अनिल कपूरने केली होती यश चोप्रांची पंचाईत! चक्क सेटवर दिला काम करण्यास नकार…
हा किस्सा आहे नव्वदच्या दशकातील. त्यावेळी अभिनेता अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर केनिया मध्ये राकेश रोशन दिग्दर्शित ‘खेल’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी बोलता बोलता अनुपम खेर यांनी अनिल कपूरला ते चोप्रा यांच्या आगामी चित्रपटात भूमिका करत असल्याचे सांगितले. अनिल कपूरला देखील यश चोप्रा यांच्या चित्रपटात काम करायची इच्छा होती. तोवर त्याने त्यांच्या ‘मशाल’(१९८४), ‘विजय’(१९८८) आणि ‘लम्हे’(१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. (Lesser Known Story of Yash Chopra & Anil Kapoor)
केनियाहून परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तडक अनिल कपूर यश चोप्रांच्या ऑफिसमध्ये गेला आणि आपल्या आगामी चित्रपटात मला काम करण्याची इच्छा आहे असे सांगितले. यश चोप्रा यांनी अनिल कपूरला सांगितले, “तुझ्यासाठी या चित्रपटात सध्या तरी कुठलीही भूमिका नाही.” तरी अनिल कपूरचा हट्ट कायम होता. शेवटी चोप्रा म्हणाले “एक भूमिका आहे पण..” त्यांचे वाक्य संपायच्या आतच अनिल कपूर म्हणाला, “चालेल मला तीच भूमिका द्या.”
चोप्रा म्हणाले, “आधी ती भूमिका काय आहे हे ऐकून तर घे.” त्यावर अनिल कपूर म्हणाला, “मला काही ऐकून घ्यायचे नाही. मला ती भूमिका करायची आहे.” यश चोप्रा पुन्हा पुन्हा त्याला ती भूमिका ऐकून घेण्याचा आग्रह करत होते. पण अनिल कपूर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला काहीही करून यश चोप्रा यांच्या चित्रपटात काम करायचं होतं. (Lesser Known Story of Yash Chopra & Anil Kapoor)
सर्व युनिटला घेऊन यश चोप्रा राजस्थानच्या उदयपूरला गेले. तिथे गेल्यानंतर ज्यावेळी अनिल कपूरला त्याची भूमिका सांगितली गेली त्यावेळी त्याने ती भूमिका करायला नकार दिला कारण ती भूमिका होती, आमिर खान आणि सैफ अली खान यांच्या वडिलांची आणि चित्रपट होता ‘परंपरा’.
अनिल कपूर त्यावेळी हिंदी चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिका करत असताना अशी वडिलांची भूमिका कशी करणार? तो करायला तयार झाला नाही. यश चोप्रांनी त्याला सांगितले, “तरी मी तुला पुन्हा पुन्हा ती भूमिका काय आहे ते ऐकून घे म्हणत होतो. पण तू ऐकायला तयारच नव्हतास. आता मी कुणाला या भूमिकेसाठी बोलावणार?” पण अनिल कपूर ने ‘सॉरी’ म्हणून ती भूमिका करायला असमर्थता व्यक्त केली. (Lesser Known Story of Yash Chopra & Anil Kapoor)
यश चोप्रांसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. सर्व युनिट लोकेशनवर पोचलेलं होतं. या सर्वांचा अवाढव्य खर्च होत होता आणि अशावेळी अनिल कपूरने नकार दिला. खरंतर चूक अनिलची होती पण फटका चोप्रा यांना बसत होता. खरंतर आधी त्यांना या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफला घ्यायचे होते म्हणून मग त्यांनी राजस्थान मधून जॅकीला फोन करून तसे विचारले. पण त्या वेळेला जॅकी सुभाष घईंच्या एका चित्रपटात काम करत होता, म्हणून त्याने नकार दिला.
आता चोप्रांची काळजी आणखी वाढली. मग विचार करून रात्री त्यांनी अभिनेता विनोद खन्नाला सर्व प्रकार सांगितला. विनोद खन्नाने देखील मोठ्या मनाने मी शूटिंगला लवकरच येतो, असे सांगितले आणि चोप्रांच्या जीवात जीव आला. अशाप्रकारे ‘परंपरा’ या सिनेमात विनोद खन्नाची एन्ट्री झाली. अनिल कपूरवर मात्र यश चोप्रा खूप नाराज झाले आणि पुढे अनिल कपूर चोप्रांच्या कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. (Lesser Known Story of Yash Chopra & Anil Kapoor)
अनिल कपूर सोबत काम करायला मिळणार म्हणून आश्विनी भावेने हा सिनेमा साईन केला होता. पण त्याने नकार दिल्याने त्याच्या जागी विनोद खन्नाची वर्णी लागली. इकडे अश्विनी भावेची पंचाईत झाली. विनोद खन्नाची नायिका झाल्याने ‘माझ्यावर तसेच स्टॅम्पिंग होईल आणि नायिका म्हणून माझे करीयर गोत्यात यईल’, अशी तिला भीती वाटू लागली. पण यश चोप्राने तिला समजावले. त्यामुळे ती थांबली. पण चित्रपटाचे निर्माते फिरोझ नाडियादवाला मात्र अश्विनीवर नाराज झाले. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यानी त्यांच्या आगामी ‘राम शास्त्र’ मधून तिला डच्चू दिला. (Lesser Known Story of Yash Chopra & Anil Kapoor)
========
हे देखील वाचा – अभिनेता गोविंदाने कसा घेतला शाहरुख खानचा बदला?
========
हा सिनेमा मल्टी स्टारर होता. सुनील दत्त, विनोद खन्ना, अमीर खान, सैफ आली खान, रवीना टंडन, अश्विनी भावे, अनुपम खेर, रमैय्या, नीलम आदी कलाकार यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. संगीत शिव हरी यांचे होते, तर यातील नायिकांवर चित्रित सर्व गाणी लताने गायली होती. या सिनेमात खरंतर आधी नीलमची भूमिका दिव्या भारती करणार होती, पण तिच्या अकाली निधनाने ही भूमिका नीलमकडे आली. या चित्रपटाचे चित्रीकरण अजमेर राजस्थान येथील सुप्रसिध्द मायो कॉलेज मध्ये झाले. सर्व माल मसाला ठासून भरलेला असून ‘परंपरा’ हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला.