Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

रेकॉर्डिंगच्या वेळी झालेली चूक Kishore Kumar यांनी शूटिंगच्या वेळी कशी सुधारली?
पन्नासच्या दशकामध्ये किशोर कुमार अभिनेता म्हणून खूपच लोकप्रिय होता. त्याच्या सिनेमांना प्रेक्षक मोठी गर्दी करायचे. आपल्या कॉमिक रोलमधून तो प्रेक्षकांची मनमुराद करमणूक करायचा. या काळात त्याने काही गंभीर भूमिका देखील केल्या होत्या पण प्रामुख्याने त्याच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी जास्त स्वीकारले. याच काळात किशोर कुमार पार्श्वगायन देखील करत असे. पण हे प्रमाण खूप कमी होते. केवळ देव आनंदसाठी तो प्लेबॅक जास्त देत होता. देव आनंद आणि स्वतःसाठी तो पार्श्वगायन करायचा. रेकॉर्डिंगच्या वेळेला किशोर कुमार स्टुडिओमध्ये प्रचंड धमाल करायचा.

मध्यंतरी आशा भोसले यांनी एका टीव्हीवरील कार्यक्रमात किशोरचे अनेक धमाल किस्से सांगितले होते, “किशोर कुमार यांच्यामध्ये एक लहान विनोदी मूल दडले होते त्यामुळे त्याच्या व्रात्य खोड्या सदैव चालू असायच्या. तो कायम इतरांना हसवत असायचा. मग इतरांच्या नकला करणे, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढून दाखवणे, अंगविक्षेप करून चालून दाखवणे,,, असं करून तो रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये दंगा करायचा”. लता मंगेशकर आणि आशा भोसले शेवटी हात जोडून त्याला म्हणायच्या,”दादा आता पुरे! हसून हसून आमचा घसा आणि पोट दुखायला लागले आहे. आपल्याला आता रेकॉर्डिंग करायचे आहे. आमचा आवाज बरोबर निघणार नाही, तेव्हा आता मस्ती बंद काम सुरू!” पण किशोर कुमार कसला ऐकतो ? तो किशोर कुमार होता तो कशाला कुणाचं ऐकेल. त्याच्या गमतीजमती आणि जोक सांगणे चालूच असायचे. त्यामुळे रेकॉर्डिंग स्टुडिओतला माहौल किशोर कुमार असला की एकदम जिंदा दिल सायाचा, काही म्युझिक डायरेक्टर किशोर कुमारला याबाबत थोडं ओरडायचे पण किशोर कुमार च्या सुप्त खोड्या चालूच असायच्या.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
एकदा आशा भोसले सोबत त्याचे एका गाण्याची रेकॉर्डिंग होणार होते, चित्रपट १९५५ सालचा ‘बाप रे बाप’ या चित्रपटाचा नायक स्वतः किशोर कुमारच होता तर नायिका चांद उस्मानी होती. सिनेमा ए आर कारदार यांनी निर्माण केला होता दिग्दर्शन त्यांचेच होते चित्रपटातील गाणी लिहिली होती जानिसार अख्तर यांनी तर संगीत होते ओ पी नय्यर यांचे, गाण्याचे बोल होते ‘पिया पिया पिया मेरा जिया पुकारे तुम तो बसी हो गोरी मन में हमारी: सकाळपासून गाण्याची रिहर्सल चालू होती आणि सोबतच किशोर कुमारच्या गमती जमती देखील. त्यामुळे अशा भोसले हसून हसून थकल्या होत्या गाण्याच्या रेकॉर्डिंग चालू असतानाही तो डोळ्याने वेगवेगळे भाव करून आशा भोसले ला कन्फ्युज करत होता आणि हसत होता आशा भोसले प्रत्येक वेळेला हात जोडून त्याला थांब असे म्हणत होती!
या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला आशा भोसले यांच्याकडून एक चूक झाली! चुकून किशोर कुमारच्या स्वरा आधी एक आलाप घेतला. खरं तर हा आलाप या गाण्यात नव्हताच; पण किशोर कुमारच्या गमती जमती आणि डोक्यात झालेले कन्फ्युजन या मुळे आशा भोसले यांच्याकडून हा आलाप घेतला गेला. किशोर कुमारच्या ते लक्षात आलं पण त्याने कंटिन्यू असं हाताने खूण केली आणि तो आलाप तसाच राहू दिला. गाणं जर रेकॉर्डिंग झालं त्यानंतर आशा भोसले किशोर कुमारला म्हणाल्या,” मी दादा ये गाना हमको दोबारा रेकॉर्ड करना पडेगा!”

संगीतकार ओपी नय्यर यांचे देखील तेच म्हणणं पडलं. त्यावर किशोर कुमार म्हणाला ,”काही नको. गाणं छान झालेलं आहे!” त्यावर आशा म्हणाली,” पण मी त्या गाण्यांमध्ये चुकून आलाप घेतलेला आहे. त्यामुळे गाणं चुकलं आहे.” त्यावर किशोर कुमार यांचे म्हणणं होतं ,” काही फरक पडत नाही. या चित्रपटाचा हिरो मीच आहे. शूटिंग च्या वेळेला मी बघा काय गंमत करतो.” ते गाणं तसंच राहू दिल. जेव्हा गाण्याचे शूटिंग सुरू झाले आणि ज्या वेळेला किशोर कुमारने आशा भोसले ने जो चुकीचा आलाप घेतला होता तेव्हा नायिका चांद उस्मानी गायचे होते तेंव्हा तिच्या तोंडावर किशोर ने हात ठेवला! त्यामुळे प्रेक्षकांना तो गाण्यातलाच प्रसंग वाटला!!
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
आशा भोसले यांच्याकडून झालेली चूक किशोर कुमार यांनी अशा पद्धतीने दुरुस्त केली. आशा भोसले यांनी हा किस्सा सांगताना किशोर कुमारच्या अनेक गमती जमती देखील सांगितल्या होत्या. किशोर कुमार खरोखरच ग्रेट ऍक्टर होता. लोकांना कायम हसवत ठेवत तो वातावरण जिंदादिल ठेवत असे!