सत्तर रूपये मिळवलेले बरे नै का?
हे काय ऐकताय माने..
ऐकावं ते नवलच. तिकडं मराठी कलाकारांना ना खोपच्यात घेतलाय नेटकऱ्यांनी. का? तर त्यांनी म्हणे कामाला जायला सुरूवात केली. आता काय बोलावं.. म्हणजे लोकांना उपदेश करतात हे कलाकार लोक्स. आणि आता काम आल्यावर स्वत: घराबाहेर पडतात… याला काय अर्थ. असं बाहेर पडायचं असतं काय? लोकांना घरी बसा म्हणायचं आणि आपण बाहेर पडायचं असं कुठं असतं काय? हे असं सगळं माने म्हणत नाहीयेत. तर नेटकऱ्यांचे सवाल आहेत साक्षात कलाकारांना. आता इथे प्रश्न तमाम मराठी इंडस्ट्रीचा आहे हो. आता असं आहे, जसे आपण लोक घरी बसून होतो पाच महिने. तशी ही मंडळीही बसून होतीच की. मग, मला सांगा राज्य सरकारने शुटिंगची परमिशन दिली त्यात यांचा काय दोष? बरं गेला बाजार आता काम आलंच.. तर काय करायचं? नाही म्हणून सांगायचं काय? इथं आधी लोकांना कामं मिळेनात. अहं.. आपलं तसं नसतं. आत्ता आपण घरी असलो तरी आपली नोकरी.. किंवा आपलं दुकान किंवा आपला धंदा सुखरूप असतो. उद्या जेव्हा केव्हा आपण बाहेर पडू तेव्हा तो धंदा आपण उघडून बसणार आहोतच. तो चालेल कधी हा मुद्दा ज्याचा त्याचा. पण हाताशी काहीतरी काम असेल आपल्या.
इंडस्ट्रीचं तसं नसतं हो. आत्ता काम आहे तोवर काम आहे. नसेल काम तर फार वाट पाहावी लागते. धनंजय माने साक्षी आहेत या सगळ्या प्रकाराला. त्यामुळे काम तर नाकारून चालत नाही. शेवटी कलाकारालही पोट असतं. कुटुंब असतं. खर्च असतात. हप्ते असतात. ते त्यांनी कसे भागवायचे? तरी एक बरं आहे. लॉकडाऊन काळात या सगळ्या कलाकारांनी गरजवंतांना मदतच केली आहे. त्यावेळी ही मंडळी घरीच होती. तेव्हा त्यांनी आपल्या खिशातून अनेकांना पैशाची मदत केली आहे,. कधी किराणा पोचवला आहे. म्हणजे, आपले कलाकार खरंच चांगले आहेत हो. पण आता जिथं चित्रिकरण सुरू झालं आहे त्यावेळी त्यांच्याकडे काम आलं तर त्यांनी ते करायचं नाही का?
करायाल हवं. पण मध्यम मार्ग काढायला हवा. आता त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांनीही आहेच. आणि जे काळजी घेणार नाहीत त्यांना कोरोना भोगावा लागेल. लागेल कशाला तसं झालंच. सुबोधपासून पार रोहित राऊतपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली. कोणी काही मुद्दाम केलेलं नाही. शेवटी रिस्क आहे. काम आलंय तर ते करावं लागणारच. भावांनो तुमच्या पोटात का दुखतंय? त्या त्या कलाकाराला काम आलंय तर करु दे की त्याला काम. मिळवू देत की त्याला चार पैसे. सत्तर रुपये वारण्यापेक्षा.. सत्तर रुपये मिळवलेले काय वाईट.. आईच्या गावात..
काय म्हणता?
राग सोडा.. कामाला लागा. मराठी कलाकारांचा ईजय असो.
धनंजय माने