‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Naga Chaitanya ची लव्हस्टोरी; समंथाशी घटस्फोट आणि शोभिताची एन्ट्री…
बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री, नवे कोणते चित्रपट येत आहेत हा विष्य जरी चर्चेचा असला तरी कोणत्या सेलिब्रिटीचं कुणाशी सुत जुळलं आहे हे जाणून घेण्याची लोकांना अधिक उत्सुकता असते… असंच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ट्रेण्डिंग कपल म्हणजे नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala)… समंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी लग्नगाठ बांधली… पण नेमकी दोघांनी लव्हस्टोरी कशी सुरु झाली याबद्दल आता स्वत: नागा चैतन्यनेच खुलासा केला आहे… (Tollywood News)

जगपति बाबू यांच्या झी ५ टॉक शोमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता यांनी हजेरी लावली होती… तेव्हा नागा चैतन्यने त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात सर्वात आधी इन्स्टाग्रामवर झाली होती असं सांगितलं…. तसंच, याआधी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी लव्हस्टोरीचा खुलासा केला होता. २०१८ मध्ये नागार्जुनच्या घरी सर्वात आधी दोघांची भेट झाली होती. मात्र तेव्हा फार बोलणं झालं नाही. त्यांच्या नात्याची खरी सुरुवात नागा आणि समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) घटस्फोटाच्या एक वर्षानंतर म्हणजे २०२२ मध्ये झाली.. शोभिताने नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं. मग त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या. तेलुगू भाषेमुळे ते एकमेकांशी जोडले गेले. मग मुंबईत कॉफी डेट आणि भेटीगाठी वाढल्या आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ऑगस्ट २०२४ मध्ये नागाने शोभिताला प्रपोज केलं. (Naga Chaitanya and Shobhita Dhulipala love story)

नागा चैतन्य म्हणाला की, “आम्ही इन्स्टाग्रामवर जास्त कनेक्ट झालो. माझी जोडीदाराशी इन्स्टाग्रामवर ओळख होईल असा मी विचारच केला नव्हता. मला तिचं काम माहित होतं. एक दिवस मी क्लाउड किचनबद्दल पोस्ट केली तेव्हा तिने इमोजी कमेंट केली. मग आमचं बोलणं सुरु झालं आणि आम्ही भेटलो.”
================================
हे देखील वाचा : Rajinikanth यांच्या ‘त्या’ फोटोमागचं रहस्य!
=================================
दरम्यान, आजवर नागा चैतन्य आणि शोभिता यांनी एकंही एकत्रित चित्रपट केला नाही… तर, नुकताच काही महिन्यांपूर्वी नाना चैतन्य आणि साई पल्लवी यांचा Thandel हा चित्रपट आला होता… या व्यतिरिक्त ‘कस्टडी’, ‘लाल सिंग चड्डा’, ‘थॅंक्यु’, ‘लव्ह स्टोरी’, ‘वॅंकी मामा’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… (Naga Chaitanya mlovies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi