Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

तीन सुपरस्टार्स अमिताभ, रजनीकांत आणि Kamal Hasan यांचा एकमेव सिनेमा ‘गिरफ्तार’
ऐंशीच्या दशकातील तीन लोकप्रिय सुपरस्टार्सला घेऊन दिग्दर्शक प्रयागराज यांनी १९८५ साली एक चित्रपट आणला होता ‘गिरफ्तार’. यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दक्षिणेकडील दोन सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत या तिघांना एकत्र घेऊन एक मसाला इंटरटेनमेंट सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावर्षीचा तो टॉप टेन यादीतील चौथ्या क्रमांकाचा हा चित्रपट ठरला.

अमिताभ बच्चन त्यावेळी सुपरस्टार पदावर असला तरी राजकारणात एन्ट्री केल्यामुळे त्यांच्या सिनेमाची संख्या कमी होत चालली होती. रजनीकांत दक्षिणेकडील सुपरस्टार होतेच. शिवाय १९८३ साली आलेल्या ‘अंधा कानून’ या चित्रपटापासून त्यांनी हिंदीत देखील दमदार एन्ट्री केली होती. कमल हसन यांचा हिंदीतील प्रवेश ‘एक दुजे के लिए’ या १९८१ सालच्या चित्रपटापासून झाला होता. पण हिंदी सिनेमा कमल हसन यांना पहिल्यापासूनच तेवढा आवडला नव्हता. साऊथ कडची शिस्त आणि संस्कृती त्यांना प्रिय असल्यामुळे हिंदीत फारसे ते कधी रमले नाहीत. पण ‘गिरफ्तार’ या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता.

या चित्रपटांमध्ये तीन सुपरस्टार्स एकत्र असले तरी रजनीकांत आणि कमल हसन हे दोघे एकाही सीन मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसत नाहीत. रजनीकांत यांचा तसा या सिनेमात कॅमिओ रोल होता. चित्रपटाचे कथानक त्या काळाला सुटेबल असे होते. मिलना बिछडना, सूडनाट्य! यात अमिताभ बच्चन आणि कमल हसन हे दोघे भाऊ दाखवले आहेत. जे लहानपणीच बिछडतात. रजनीकांत याने चित्रपटात इन्स्पेक्टर हुसेनची भूमिका जबरदस्त केली. अमिताभ बच्चन रंगवलेला पोलीस इन्स्पेक्टर करण खन्ना जबरदस्त होता.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
चित्रपटात अमिताभची नायिका माधवी तर कमल हसन ची नायिका पूनम धिल्लन होती. चित्रपटातील गाणी इंदीवर यांनी लिहिली होती तर संगीत बप्पी लहरी यांचे होते. यातील ‘धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंगकाला न पड जाये..’ हे गाणं त्या काळात प्रचंड गाजलं होतं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्याला संपूर्ण देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमातील अन्य गाणी शब्बीर कुमार,मोहम्मद अजीज, बप्पी लहरी यांनी गायलेली होती. ‘आना जाना लगा रहेगा सुख आयेगा दुख जायेगा’ हे गाणे देखील त्या काळात लोकप्रिय ठरले होते. अमिताभ आणि कमाल वर चित्रित ‘यारो पे कुर्बान होणे यार आये है…ने’ या गाण्यावर ‘कुर्बानी’ च्या गाण्याची छाप होती.
या चित्रपटाचे निर्मिती एस रामनाथन यांनी केली होती. हे तेच निर्माते होते ज्यांनी अमिताभ बच्चनला ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात दिग्दर्शित केले होते. १९८३ साली आलेल्या ‘महान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील एस रामनाथनच होते. त्याचवेळी त्यांनी स्वतःच्या प्रोडक्शन मध्ये अमिताभला भूमिका करण्याची विनंती केली आणि अमिताभने ती मान्य केली आणि ‘गिरफ्तार’ या चित्रपटाची निर्मिती झाली 21 ऑक्टोबर 1983 या दिवशी या चित्रपटाचा मुहूर्त झाला.

खरंतर अमिताभ या चित्रपटांमध्ये गेस्ट अपीयरंस करणार होता. पण ‘कुली’ या चित्रपटानंतर अमिताभ ची लोकप्रियता प्रचंड वाढली होती आणि त्याची भूमिका देखील वाढवली गेली. पण यामुळे अभिनेता कमल हसन मात्र नाराज झाला. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले ,” हा चित्रपट करताना मी बिलकुल खूष नव्हतो. कारण माझी भूमिका दिवसेंदिवस छोटी छोटी होत गेली. अमिताभ बच्चन यांचे भूमिका वाढवत नेली!” खरंतर कमल हसन या चित्रपटाचा नायक होता. पण संपूर्ण चित्रपट अमिताभ बच्चन यांनी खाऊन टाकला!
या चित्रपटाचे बजेट सव्वा कोटी होते आणि त्याने साडेचार कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. या चित्रपटाचे ओपनिंग जबरदस्त झाले होते. कारण जवळपास एक वर्षानंतर अमिताभ बच्चन यांचा चित्रपट रिलीज होत होता. १३ सप्टेंबर १९८५ रोजी ‘गिरफ्तार’ रिलीज झाला. आणि संपूर्ण देशभर त्याला चांगले ओपनिंग मिळाले. एकाच चित्रपटात तीन तीन सुपरस्टार्सला पाहण्याची संधी रसिकांना मिळाली त्यामुळे पहिलं दोन आठवड्यातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले. यानंतर दोन महिन्यांनी ८ नोव्हेंबर ला अमिताभ बच्चन यांचा ‘मर्द’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
================================
हे देखील वाचा : “माझं मराठी बेळगावकडचं…”, रजनीकांत सरांचा साधेपणा पाहून भारावले Upendra Limaye
================================
या वर्षीच्या टॉप टेन चित्रपटांमध्ये पहिल्या नंबरवर ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट होता. दुसरा क्रमांकावर ‘मर्द’ तिसऱ्या क्रमांकावर ‘प्यार झुकता नही’ हे चित्रपट होते. या चित्रपटाच्या यशा नंतर या तीन सुपरस्टारला एकत्र आणण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला पण यशस्वी होऊ शकला नाही. खरंतर रजनीकांत आणि कमल हसन यांनी दक्षिणेकडील तेलगू , तमिळ चित्रपटात 16 वेळा एकत्र भूमिका केल्या होत्या पण या चित्रपटानंतर ते पुन्हा कधीच एकत्र आले नाहीत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हम या चित्रपटात एकत्र आले होते कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांनी ‘कल्की’ (२०२४) मध्ये स्क्रीन शेअर केला होता.