Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

कबीर सिंग: या चित्रपटात शाहिद – कियारा पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा आले होते एकत्र 

 कबीर सिंग: या चित्रपटात शाहिद – कियारा पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा आले होते एकत्र 
कहानी पुरी फिल्मी है मिक्स मसाला

कबीर सिंग: या चित्रपटात शाहिद – कियारा पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा आले होते एकत्र 

by मानसी जोशी 19/09/2022

शाहिद कपूरसाठी 2019 हे साल खास ठरलं ते त्याच्या कबीर सिंग (Kabir Singh) या चित्रपटामुळे. या चित्रपटाबद्दलचे समीक्षकांचे रिव्ह्यू तसे फारसे चांगले नव्हते. पण या तरीही कबीर सिंगला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आणि हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकब्लस्टर हिट चित्रपट ठरला. चित्रपटाच्या यशामध्ये गाणी आणि गोड चेहऱ्याची कियारा अडवाणी हिचाही वाटा होताच, पण तरीही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला तो सणकी प्रेमी कबीर सिंग. 

कबीर सिंग हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक होता. चित्रपटाची कहाणी म्हणजे फक्त आणि फक्त लव्ह स्टोरी. कॉलेजचे दिवस, पहिलं प्रेम, रॅगिंग, घरातून होणारा विरोध या टिपिकल कथेला सणकी नायकाचा तडका मारून एक हटके कथा सादर केली. हीच गोष्ट प्रेक्षकांना खास करून तरुण वर्गाला विशेष भावली. आजच्या तरुणाईला गुडी गुडी नायक आवडत नाही, तर थ्री इडिटच्या रांचो सारखा खट्याळ किंवा कबीर सिंग सारखा सणकी पण रोमँटिक नायक विशेष भावतो. आणि म्हणूनच तरुणाईने कबीर सिंगला भरभरून प्रतिसाद दिला. 

कॉलेजला रॅगिंग करणारा, गर्लफ्रेंडच्या कानाखाली आवाज काढणारा, तिच्या घरी जाऊन राडा करणारा, ब्रेकअप नंतर दिवसरात्र दारूच्या नशेत आणि सिगारेटच्या धुरात बुडालेला कबीर सिंग तरुणाईच्या पसंतीस उतरला. मुख्य म्हणजे यामध्ये तो ‘कॉलेज बॉय’ वाटतोय. म्हणूनच त्याला प्रेक्षकांनी स्वीकारलं. चाळिशीतले नायक कॉलेज बॉय म्हणून स्वीकारायला आजचा प्रेक्षक तयार नाही. कबीर सिंगच्या भूमिकेसाठी शाहिदने तब्बल १४ किलो वजन कमी केलं होतं. लुक्ससोबत अभिनयामध्येही शाहिदने बाजी मारली. २०१६ साली आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटानंतर सुपरहिट चित्रपटासाठी शाहिदला तब्बल तीन वर्ष वाट पाहायला लागली. कबीर सिंगच्या यशाने त्याच्या कारकिर्दीची बुडती नौका तर सावरलीच शिवाय त्याचा भावही वधारला. 

कबीर सिंगने बॉलिवूडच्या नायक – नायिकेच्या टिपिकल संकल्पनेला छेद दिला आहे. विचित्र स्वभावाचा नायक आणि लग्नाआधी प्रेग्नन्ट होणारी नायिका यामध्ये दाखवण्यात आली आणि प्रेक्षकांना हे अगदी सहज स्वीकारलं. चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीच. इथे मात्र ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’चा अनुभव कबीर सिंग देतो, असं म्हणावं लागेल. आता थोडंसं चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान घडलेल्या किस्स्यांबद्दल (Lesser Known Facts about Kabir Singh)-

शाहिद कपूर होता दिग्दर्शकाची पहिली निवड 

चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी जेव्हा ‘उडता पंजाब’चं ट्रेलर पाहिलं तेव्हाच शाहिद कपूरला मुख्य भूमिका देण्याचा ठरवलं होतं. जेव्हा कबीर सिंगचं कास्टिंग सुरु झालं तेव्हा त्यांनी शाहिदला भेटून त्याला स्क्रिप्ट ऐकवली. शाहिदला स्क्रिप्ट आवडली आणि त्याने होकार दिला. शाहिदचा होकार आल्यावर संदीप रेड्डींनी त्याला त्वरित साइन केलं. 

निर्मांत्यांची पसंती होती अर्जुन कपूर 

कबीर सिंगच्या निर्मात्यांपैकी एक अश्विन वर्दे यांची मुख्य भूमिकेसाठी पहिली पसंती होती ती अर्जुन कपूरला. पण संदीप वंगा यांनी शाहिद कपूरला आधीच साइन केलेलं असल्यामुळे त्यांनी आपला विचार बाजूला ठेवला. आणि अर्थातच हा सुज्ञपणा शाहिदने सार्थ ठरवला.  (Lesser Known Facts about Kabir Singh)

संदीप रेड्डी यांच्या मुलाचं नाव 

दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी त्यांच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्यांना मुलगा झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मुलाचं नाव ठेवलं – ‘अर्जुन’. म्हणजे त्यांच्या मुलाचं पूर्ण नाव आहे ‘अर्जुन रेड्डी’.  जे चित्रपटाचं नाव आहे. संदीप वंगा रेड्डी यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. 

शाहिद कपूरचे लुक्स आणि चित्रीकरण 

चित्रपटात शाहिद कपूरचे तीन मुख्य लुक्स दाखवण्यात आले आहेत. एक लांब केस आणि दाढी, दुसरा लांब केस आणि क्लीन शेव्ह, तर तिसरा क्लीन शेव्ह आणि बारीक केस. याच क्रमाने चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे.  (Lesser Known Facts about Kabir Singh)

==============

हे ही वाचा: ‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..

अमिताभ बच्चन यांनी मला ठार मारण्याच्या प्रयत्न केला; परवीन बाबी यांनी केला होता गौप्यस्फोट..

==============

शाहिद कपूर – कियारा पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा आले एकत्र 

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ‘उर्वशी’ या व्हिडिओ अल्बममधील एका गाण्यात एकत्र काम केले होते. हे गाणं कबीर सिंगचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणं चित्रपटामध्ये घ्यायचा विचार दिग्दर्शकांनी केला होता. परंतु ते चित्रपटाच्या थीमला शोभत नाही, असं शाहिदने सांगितल्यामुळे संदीप यांनी हा बेत रद्द केला . (Lesser Known Facts about Kabir Singh)

कबीर सिंग हा चित्रपट बघायचा असल्यास नेटफ्लिक्स व युट्युबवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDB वर ७ रेटिंग देण्यात आलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment Kabir Singh
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.