Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Sachin Chandawade : २५ वर्षीय मराठी अभिनेत्याने चित्रपट रिलीजपूर्वीच संपवलं आयुष्य
मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे… काही दिवसांपूर्वीच झुंड चित्रपटातल्या प्रियांशुची हत्या झाली होती आणि आता मराठीतल्या २५ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये… सचिन चांदवडे असं या अभिनेत्याचं नाव असून लवकरच तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या प्रोजेक्ट्समध्ये तो झळकणार होता… सचिन हा अभिनयासोबतच पुण्यात आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरीलाही होता… पण चित्रपट आणि सीरीज रिलीजच्या मार्गावर सताना त्याने आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजलं नाहीये…

मिळालेल्या माहितीनुसार,सचिनने त्याच्या राहत्या घरात घळफास लावून आत्महत्या केली… घरच्यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं पण अखेर त्याचा प्राण गेलाच… मुळचा जळगावचा असलेल्या सचिनला अभिनयाची आवड असल्याने त्याने सिनेमात करिअर करण्याचा निर्णय घेतला.सचिनने ‘विषय क्लोज’ या सिनेमातही काम केलं होतं. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे चित्रपट किंवा सीरीजमध्ये तो कामं करत असताना कलावंत ढोल ताशा पथकातही तो सक्रीय होता. जळगावमधील उभरता कलाकार म्हणून सचिनचं कौतुक व्हायचं. परंतु सचिनच्या आत्महत्येने सर्वांना चांगलाच धक्का बसलाय.
================================
================================
सचिनने स्वतःचं आयुष्य संपवल्याने जळगाव जिल्ह्यातील एक मेहनती, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने त्याचे चाहते हळहळ व्यक्त करतायत… जळगावच्या या होतकरु अभिनेत्याने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण न समजल्यामुळे बरेच तर्क वितर्क लावले जात आहेत… परंतु, अभिनयात काहीतरी नवं करु पाहणाऱ्या नव्या दमाच्या कलाकारांची इंडस्ट्रीला गरज आहे हे देखील तितकंच सत्य आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi