Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi मधून स्मृती इराणींचं कमबॅक; एका

Nora Fatehi बनली आंतरराष्ट्रीय गायिका; तिच्या सेक्सी व्हिडीओने घातला धुमाकूळ
बॉलीवूडची बोल्ड अदा असलेली नोरा फतेहीने तिच्या डान्स मूव्ह्सने जगभरातील चाहत्यांना वेड लावते. अभिनेत्री, डान्सरनंतर आता नोरा फतेही गायिका बनली असून तिचे पहिले म्युझिक व्हिडिओ गाणे ‘सेक्सी इन माय ड्रेस‘ रिलीज झाले आहे. नोरा फतेहीच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन चाहते हे गाणे आता ऐकू आणि पाहू शकतात. नोराचे हे गाणे चाहत्यांना खूप आवडत आहे, तिने या गाण्याला केवळ आवाजच दिला नाही तर स्वत: त्यात अभिनयसुद्धा केला केला आहे. आणि आता या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तासाभरातच या गाण्याला यूट्यूबवर 16 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. आणि आता त्याचे व्यूज वाढतच आहे त्यामुळे येत्या काळात नोराचं हे गाणं लाखो व्ह्यूजचा टप्पा गाठू शकते यात काही शंका नाही. चाहते तसेच चित्रपटसृष्टीतूनही नोराला तिच्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा मिळत आहेत.(Nora Fatehi)

नोराने Sexy in my dress चा टीझर आधीच शेअर केला होता. त्यामुळे तिचे चाहते तेव्हापासूनच या संपूर्ण गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. हे गाणं युट्युबवर रिलीज होताच ते ट्रेंडिंग झालं आहे. या व्हिडीओमध्ये नोराने एक पीस परिधान केला आहे. या गाण्याच्या पूर्वार्धात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आणि सेकंड हाफ मध्ये ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आपला स्वैग दाखवताना दिसत आहे. सर्वोत्कृष्ट डान्स मूव्ह्सने ती प्रत्येक चाहत्याचे मन जिंकण्याचे काम करत आहे.आपल्या डान्स आणि आवाजाच्या माध्यमातून नोराने म्युझिक व्हिडिओला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे, या गाण्याने तिने अनेक हॉलिवूड गायकांना टक्कर दिली आहे.

याबद्दल नोरा म्हणाते की, ‘गायिका म्हणून माझ्या करिअरमधील पहिल्या सोलो म्युझिक व्हिडिओ ‘सेक्सी इन माय ड्रेस’मधून नव्या वर्षाची सुरुवातकरणे माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग आहे .नोरा तिचं नवं गाणं रिलीज करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘सेक्सी इन माय ड्रेस’मधून तिने गायनाच्या करिअरच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. (Nora Fatehi)
=============================
हे देखील वाचा: सुहाना खान करणार शेती? २३ वर्षातच खरेदी केली करोडोंची जमीन
=============================
एका मुलाखतीदरम्यान नोरा म्हणाली होती की, ‘हे गाणे एक आंतरराष्ट्रीय गाणे आहे जे माझ्या आतील भावनेचे प्रतीक आहे आणि आम्ही लॅटिन पॉपचा माहौल राखुन ठेवला आहे. याशिवाय यातील सर्वांनी उत्तम काम केले. “मी याबद्दल खूप आनंदी आहे आणि लोकांना हा प्रकल्प आवडेल याची मला खात्री आहे” आज मला स्वत:चा खूप अभिमान वाटतो आणि या गाण्यावर सर्वजण नाचताना आणि माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करताना पाहण्यासाठी मी देखील उत्सुक आहे.