
Bollywood Cop Role : १४४ चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारणारा ‘हा’ अभिनेता माहित आहे का?
एखाद्या कलाकाराची वर्सटॅलिटी कशी ओळखली जाते? तर जितक्या विविध प्रकारच्या तो भूमिका करतो त्यात केवळ प्रेक्षकांना ते पात्र दिसतं तेव्हा कलाकाराच्या अभिनयाला यश येतं. मात्र, अलीक़डच्या काळात एकसारख्या भूमिका वारंवार केल्यानंतर आपल्याला टाईपकास्ट केलं जाईल या भितीने साचेबद्ध भूमिका करण्यास बरेच अभिनेते कुरकुरक करतात. पण तुम्हाला माहित आहे का हिंदी चित्रपटसृष्टीतील हा एक कलाकार आहे ज्याने आत्तापर्यंत १४४ चित्रपटांमध्ये एकाच प्रकारची भूमिका केली आहे. आणि त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली आहे. कोण आहे तो हरहुन्नरकी कलाकार जाणून घेऊयात… (Bollywood news)

या अभिनेत्याचं नाव आहे जगदीश राज खुराना (Jagdish Raj Khurana)… जगदीश यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका १-२ नव्हे तर १४४ चित्रपटांमध्ये साकारली असून यात अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं…जगदीश यांनी साकारलेला पोलिस प्रेक्षकांना इतका खरा वाटला होता की आजही चित्रपटातील बेस्ट पोलिस अधिकाऱ्याची भूमिका म्हटलं की त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं…(Indian cinema classic roles)

हिंदी चित्रपटांच्या ८०-९० च्या दशकात जगदीश यांची निवड प्रत्येक चित्रपटात केवळ पोलिसाच्या भूमिकेसाठी केली जात होती… इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी पर्मनंट पोलिस अधिकाऱ्याचा युनिफॉर्म शिवून घेतला होता… आपल्या अभिनय कारकिर्दित जगदीश यांनी जवळपास २५० चित्रपट केले असतील आणि त्यापैकी १४४ चित्रपटांमध्ये त्यांनी फक्त पोलिस अधिकाऱ्याचीच भूमिका केली होती… यात ‘जॉनी मेरा नाम’, ‘गॅम्बलर’, ‘सुहाग’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘CID’, ‘कानून’, ‘वक्त’, ‘रोटी’, ‘इत्तफाक’, ‘सफर’, ‘डॉन’ (Don) या चित्रपटांचा समावेश होतो… (Bollywood cop roles)
===============================
हे देखील वाचा: Jaya Bachchan : …म्हणून जया बच्चन ‘सिलसिला’च्या सेटवर रोज जायच्या!
===============================
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी जगदीश यांनी आपल्या कामातून दिलेलं योगदान खरंच अमुल्य आहे.. कारम एकसारखी भूमिका अनेक वर्ष करुनही त्यात नाविन्य कायम जपण्याचं काम जगदीश यांनी केल्यामुळे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी त्यांना प्रेक्षकांनी आणि मेकर्सनेही पसंती दर्शवली होती… त्यामुळे केवळ पोलिसाची भूमिका साकाकपन त्यांनी त्यांचं चित्रपटसृष्टीत करिअरच घडवलं नाही तर प्रेक्षकांना कायमस्वरुपी लक्षात राहिल अशी कलाकृती दिली…(Entertainment news)
रसिका शिंदे-पॉल