ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे

Mahesh Manjrekar : “सत्याला अभिनय करु नको असा सल्ला दिला कारण…”
मराठी मनोरंजनविश्वातील एक मोठं नाव म्हणजे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). आजवर त्यांनी मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही विविधांगी भूमिका साकारल्या. तसेच, वास्तव, कुरुक्षेत्र या हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन करुन त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली. मात्र, वडिलांप्रमाणे सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) अभिनयात थोडा कमी पडला असं दिसून आलं. यावरच नुकतं महेश मांजरेकर स्पष्टपणे व्यक्त झाले असून, “मीच सत्याला अभिनय करु नको असं म्हटलं”, आहे असं ते म्हणाले. (Bollywood tadaka)

काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सत्या मांजरेकरबद्दल ते म्हणाले की, “सत्या खूप चांगला खूप आहे. तो सध्याच्या समाजात खूप मिसफिट आहे. त्याला कोणाबद्दल वाईट विचार करता येत नाहीत. त्याला काही झालं तर तो भावूक होतो. शाळेत असल्यापासून त्याला ADHD आहे. शिकण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम यायचा. पण तो खूपच भोळा आहे. तो ठरवून कोणालाच दुखावत नाही. आणि चुकून जर चिडला तर खूप चिडतो”. (Marathi film industry)
पुढे मांजरेकर म्हणाले, “तो आहे तसा मला आवडतो. तसाच पुढे तो राहावा. आम्ही दोघे मित्रासारखे आहोत. मी त्याला अभिनय करु नको असं सांगितलंय. मला जरा जरी वाटलं असतं ना की, हा जबरदस्त अभिनेता आहे तर मी त्याला समजावलं असतं. पण सध्या त्याला मी बिझनेस सांभाळायला सांगितला असून त्याने माझं ऐकलंय. रात्री-अपरात्री कोणत्याही मुलाने मला हाक मारली तर मी त्यांच्यासाठी असतो. कारण माझ्या मुलांच्या बाबतीत खूप पझेसिव्ह आणि सेंटिमेंटल आहे.” (Entertainment update)

सध्या मुलांसोबत आई-वडिलही इंडस्ट्रीत काम करत असतील तर मुलांना त्यांच्या कामावरुन आई-वडिलांसबोत तुलना करुन ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, “जेव्हा माझ्या मुलांना कोणी ट्रोल करतं ना तेव्हा माझी तार जाते. माझ्या काम केलेल्या पिक्चरबद्दल बोला. तुम्हाला नाही आवडलं तर काहीही बोला मला काय फरक पडत नाही. पण पर्सनल जाल तर मी तुम्हाला शोधेन. जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत तुम्हाला शोधेन. माझ्या मुलांना काही बोलायचं नाही. त्यांचं काही घेणंदेणं नाही. तुम्ही त्यांना का ट्रोल करत आहात?” अशा शब्दात महेश मांजरेकरांनी सुनावलं. (Bollywood news)

================================
हे देखील वाचा : Jhimma 2 : थिएटरमध्ये धमाकूळ घातल्यानंतर दीड वर्षांनी ‘झिम्मा २’ चा World television premiere
=================================
दरम्यान, सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. आणि यापूर्वी सत्या ‘जाणीवा’, ‘FU: Friendship Unlimited’, ‘पोर बाजार’, ‘आई’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात झळकला असून ‘अंतिम:द फायनल ट्रुथ’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’, ‘१९६२ : द वॉर इन द हिल्स’ या चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. सध्या तो ‘सुका सुखी’ हे त्यांचं हॉटेल सांभाळत आहे. (satya Manjrekar movies)