Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात

Nana Patekar : ‘वेलकम’ चित्रपटातील डॉन उदय शेट्टी दिग्दर्शकांना कसा सापडला?
“आलू ले लो, कांदा ले लो” किंवा “कंट्रोल उदय कंट्रोल”; हे डायलॉग कानांवर ऐकू आले की ‘वेलकम’ (Welcome Movie) चित्रपट आणि त्यात नाना पाटेकरांनी (Nana Patekar) साकारलेली उदय शेट्टी ही भूमिका डोळ्यांसमोर उभी राहते. नानांनी आजवर गंभीर भूमिका अधिक साकारल्या. पण त्यांनीच आपल्या अभिनयाची ठराविक चौकट मोडून काढत २००७ मध्ये त्यांनी ‘वेलकम’ हा चित्रपट केला आणि उदय शेट्टी ही भूमिका अजरामर केली. मात्र, नेमकी ही भूमिका आणि चित्रपट नाना पाटेकर यांना कसा मिळाला त्याचा एक किस्सा आहे. वाचा… (Bollywood gossips)

मुळात चित्रपटांमध्ये येण्याचं स्वप्न कधीच न पाहणारे नाना आपल्या रंगभूमीवर आनंदी होते. पण ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी नाना पाटेकर यांना चित्रपटसृष्टीत आणलं. १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून त्यांचा हिंदी चित्रपटांचा प्रवास सुरु झाला तो आजतागायत सुरुच आहे. तर ‘वेलकम’ चित्रपटातील उदय हे पात्र नानांची इमेज पुर्णपणे बदलवून टाकणारं होतं. डॉन उदय शेट्टीची भूमिका कशी मिळाली याबद्दल दिग्दर्शक अनीस बाझ्मी यांनी एक किस्सा सांगितला होता. (Welcome movie untold story)

तर, कपिल शर्मा शोमध्ये त्यांनी ‘वेलकम’ चित्रपटात नाना पाटेकर यांना कास्ट करणं जरा कठिण होतं असं सांगितलं. नानांशिवाय उदय शेट्टी ही भूमिका कुणी करुच शकलं नसतं असंही अनीस म्हणाले होते. अनीस म्हणाले की, “मी सुरुवातीपासूनच नाना पाटेकरांचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे, मला सुरुवातीपासूनच माहित होतं की ते गंभीर भूमिका खूप चांगल्या प्रकारे करतात. पण ज्या दिवशी ते विनोदी भूमिका करतील, त्या भूमिकाही ते खूप चांगल्या प्रकारे करतील.” (Entertainment news)
==============
हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
==============
पुढे ते म्हणाले, ‘मी नानांना फोन केला आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी मला का असं विचारलं? मी म्हणालो की मला तुम्हाला एका चित्रपटाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणाले ये. आणि मी त्यांना भेटायला गेलो. जेव्हा मी त्यांना सांगितले की हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. ते ऐकताक्षणी नाना म्हणाले मला कथा ऐकायची नाहीये. तू तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की हा चित्रपट माझ्यासाठी योग्य आहे आणि मी तो करायला हवा. त्यावर मी म्हणालो तुम्ही एकदा कथा ऐका”. (Nana patekar news)

कथा सांगायला साडेतीन तास लागणार होते पण नाना म्हणाले की ३ तास आहेत गोष्ट सांग. अखेर अनीस यांनी वेलकम चित्रपटाची संपूर्ण गोष्ट नाना पाटेकर यांना ऐकवली आणि ती ऐकताच नानांनी अनीस यांना मिठी मारली आणि ते म्हणाले की,”अनीस, मी कच्च्या मातीसारखा आहे, मी सेटवर येईन, तू मला तुला हव्या त्या आकारात घडवू शकतोस”. खरं तर नाना पाटेकर फार रागीट आहेत, त्यांच्यासोबत काम करणं कठिण आहे असं बरेच मेकर्स सांगतात. पण अनीस म्हणाले की, “नानांसोबत काम करताना मला कुठलाही त्रास झाला नाही. त्यांच्यासोबत काम करणं उलट सर्वात सोप्पं काम आहे”. (Bollywood update)
‘परिंदा’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘अब तक छप्पन’ अशा चित्रपटांमधील नाना पाटेकर ‘वेलकम’ चित्रपटात तसं पाहायला गेलं तर डार्क भूमिकाच सादर करताना दिसले होते पण तिला विनोदाची झालर होती. २००७ मध्ये आलेल्या ‘वेलकम’ (Welcome Movie) चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एकीकडे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या कॉमेडी चित्रपटांसमोर अनीस बाझ्मी यांनीही एक वेगळा प्रयत्न करुन पाहिला होता आणि तो यशस्वी झाला होता. वेलकम चित्रपटात अक्षय कुमार, कटरिना कैफ, अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल, मल्लिका शेरावत, फिरोज खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने ७०.१५ कोटींची कमाई केली होती. ओम शांती ओम या चित्रपटानंतर २००७ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) यांच्या ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) चित्रपटाने ७८.१६ कोटी कमावले होते. (Bollywood movies box office collection)

२००७ मध्ये आलेल्या ‘वेलकम’ चित्रपटाचा ‘वेलकम रिटर्न्स’ (Welcome Returns) हा एक भाग आला होता. पहिल्या भागाइतका दुसरा भाग खरं तर फार गाजला नाही. पण आता लवकरच वेलकम टु द जंगल हा तिसरा भाग २०२५ मध्ये येणार असून यात नाना पाटेकर दिसणार नाहीत. ज्यांनी खरं तर हा चित्रपट आणि उदय शेट्टी ही भूमिका मोठी केली तेच या चित्रपटात नसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. याबद्दल नानांनी देखील आपलं मत व्यक्त करत म्हटलं होतं की, “वेलकम टू द जंगल’ सिनेमासाठी मला विचारण्यात आलेलं नाही. आम्ही आता फार जुने झालो आहोत कदाचित त्यांना असं वाटत असेल”. (Welcome To The Jungle)