Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Cannes film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स डेब्यू !
“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज….” आज ‘झिम्मा’ (Jhimma) चित्रपटातलं हे गाणं विशेष आठवतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes Film Festival 2025) जगभरातील कलाकार हजेरी लावतात. एखाद्या दिग्दर्शक, कलाकार किंवा निर्मात्याचा चित्रपट कान्समध्ये प्रिमीयर झाला म्हणजे भारतीय चित्रपटांच्या यादीत त्या चित्रपटाला फार महत्वाचं स्थान मिळतं. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीने अटकेपार झेंडा रोवला आहे. मराठीतील ४ चित्रपटांचं कान्समध्ये स्क्रिनिंग झालं असून छाया कदम (Chaya Kadam) पाठोपाठ आता आणखी एका मराठमोळया अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेट कार्पेटवर एन्ट्री केली आहे.(Entertainment)

मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नेहा पेंडसे (Neha Pendse) हिने नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत आपल्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. ब्लॅक गाऊनमध्ये नेहा स्टनिंग दिसतेय. पहिल्यांदाच कान्समध्ये गेलेल्या नेहाने आपल्या भावना सांगताना म्हटलं की, “प्रत्येक कलाकारासाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असतं आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला माझा लूक हा थोडा खास ठेवायचा होता पण सोबतीने तो कसा वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला आणि मनीष घरतने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली”.(Bollywood news)
================================
हे देखील वाचा: OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!
=================================
दरम्यान, नेहा पेंडसे हिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर नेहाने आपल्या अभिनयाची सुरुवात १९९५ साली आलेल्या ‘कॅप्टन हाऊस’ हा हॉरर शो मधून केली होती. त्यानंतर ‘पडोसन’, ‘मीठ-मीठी बातें’, ‘पिंपळपान’, ‘खुशी’, ‘श्श… कोई है’, ‘घर एक मंदिर’, ‘भाभीजी घर पर है’, ‘मे आय कमइन मॅडम’?, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘प्यार कोई खेल नही’, देवदास’, ‘गोलमाल’, ‘शर्यत’, ‘नटसम्राट’, अशा अनेक हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपट आणि मालिकांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Neha Pendse movies)