
Kalki 2898 AD : चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल आली मोठी अपडेट!
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादूकोण, प्रभास (Prabhas) आणि कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कल्की २८९८’ एडी चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला. माणसाचं भवितव्य, पृथ्वीचा अंत या भविष्यात होऊ घातलेल्या काल्पनिक घटना या चित्रपटात दाखवल्या आहेत. तसेच, महाभारत या पौराणिक कथेला तंत्रज्ञानाची जोड देत ‘कल्की’ चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती नक्की देतो. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागानंतर आता ‘कल्की २’ लवकरच येणार असून चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार असं सांगितलं जात आहे. (Kalki 2898 AD)

दरम्यान, ‘कल्की २८९८’ (Kalki 2898 AD) एडी या पहिल्या भागात अश्वत्थामाची भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा स्क्रिन टाईम कमी असल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली. त्यामुळे आता दुसऱ्या भागात त्यांच्यावर अधिक फोकस असेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘कल्की’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं बरंचंस शुटींग मेकर्सनी पहिल्या भागाच्या शुटींगदरम्यानच केलं आहे. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे दीपिका गरोदर असल्यामुळे तिच्या मेटरनिटी सुट्टीच्याआधी त्यांना शुटींग बऱ्यापैकी पुर्ण करायचं होतं. (Bollywood trending news)

तसेच, सुत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन मे महिन्यामध्ये शुटींग सुरु करणार असून दुसऱ्या भागात त्यांच्या भूमिकेवर अधिक भर देण्यात आला आहे. तर, बिग बी यांचं हे शुट १५ जूनपर्यंत संपवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं जात असून त्यानंतर लगेचच जुलै महिन्यात बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७व्या सीझनच्या शुटींगला सुरुवात करणार आहेत. केबीसीचा १७वा सीझन ऑगस्टमध्ये टेलिकास्ट केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (KBC season 17)
==========
हे देखील वाचा : Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
==========
‘कल्की’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अश्वत्थामा आणि भैरव यांच्याबद्दल अधिक माहित देत सुमथीच्या बाळाला अश्वत्थामाने वाचवल्यानंतर पुढे काय घडलं हे देखील कथानकातून कळणार आहे. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा अधिक सविस्ततरपणे मांडली जाणार असा अंदाज येत आहे. त्यामुळे कल्की चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अश्वत्थामा, भैरव आणि यास्किन समोरासमोर आल्यावर काय होणार हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. (Kalki 2898 AD movie)