून अक्षय खन्ना याने अभिनयाची सुरुवात केली… लीड रोल करुनही अपेक्षित स्टारडम त्याच्या वाट्याला आलं नाही… याबद्दल एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता की, “स्टारडम मोठ्या पडद्यावर केलेल्या कामामुळे मिळत नाही. किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात, यानेही मिळत नाही. रतन टाटा किंवा धीरुभाई अंबानी यांच्यासारखं स्थान मिळवलं नाही म्हणून तुम्ही ५०० कोटींच्या कंपनीच्या बिजनेसला अपयशी म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे मी शाहरुख खान बनू शकलो नाही, याचा अर्थ असा होत नाही की मी यश पाहिलचं नाही. माझ्यासाठी माझं यश या तुलनेपेक्षा खूप मोठं आहे”… सध्या अक्षय खन्नाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असून त्याच्या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे… (Entertainment News)

अक्षय खन्नाबद्दल सांगायचे झालं तर, ९० च्या दशकातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. अक्षयचे वैशिष्ट्य म्हणजे तो भरमसाठ सिनेमे करण्यापेक्षा कमी पण चांगले सिनेमे करण्यावर भर देतो. अतिशय उत्तम आणि प्रभावी अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अक्षयने छावा सिनेमातील औरंगजेबाची भूमिका देखील अतिशय उत्तम वठवली आहे. आता त्याला या भूमिकेत पाहिल्यानंतर त्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणाची आपण या भूमिकेसाठी कल्पना करू शकत नाही. (Entertainment mix masala)
================================
================================
अक्षय खन्ना याच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ‘मोहब्बत’,’आ अब लौट चले’, ‘ताल’, ‘हमराज’, ‘दीवार’, ‘नकाब’, ‘गांधी : माय फादर’, ‘रेस’, ‘३६ चायना टाऊन’, ‘मेरे बाप पहले आप’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तो झळकला… तसेच, लवकरच ‘महाकाली’ या चित्रपटातही तो विशेष भूमिकेत दिसणार आहे… (Akshaye Khanna Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi