Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

जेव्हा Kishore Kumar यांनी होम प्रॉडक्शनच्या बाहेरच्या ‘या’ एकमेव चित्रपटाला संगीत दिलेहोते!
हिंदी सिनेमातील हरहुन्नरी कलावंत किशोर कुमार यांची संगीतकार म्हणून कारकीर्द तशी छोटीच आहे. त्यांनी स्वतःच्या होम प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या चित्रपटांना प्रामुख्याने संगीत दिले याची सुरुवात १९६१ सालच्या ‘झुमरू’ या चित्रपटापासून झाली. यात किशोर यांचे अप्रतिम ‘कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा..’ हे झिंझोटी रागावर आधारीत गीत होते. त्यानंतर साठच्या दशकात त्यांनी ‘दूर गगन की छाव मे’ (१९६४) ‘हम दो डाकू’ (१९६१) हे सिनेमे स्वरबध्द केले. सत्तरच्या दशकात ‘दूर का राही’ (१९७१), ‘बढती का नाम दाढी’ (१९७४), ‘शाबाश डॅडी’ (१९७९) तर ऐंशीच्या दशकात ‘दूर वादियो में कही’ (१९८०), ‘चलती का नाम जिंदगी’ (१९८१), ‘ममता कि छाव में’ (१९९०) अशा एकून ९ चित्रपटांना संगीत दिले. यातील काही सिनेमातील संगीत अतिशय क्लास दर्जाचं होतं.

‘झुमरू’ या चित्रपटातील ‘कोई हमदम रहा कोई सहारा ना रहा’, ‘ठंडीहवा ये चांदनी सुहानी’ हि गाणी अप्रतिम होती. ‘दूर गगन की छाव मे’ या चित्रपटातील ऑल टाइम हिट ‘आ चल के तुझे मे लेके चलू एक ऐसे गगन के तले’, ‘कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन’ आणि ‘दूर का राही’ या चित्रपटातील ‘बेकरार दिल तू गाये जा’ हे गाणे किशोर कुमार यांनी संगीतबद्ध करताना ते किती श्रेष्ठ दर्जाचे संगीतकार आहेत हेच सिद्ध केले. हे सर्व सिनेमे किशोर कुमार यांचे होम प्रोडक्शनचे होते. पण तुम्हाला माहिती आहे का किशोर कुमारने आपल्या संगीतमय कारकिर्दीत फक्त एका अशा चित्रपटाला संगीत दिलं जो चित्रपट त्यांच्या होम प्रोडक्शन चा नव्हता तर बाहेरच्या बॅनरचा होता. गंमत म्हणजे याच नावाचा एक सिनेमा ऐंशीच्या दशकात देखील आला होता आणि त्याचे देखील किशोर कुमार चे खूप चांगले कनेक्शन होते. कोणता होता तो चित्रपट आणि काय होते नेमके कनेक्शन?
================================
हे देखील वाचा : सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच कुणावर चित्रित झाले!
=================================
१९७२ साली ए वीरप्पन या दिग्दर्शकाने सुनील दत्त, रेखा, योगिता बाली यांना घेऊन एक चित्रपट निर्माण केला होता. चित्रपटाचं नाव ‘जमीन आसमान’. या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांनी किशोर कुमार यांना निमंत्रित केले. किशोर कुमार यांना देखील खूप आश्चर्य वाटले कारण संगीतकार म्हणून त्यांना पहिल्यांदाच दुसऱ्या कुठल्यातरी बॅनरच्या निर्मात्याने सिनेमा ऑफर केला होता. या सिनेमात किशोर कुमार यांनी तीन गाणी गायली होती. आशा भोसले यांची दोन गाणी होती तर लता मंगेशकर यांनी एक गाणं गायलं होतं. सत्तरच्या दशकाला साजेसं संगीत या चित्रपटातील गाण्याला होते. त्या काळात गाणी थोडीफार चालली पण चित्रपटाला मात्र यश मिळालं नाही. पण किशोर कुमार यांनी बाहेरच्या बॅनरचा केलेला चित्रपट ही नोंद मात्र नक्कीच झाली.

गंमत म्हणजे याच नावाचा म्हणजे ‘जमीन आसमान’ नावाचा सिनेमा १९८४ साली आला होता. भरत रंगाचारी यांनी या चित्रपटाचा दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात संजय दत्त, अनिता राज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांचे होते. १९७२ सालच्या ‘जमीन आसमान’चा नायक सुनील दत्त होता तर १९८४ सालच्या ‘जमीन आसमान’चा नायक संजय दत्त होता. पिता पुत्र या दोघांनाही आवाज मात्र किशोर कुमार यांचाच होता! संजय दत्त यांच्या ‘जमीन आसमान’ चित्रपटाची गाणी श्रवणीय होती.
================================
हे देखील वाचा : ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित Amitabh-Jaya Bachchan यांचा हा सिनेमा अर्धवट का राहिला?
=================================
यातील लता मंगेशकर यांचे क्लासिक ‘ऐसा समा न होता…’ हे गाणं फार सुंदर होते. दोन्ही चित्रपटांचे संगीत चांगले असूनही दुर्दैवाने दोन्ही चित्रपटांना व्यावसायिक यश मात्र फारसं मिळालं नाही. पण संगीत प्रेमींना मात्र दोन्ही चित्रपटाची गाणी आवडली. किशोर कुमार यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये चार लग्न केली होती. सुरुवातीला रुमा घोष, नंतर मधुबाला सोबत, त्यानंतर योगिता बाली आणि शेवटी लीना चंदावरकर सोबत. पैकी तिघींसाठी सिनेमे बनवले. या सिनेमात भूमिका केल्या. मधुबाला सोबत ‘झुमरू’, योगिता बाली सोबत ‘शाबाश डॅडी’ आणि लीना चंदावरकर सोबत ‘ममता की छाव में’!