
“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या कलाकारांशी मराठीत संवाद
हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) याला एकदातरी भेटायची प्रत्येक भारतीयाची इच्छा असतेच. मग यात मराठी कलाकार देखील मागे कसे पडतील. नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांची परदेशात रोहित शर्माशी अचानक भेट झाली. यावेळी हे कलाकार थेट तुमच्या घरातून या त्यांच्या नाटकासाठी परदेशात गेले होते आणि त्यावेळी त्यांना हा सुंदर योगायोग घडला. रोहितने कलाकारांशी गप्पा मारल्या असून त्यांच्यासोबत मराठीतच संवाद साधला. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. (Entertainment News)

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार नम्रता संभेराव , प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर यांच्यासह अभिनेत्री भक्ती देसाई, भाग्यश्री मिलिंद यांची सुपरस्टार क्रिकेटर रोहित शर्मासोबत भेट झाली. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय देसाई, किशोर लाड आणि वर्षा हडकर यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी रोहितने त्यांच्यासोबत मराठीतून संवाद साधला आणि सगळेच भारावून गेले. (Maharashtrachi Hasyajatra)
नम्रता संभेराव हिने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअऱ केला असून नम्रता संभेरावने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ‘आम्ही तुमचे मराठीमध्ये बोलतानाचे व्हिडिओ बघतो’, असं नम्रता संभेराव रोहित शर्माला म्हणाली, त्यावर “मुंबईमध्ये राहतो, मराठी यायला पाहिजे,” असं रोहित म्हणाला आहे.
================================
================================
यापूर्वी देखील रोहित शर्मा मराठीत बोलल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. अमराठी असूनही अस्खलित मराठीत बोलणारा रोहित कायमच लोकांना भारावून टाकतो. बऱ्याचदा तो त्याच्या आजूबाजूला असलेल्या स्टाफ सोबतही मराठीत बोलताना दिसतो. (Rohit Sharma and Marathi Language)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi