‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Kantara 1 चा जगभरात वाजला डंका; ८ दिवसांत पार केला ५०० कोटींचा आकडा
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टेर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे… २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या कांतारा १ ने बॉक्स ऑफिसवर जगभरात ५०० कोटांचा टप्पा ८ दिवसांमध्ये पार केला आहे… २०२२ मध्ये आलेल्या कांताराच्या या प्रीक्वेलने बॉलिवूडच्या चित्रपटांची गोची करुन ठेवली आहे… जाणून घेऊयात कांतारा १ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल…
मिळालेल्या माहितीनुसार, कांतारा १ ने पहिल्या दिवशी ८९ कोटी, दुसऱ्या दिवशी ६२ कोटी, तिसऱ्या दिवशी ८४ कोटी, चौथ्या दिवशी १०० कोटी, पाचव्या दिवशी ४२ कोटी, सहाव्या दिवशी ५०.५० कोटी, सातव्या दिवशी ४२.५० कोटी, आठव्या दिवशी ३९.२५ कोटी कमवत जगभरात एकूण ५०९.२५ कोटींचा टप्पा तर भारतात ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे… (Kantara 1 box office collection)

कांतारा १ ची तुलना बॉलिवूडच्या चित्रपटांशी करायचं झालं तर, ‘सैय्यारा’ (Saiyaara) चित्रपटाने जगभरात ५७० कोटी आणि ‘छावा’ (Chhaava) ने ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे… तर, कन्नड चित्रपट ‘केजीएफ २’ (KGF 2) ने जगभरात १२०० कोटींचा टप्पा पार करत या सगळ्याच चित्रपटांना मागे टाकलं आहे… त्यामुळे आता कन्नड भाषेतील हा दुसरा सुपरहिट चित्रपट केजीएफचा विक्रम मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे… (Kannada movie news)
================================
हे देखील वाचा : Rukmini Vasanth : ‘कांतारा – चॅप्टर १’ मधली ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
=================================
दरम्यान, कांतारा आणि ‘केजीएफ’ या दोन्ही कन्नड भाषेतील फ्रेंचायझीने जगभरात कन्नड चित्रपटसृष्टीला महत्वाचं स्थान मिळवून दिलं आहे… शिवाय, कांतारासाठी आधीच राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या ऋशभ शेट्टीन दुसऱ्यांदाही राष्ट्रीय पुरस्कार नावावर करावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi