Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bandhan : कवी प्रदीप यांच्या गाण्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती!

 Bandhan : कवी प्रदीप यांच्या गाण्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती!
बात पुरानी बडी सुहानी

Bandhan : कवी प्रदीप यांच्या गाण्यांनी ब्रिटिशांची झोप उडवली होती!

by धनंजय कुलकर्णी 19/12/2025

चाळीसच्या दशकात एका हिंदी चित्रपटातील गाण्याने  देशातील तरुणांवर प्रचंड गारुड केलं होतं. या गाण्याने संपूर्ण देशभर एकच जल्लोष आणि उत्साह निर्माण झाला होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्यामुळे या गाण्याने तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटले गेले. देशभर हे गाणे समूह स्वरूपात  गायले जाऊ लागले. या गाण्याला त्या काळात अक्षरशः राष्ट्रीय गीताचा दर्जा प्राप्त झाला होता. सिंध आणि पंजाब या विधानसभा क्षेत्रांमधून मधून तर या गाण्याला प्रचंड मागणी होती. ब्रिटीशांची वक्र दृष्टी देखील या गाण्यावर पडली होती. कोणतं होतं ते गाणं आणि काय होतं तो नेमका किस्सा?

बॉम्बे टॉकीजचा ‘बंधन’ हा चित्रपट १९४० साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा एन आर आचार्य यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये अशोक कुमार, लीला चिटणीस , सुरेश यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी कवी प्रदीप यांनी लिहिले होती. तर चित्रपटाला संगीत सरस्वती देवी यांचे होते. सिनेमाची कथा पटकथा अमिया चक्रवर्ती यांचे होते.सिनेमातील हे गाणं अशोक कुमार आणि सुरेश यांनी गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘चल चल रे नौजवान चल चल रे नौजवान ‘ या गाण्याला मार्चिंग सॉंग्स ची धुन होती.

त्यामुळे तरुणांमध्ये या गाण्याला प्रचंड मोठी लोकप्रियता मिळाली. शाळांमधून कॉलेजमधून या गाण्याला सामुहिक स्वरात गायले जाऊ लागले. देशभरातील तरुणाई या गाण्याने प्रचंड भरवली गेली.  अक्षरशः या गाण्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा प्राप्त झाला. तो काळ पारतंत्र्याचा असल्याने या गाण्यातून नकळतपणे स्वातंत्र्यासाठी तरुणाईला प्रेरित केले जाऊ लागले. पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध विधानसभेत या गाण्याचे आमदारांनी सामूहिक स्वरूपात गायन केले.

या गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली होती  की तत्कालीन बीबीसीवर या गाण्याचे प्रसारण केले गेले. तेव्हा बीबीसीवर बलराज सहानी निवेदक म्हणून काम करत होते. त्यांनी या गाण्याच्या लोकप्रियतेची दखल घेऊन या गाण्याला बीबीसी वरून प्रसारित केले. या गाण्याने कवी प्रदीप रातोरात स्टार बनले त्यांची  लोकप्रियता प्रचंड वाढली. या गाण्यामुळेच हा चित्रपट त्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरला. कवी  प्रदीप यांनी त्यानंतर ‘किस्मत’ या चित्रपटातील ‘दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है’ हे गाणं लिहिलं. या गाण्याला देखील प्रचंड मोठी लोकप्रियता मिळाली.

================================

हे देखील वाचा :Aarti Movie : कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी बहारों की मंझील राही……

================================

या गाण्याच्या प्रचंड लोकप्रियतेणे  ब्रिटिशांची करडी नजर या गाण्यावर पडली. ‘दूर हटो ऐ दुनियावालो..’ हे गाणं सिनेमातून काढून टाका असा आदेश दिला. परंतु कवी प्रदीप यांनी त्या गाण्यात ,” आम्ही उलट तुमच्या बाजूनेच आहोत.’ असे सांगितले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन दोस्त राष्ट्रांकडून जपान आणि जर्मनी च्या विरुध्द लढत होते. ‘शुरू उठा है जंग तुम्हारा जाग उठो हिंदुस्थानी तुम ना किसी के आगे झुक ना जर्मन हो या जापानी’ या ओळीतून आम्ही तुमच्या च सोबत आहे असे बेमालूम पणे पटवून दिले! त्या मुळेच  हे गाणं लिहिलं आहे असं सांगितलं!  आणि मग काय गाणं आणखी लोकप्रिय झालं.  

कवी प्रदीप यांनी १९६३ साली  लिहिलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो…’ या गाण्याने तर इतिहास घडवला. आज इतक्या वर्षानंतर देखील हे गाणं ऐकून श्रोत्यांचे डोळे पाणावतात. आजही हे गाणे सर्वोत्कृष्ट देशभक्ती पर गीत आहे. आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिन्दुस्थान की (जागृती) देख तेरे संसार कि हालत क्या हो गई (नास्तिक), दे दी. हमे आजादी बिना खडग बिना ढाल (जागृती),इन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम),सूरज रे तू जलते रहना (हरिश्चंद्र तारामती), मै आरती उतारू रे (जय संतोषी माता) , तेरे द्वार खडा भगवान (वामन अवतार) ओ दिलदार बोलो एकबार (स्कूल मास्टर) चल अकेला चल अकेला (संबंध) हि कवी प्रदीप यांची गाणी अफाट गाजली. कवी प्रदीप राष्ट्रकवी म्हणून लोकप्रिय झाले. त्याना दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.