दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सॉफ्ट पॉर्न फिल्म्स ते ‘पंचायत’; ‘बनराकस’चा थक्क करणारा प्रवास
कोविड काळात प्रेक्षकांनी त्यांचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आणि मनोरंजनविश्वात एक मोठी क्रांति आली. आज डझनावारी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि त्यावर ढीगभर सिरिज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, सोनी लीव्ह, झी५ सारख्या बड्याबड्या ओटीटी प्लॅटफॉर्मनी संपूर्ण मार्केट काबिज केलं आहे.
पण या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या गर्दीत एका प्रोडक्शन कंपनीने आणि त्यांच्या सीरिजने त्यांची स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. ती कंपनी म्हणजे ‘TVF‘ आणि याच ‘TVF’ची निर्मिती असलेली ‘पंचायत‘ (Panchayat 3) ही वेबसीरिज.
केवळ ४ वर्षातच हिंदी कंटेंट विश्वातील कल्ट सीरिजचा दर्जा ‘पंचायत‘ला मिळाला आहे. टीव्हीएफने काढलेल्या काही उत्कृष्ट वेबसीरिजपैकी एक म्हणजे ‘पंचायत’. (Panchayat 3)
गेले कित्येक महीने या सीरिजचे चाहते याच्या पुढच्या म्हणजेच तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत होते. फुलेरा या छोट्याश्या खेड्यात पंचायत सचिव म्हणून नेमण्यात आलेला एका बड्या शहरातील तरुणाभोवती ही सीरिज फिरते.
दोन्ही सीझनच्या अभूतपूर्व अशा यशानंतर प्रेक्षक ‘पंचायत‘च्या (Panchayat 3) पुढील म्हणजेच तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पहात होते. अखेर हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून नेहमीप्रमाणेच टीव्हीएफने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
समीक्षक, प्रेक्षक, सामान्य जनता सगळ्यांकडूनच या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचे कौतुक होत आहे. अशा फार कमी भारतीय सीरिज आहेत ज्यांचे पुढील सीझनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. ‘पंचायत’ ही त्यापैकीच एक सीरिज आहे. (Panchayat 3)
या सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्येही जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पण यातील आणखी एक पात्र आहे, जे खूप गाजलं! (Panchayat 3)
ज्यांनी ज्यांनी ही सीरिज पाहिलीये त्यांना या पात्राचा प्रचंड राग आला असेल. ते पात्र म्हणजे ‘बनराकस‘ उर्फ भूषण याचं. या पात्राच्या ‘देख रहे हो बिनोद’ या डायलॉगवर शेकडो मीम्सही व्हायरल झाले. या तिसऱ्या सीझनमध्यही भूषण हे पात्र डोक्याला ताप ठरतं. आज आपण हेच पात्र साकारणारा अभिनेता दुर्गेश कुमारविषयी जाणून घेणार आहोत. (Panchayat 3)
‘पंचायत’मध्ये दुर्गेश कुमारने साकारलेला भूषण फुलेरा गावातील सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी कारण शोधत असतो. निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनमध्ये या पात्राला एक वेगळंच महत्त्व दिलं ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या पात्राने घर केलं. (Panchayat 3)
===
हेदेखील वाचा : ‘हिरामंडी’साठी कुणी किती मानधन घेतले? जाणून घ्या
===
नकारात्मक पात्र असूनही दुर्गेश यांनी ते पात्र जितक्या सहजतेने साकारलेलं आहे की या पात्राशिवाय ही सीरिज अपूर्णच आहे यात कसलीही अतिशयोक्ति नाही. या पात्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे पण दुर्गेश कुमारचा ‘स्टारडम’पर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. (Panchayat 3)
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात जन्मलेल्या दुर्गेशने शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि दिल्ली गाठली. दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये थिएटर शिकत असताना तो एका शाळेत शिकवायला जायचा. मुंबईत आल्यानंतर त्याने ‘हायवे’ सिनेमात छोटीशी भूमिका करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Panchayat 3)
नंतर त्याला काम मिळालं, पण सर्व भूमिका लहान होत्या. हा काळ त्याच्यासाठी खूप संघर्षाचा होता. २०१३ ते २०२२ या नऊ वर्षांत दिलेल्या प्रत्येक ऑडिशनमध्ये अपयश आल्याचं दुर्गेशने सांगितलं.
या कठीण काळात दुर्गेशला पैशांची चणचण भासू लागली आणि यामुळेच त्याला सॉफ्ट पॉर्न चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करावं लागलं. अखेर इतकी वर्षे संघर्ष केल्यावर दुर्गेशला कोविड काळात काम मिळालं.
त्याला ‘पंचायत’ (Panchayat 3) मध्ये भूषणच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं. आता तिसऱ्या सीझनमध्येही दुर्गेशची चांगलीच मोठी आणि महत्त्वाची आहे. ओटीटीमुळे काम मिळत असल्याचा दुर्गेशने आनंद व्यक्त केला आहे.
“आम्हाला आता काम मिळत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर, आम्ही काय केलं असतं, ॲक्शन शोमध्ये आम्हाला कोणी घेत नाही. कमीत कमी कॉमेडीमुळे आम्हाला अशा संधी मिळतात त्यामुळे खूप चांगलं वाटतंय,” असं दुर्गेशने मीडियाशी संवाद साधतान सांगितलं.
‘टीव्हीएफ‘च्या एका छोट्याश्या सीरिजने प्रेक्षकांना तर एक वेगळीच पर्वणी दिली पण दुर्गेशसारख्या मेहनती कलाकारांचं करिअरही रुळावर आणलं.