Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट

सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!

१५ ऑगस्ट ७५ ते सप्टेंबर ८०… तब्बल पाच वर्षे Sholay

Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही

Ghashiram kotwal Natak: ५२ वर्षांनंतर ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर; ‘हा’ प्रसिद्ध

Parinati Movie: छोटा पडदा गाजवल्यानंतर आता Akshar Kothari झळकणार ‘परिणती’ सिनेमात!

ऑन स्क्रीन बघितला पण ऑफ स्क्रीन Sholay पाहिलात का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली होती?

 Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली होती?
बात पुरानी बडी सुहानी

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली होती?

by धनंजय कुलकर्णी 06/06/2025

कलावंताची आपल्या कलेच्या प्रती प्रचंड आस्था असते. अभिनेत्री मधुबालाने एकदा मुंबईत भर पावसात, रस्त्यांवर पाणी साचलेले  असताना तब्बल चार किलोमीटरची पायपीट करून एक स्टुडिओ गाठला होता. शूटिंगला वेळेवर पोहोचता यावे आणि आपल्या अनुपस्थिती मुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून मधुबालाने हे साहस केले होते. सच्च्या कलेप्रती तिची असणारी तिची निष्ठा आणि आस्था या उदाहरणावरून दिसून येते. प्रचंड पावसात चालत जाण्याचे मधुबाला ने केलेले हे साहस अनेक वर्षे चर्चिले गेले. काही सिने मासिकात  देखील याचा उल्लेख आढळतो.  कोणता होता तो चित्रपट आणि काय होता तो नेमका किस्सा? (Bollywood )

अभिनेत्री मधुबाला तेव्हा म्हणजे १९४८ साली ए आर कारदार यांच्या ‘ दुलारी‘ या चित्रपटात काम करत होते.  या चित्रपटाचे शूटिंग कारदार स्टुडिओ लोअर परेल येथे होत असे.  २१  नोव्हेंबर १९४८ ला मधुबाला सांगितले गेले की उद्या सकाळी नऊची शिफ्ट आहे. तुम्ही वेळेवर उपस्थित रहा. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मधुबाला जेव्हा झोपेतून उठली आणि आजूबाजूला पाहिलं तेव्हा मुंबई सगळी बदलून गेली होती. त्या रात्री मुंबईमध्ये महाभयंकर असे चक्री वादळ येऊन गेले होते. सर्वत्र मुसळधार पाऊस झाला होता. रस्ते पाण्याने पूर्णपणे भरून गेले होते. वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. (Entertainment)

खरंतर हा बेमोसमी  पाऊस होता पण या पावसाने मुंबईकरांचे कंबरडे मोडले होते. (हवामान खात्याच्या वेबसाईटवर देखील आपल्याला या २२ नोव्हेंबर १९४८ च्या चक्रीवादळाची माहिती मिळते!) मधुबालाकडे त्या वेळेला गाडी नव्हती. ती टॅक्सीने सगळीकडे फिरत होती. पण त्या दिवशी रस्त्यावर एकही टॅक्सी दिसत नव्हती. कारदार यांच्या सिनेमात ती पहिल्यांदाच काम करत होती. कारदार यांचे नाव त्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार मोठे होते. मधुबाला त्या मानाने नवीन होती.  त्यामुळे पाऊस असला तरी जाणे गरजेचे होते. (Entertainment news in marathi)

================================

हे देखील वाचा: Shahu Modak : या खिश्चन कलावंताने २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली!

=================================

टॅक्सी नाही म्हणून तिने थोडं लवकर निघून बेस्ट बसने जायचा विचार केला. मधुबाला आणि तिचे वडील अताउल्लाखान दोघे छत्री घेऊन बस स्टॉप वर उभे राहिले. बस भरभरून येत होत्या. मधुबाला तेव्हा बांद्रा येथे रहात होती.  त्या गर्दीतच मधुबाला बस मध्ये चढली. परंतु दादरला खोदादाद सर्कल  येथे आल्यानंतर ही बस पुढे जाणार नाही असे सांगितले गेले. कारण संपूर्ण रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी आले होते.(Bollywood news)

मधुबाला आणि तिचे वडील खोदादाच सर्कललां  उतरले आणि तिथून चक्क चालत पाण्यातून वाट काढत ते दोघे लोअर परेल ला जायला निघाले. चार किलोमीटरचे  अंतर त्यांनी पुढच्या दीड तासात पार केलं आणि सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ते कारदार  स्टुडिओच्या दारात पोहोचले. त्यांना तिथे पाहून वॉचमनला प्रचंड आश्चर्य वाटलं. कारण मुंबईतील महाभयंकर चक्रीवादळामुळे कुणीही तिथे पोहोचले नव्हते. कारदार साहेबांनी पुढचे तीन दिवस शूटिंग बंद राहील असे सांगितले होते. मधुबाला आणि तिच्या वडिलांकडे आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. (Classic movies)

पुन्हा तसाच द्राविडी  प्राणायाम करत ते खोदादाद सर्कल कडे निघाले. फक्त जाताना ते वॉचमनला  सांगितलं की आम्ही येऊन गेलो असे सांगा. चार दिवसांनी जेव्हा मधुबाला पुन्हा स्टुडिओत गेली त्या वेळेला कारदार साहेबांनी तिचे कौतुक केले. एवढ्या पावसामध्ये तुम्ही स्टुडिओत आला याबद्दल आभार मानले. मधुबाला म्हणाली की,”माझ्या न येण्या मुळे तुमच्या शूटिंगमध्ये व्यत्यय नको म्हणून मी आले होते!”  मधुबालाची कामाप्रती असलेले आस्था बघून कारदार यांच्या डोळ्यात पाणी आले!(Indian Cinema)

================================

हे देखील वाचा: Meena Kumari : जेव्हा एका डाकूने चाकूने मीना कुमारीचा ऑटोग्राफ घेतला!

=================================

जाता जाता  थोडंस ए आर कारदार यांच्या ‘दुलारी’ या चित्रपटाबाबत. मधुबाला,जीताबाली,सुरेश अभिनित हा एक म्युझिकल हिट सिनेमा होता. यातील अकरा गाण्यांपैकी आठ गाण्यात लताचा स्वर होता.म. रफी यांचे सदाबहार ‘सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे ‘ हे गाणे याच चित्रपटात होते. (Madhubala Movies)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress madhubala Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News Madhubala
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.