MyLek Official Trailer: आई-मुलीतील केमिस्ट्री उलगडणारा ‘मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर…
‘मायलेक‘ आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आणि या सिनेमात प्रेक्षकांना रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय. या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.(MyLek Official Trailer)
ट्रेलरमध्ये आईमुलीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसतेय. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्मिती या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री ‘मायलेक’मधून पाहायला मिळणार असून येत्या १९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ”हा चित्रपट प्रत्येक आईमुलीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असे हे नाते आहे. हे नाते कधी मैत्रीचे असते तर कधी एका वेगळ्याच वळणावर जाते. त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणे खूप गरजेचे आहे.
===================================
हे देखील वाचा: मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज!
===================================
‘मायलेक’मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील ‘मायलेकी’ची ही जोडी आहे. ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहेत. त्यामुळे ‘मायलेक’ तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटेल. माझे आणि सनायाचे नातेही असेच आंबटगोड आहे. त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणे सहज शक्य झाले. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.”