Jhimma 2 : थिएटरमध्ये धमाकूळ घातल्यानंतर दीड वर्षांनी ‘झिम्मा २’

Mangalashtaka Returns :’मंगलाष्टका रिटर्न्स’; मोठ्या पडद्यावर झळकणार एका घटस्फोटाची गोष्ट
आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ (Mangalashtaka Returns) या चित्रपटात पाहायला मिळणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Entertainment news)

‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ ही अनोखी टॅगलाइन असलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटाचा धमाल ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष अनेक चित्रपटांतून पाहायला मिळाला असला, तरी सेलिब्रेशन करून घटस्फोट घेण्याची वेगळीच कल्पना मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात आहे. म्हणूनच सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही टॅगलाइन या चित्रपटाला नेमकी लागू पडते. (Marathi upcoming movies 2025)
================================
=================================
वीरकुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत. (Mangalashtaka Returns movie cast)