
OTT Release : कॉमेडी ते भयपट, ओटीटीवर ‘हे’ चित्रपट होणार रिलीज
थिएटरप्रमाणे घरबसल्या ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्म्सवर विविध विषयांवर आधारित चित्रपट, वेब सिरीज दर आठवड्याला रिलीज होत असतात. मार्च महिन्याची सुरूवात देखील हिंदीसह तमिळ, तेलुगू वेब सिरीज आणि चित्रपटांनी होणार आहे. कॉमेडी ते ऍक्शन जाणून घेऊयात नेमके कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार….(OTT release)
नादानियाँ
दिल्लीतील एक समाज सेविका आणि मध्यमवर्गीय कॉलेजच्या मुलाची अनोखी कथा नादानियाँ या चित्रपटात उलगडणार आहे. या चित्रपटात इब्राहिम अली खान, खुशी कपूर, महिमा चौधरी, सुनील शेट्टी, जुगल हंसराज व दिया मिर्झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (March 2025 OTT release)

दुपाहिया
दुपाहिया ही एक हिंदी वेब सीरिजमध्ये एक गावाची कथा मांडण्यात आली आहे. एक असं गाव जिथे २५ वर्षे गुन्हेगारीमुक्त राहिल्याचा वर्धापनदिन साजरा करण्याची तयारी सुरू आहे. पण, त्या गावात अचानक एक दुचाकी गायब होते आणि सर्व जण ही दुचाकी शोधण्याच्या कामाला लागतात. नेमकं घडतं काय हे पाहण्यासाठी दुपाहिया प्राईम व्हिडिओवर नक्की पाहा. या चित्रपटात कोमल कुशवाहा, स्पर्श श्रीवास्तव, गजराज राव, Renuka Shahane व यशपाल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Upcoming web series)
विदामुयार्ची
विदामुयार्ची हा तमिळ चित्रपट असून, त्यामध्ये एका विवाहित जोडप्याची कथा दाखविण्यात आलीये. जोडपं फिरायला गेलं असताना त्यांच्या जीवनात एक वेगळं वळण येतं. काय आहे तो अडथळा नक्की पाहा नेटफ्लिक्सवर. या चित्रपटात अजित कुमार, त्रिशा कृष्णन, अर्जुन सरजा, अर्जुन दास व अरुण विजय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
============
हे देखील वाचा : Crazxy Movie Review : सोहम शहाचा ‘क्रेजी’ आहे तरी कसा?
============
द वॉकिंग ऑफ अ नेशन
द वॉकिंग ऑफ अ नेशन सिरिजची कथा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या सीरिजमध्ये साहिल मेहता, मान सिंह करामाती, राज जादोन व तारुक रैना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
थंडेल
थंडेल या तेलुगू चित्रपटात श्रीकाकुलममधील एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीची कथा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात नागा चैतन्य, Sai Pallavi, दिव्या पिल्लई, प्रकाश बेलावाडी, किशोर राजू वशिष्ठ व कल्पा लथा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
