Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!
राजश्री प्रॉडक्शनचा १९७१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता ‘उपहार’. या चित्रपटाची कथा रवींद्रनाथ टागोरांच्या ‘समाप्ती’ या एका लघुकथेवर आधारीत होती. ही एक हलकीफुलकी सुखांतिका होती. बंगाल मधील एका खेड्यात राहणाऱ्या मिनू नावाच्या एका ‘खोडकर , व्रात्य ’ पण मनाने अतिशय हळवी असलेल्या षोडशीची ही कहाणी होती. ही मुलगी पौगंडावस्थेतील आहे. तिच्यातील बाल्य अजून संपलेले नाही.
तारुण्याच्या हाका तिच्या अंतर्मनाला ऐकू येतायत पण कळीचे फूल होण्याच्या सीमारेषेवर असल्याने ती गोंधळलेली आहे.प्रचलित समाजाला मुलीकडून अपेक्षित असे गांभीर्य तिच्या वागण्या बोलण्यात आलेले नाही. स्वत:मधील ‘स्त्रीत्वाचा’ शोधही तिला लागलेला नाही. तिचा गावभर दंगा चालू असतो, तिला कपड्यांची शुध्द नसते, पोरांसारखे झाडावर चढणे, आंबे चोरणे, लहानलहान गोष्टीवर खळखळून हसणे, इतरांच्या चेष्टा काढणे हे असले उद्योग चालू असतात.

त्या गावातील एक तरूण अनुप (स्वरूप दत्त) कलकत्त्याला असतो , एकदा वधू संशोधनासाठी गावी येतो. नावेतून वाळूवर उडी मारतांना तो पडतो आणि त्याचे कपडे चिखलाने भरतात. ते पाहून मिनू जोरजोरात हसते व पळून जाते.जी मुलगी तो पाहायला आलेला असतो ती काही त्याला आवडत नाही. पुन्हा एकदा त्याची मिनूची भेट होते यावेळी तिच्या खोड्या अजून वाढलेल्या असतात.अनुपला मात्र मनातल्या मनातकुठेतरी हि खोडकर मिनू आवडू लागते.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
अनुपचा निर्णय त्याच्या आईला पटत नाही. कारण तिच्या मते मिनू बावळट आहे, तिला काही समज नाही. गावातील साऱ्यांचेच तिच्या विषयी हेच मत असते.पण अनुपला ती मनोमन आवडलेली असते.दोघांचे लग्न होते. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री त्याच्या लक्षात येते की ही मुलगी अजून ‘अजाण’ आहे. तिला स्त्री-पुरुष संबंधाबद्दल काहीच ठाऊक नाही. रात्री ती खोलीच्या खिडकी शेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या पकडून पळून जाते. तिला घरी आणल्यावर ती जाम चिडते व रागारागाने खोलीतील सामान, पुस्तके वगैरे फेकू लागते. अनुप वैतागतो आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडतो.
तो परत गेल्यानंतर तिला त्याची उणीव भासू लागते. त्याला दिलेला त्रास, त्याच्या काढलेल्या खोड्या, त्याचे निर्मळ मन सारं सारं तिला आठवू लागतं. मनातल्या मनात ती त्याच्या साठी झुरू लागते. तिच्यातील मुलीचे स्त्री मध्ये रूपांतर होवू लागते. मनात त्याच्या विषयीचा प्रीतीचा अंकुर फुलू लागतो. मनातील तिचे भावबंध आता चेहऱ्यावर उमटू लागतात. तिचं कणाकणाने तळमळण तिच्या सासूच्या (कामिनी कौशल) च्या नजरेत येऊ लागतं. आता कळीचे फुलात रूपांतर झालेलं असतं. शेवटी दोघांचे होणारे मीलन अशी ही एक ‘वेगळी’ प्रेमकहाणी आणि प्रसन्न सुखांतिका आहे. तिची हि परिवर्तनाची अवस्था फार सुंदर चितारली आहे.

अभिनयात जया भादुरीने बाजी मारली आहे. तिचं आधीचं अल्लड वागणं आणि नंतरचं समंजस वागणं या दोन्ही अभिनयातील बारकावे आणि छटा फार सुंदर पेश केल्या आहेत. तिचा नायक झालेला स्वरूप दत्त हा बंगाली अभिनेता त्याच्या भूमिकेतील सहजतेने लक्षात रहातो. इतर भूमिकेतील कामिनी कौशल,नाना पळशीकर, नंदिता ठाकूर, सुरेश चटवाल , लीला मिश्रा आपापल्या भूमिकेत योग्य आहेत. कला दिग्दर्शक म्हणून ख्यातकीर्त असलेले सुधेन्द्रू रॉय यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. आनद बक्षी यांच्या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत होते. गाणी अतिशय सुरीली होती.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
‘माझी नैय्या ढूढे किनारा’ (मुकेश), मैं एक राजा हूं तू एक रानी है (म रफी) सुनी री नगरिया (लता मंगेशकर). हा चित्रपट ४५ व्या अॅकॅडमी अॅवॉर्ड करीता पाठविला गेला होता. जया भादुरीच्या गुड्डी नंतरचा हा हिट सिनेमा ठरला. तिची अभिनयाची कारकीर्द आता बहरू लागली. या भूमिकेकरिता फिल्म फेअर चा विशेष पुरस्कार तिला प्राप्त झाला.वस्तुत: हा सिनेमा सत्यजित रे यांच्या ‘तीन कन्या’ या चित्रपटातील एका कथेवर प्रेरित होता. त्या चित्रपटात सौमित्र चटर्जी आणि अपर्णा सेन यांच्या भूमिका होत्या. याच कथानकावर राजश्री प्रोडक्शनने माधुरी दीक्षितला घेऊन अबोध हा चित्रपट बनवला होता हा चित्रपट बनवला होता.