Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नाॅव्हेल्टी…कधी बिग हिट तर कधी बिग फ्लाॅप

 नाॅव्हेल्टी…कधी बिग हिट तर कधी बिग फ्लाॅप
टॉकीजची गोष्ट

नाॅव्हेल्टी…कधी बिग हिट तर कधी बिग फ्लाॅप

by दिलीप ठाकूर 02/12/2022

दक्षिण मुंबईत परिसरात जाणे झाले की, अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांची आठवण येतेच. परवा नाॅव्हेल्टी (Novelty Theater) थिएटरवरुन जाताना अगदी तेच झाले. एकेकाळी रविवार म्हणजे, अशा जवळपास सर्वच सिंगल स्क्रीन थिएटरवर हमखास हाऊसफुल्लचा फलक असणारच आणि कोणी ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट काढून तर कोणी एस्ट्राॅ तिकीट मिळतेय का या आशेवर गर्दीत उभा राही. यावेळी रविवार असूनही नाॅव्हेल्टीबाहेर शुकशुकाट तर होताच पण बंद असलेले मेन गेट, त्याला आलेले जुनाटपण, जाणवणारी एक प्रकारची उदासीनता, हटवले गेलेला मेन शो चे डिझाईन बोर्ड हे सगळेच पाहताना सगळेच निराशाजनक वाटत होते. माझी निराशा ओळखूनच एकाने म्हटले, येथील शेवटचा चित्रपट नसिरुद्दीन शाहचा कोणता तरी होता, आता नाव आठवत नाही…

हे ऐकत असतानाच माझे मन फ्लॅशबॅकमध्ये गेले...

नाॅव्हेल्टी (Novelty Theater) चित्रपटगृह हे सर्वप्रथम मी ऐकले ते माझ्या अगदीच लहानपणी येथे ‘मेरा नाम जोकर ‘ ( १९७०) प्रदर्शित झाला तेव्हा! कोणत्याही क्षेत्रातील एखादी गोष्ट प्रचंड गाजत असते तेव्हा समाजातील सर्वच स्तरात ती कमी अधिक प्रमाणात पोहचते. आणि तसे व्हायलाही हवेच. लोकसत्तामधील “मेरा नाम जोकर”च्या जाहिरातीतील दोन गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आहेत (लहानपणी वृत्तपत्र वाचनात मुलांच्या गोष्टींबरोबरच चित्रपट व क्रिकेट यावर थोडेफार वाचन होई. ) जोकरची नाॅव्हेल्टी थिएटरमधील शोची वेळ होती, सकाळी दहा, दुपारी साडेतीन आणि रात्री आठ वाजता. या चित्रपटाला दोन मध्यंतर असून तिकीट दर अप्पर स्टाॅल सात रुपये आणि बाल्कनी आठ रुपये. (आमच्या खोताची वाडीच्या समोरच असलेल्या मॅजेस्टीक थिएटरला त्या काळात स्टाॅलचे तिकीट पासष्ट पैसे होते हे माहीत असल्याने सात व आठ रुपये फारच जास्त होते.) आठवडाभरातच ‘जोकर ‘ची लांबी कमी करुन तिकीट दर एक व दोन रुपये केल्याचे जाहिरातीत म्हटल्याचे आठवतेय.
नाॅव्हेल्टी(Novelty Theater) थिएटरची मला झालेली ही पहिली ओळख. कधी कुटुंबासह ग्रॅन्ट रोड परिसरात गेलो की नाॅव्हेल्टीचे दर्शन होतानाच त्याच्या समोरच असलेल्या ट्रामचे रुळ दिसत. गवालिया टॅन्क ते माझगाव अशी ट्राम नाॅव्हेल्टीच्या समोरुन जात असे. पण आता ती बंद झाली होती आणि फक्त हे रुळ होते. तेही काही वर्षांनी काढले गेले. आज वयाच्या पासष्टीच्या आतबाहेरचे जुन्या आठवणीत रमतात तेव्हा त्यांना जुने नाॅव्हेल्टी थिएटर आणि साठच्या दशकाच्या उत्तरार्धात उत्तुंग इमारतीसह बांधलेले नवीन नाॅव्हेल्टी थिएटर व समोरुनच जाणारी ट्राम नक्कीच आठवते.

नाॅव्हेल्टीच्या काही वेगळ्या आठवणी सांगतो...

२३ नोव्हेंबर १९७३ रोजी येथे ‘नमक हराम ‘ प्रदर्शित व्हायच्या आदल्या रात्री याच नाॅव्हेल्टीत त्याचा भव्य दिमाखदार प्रीमियर रंगला. ( स्क्रीनमधील जाहिरातीत या प्रीमियरचा उल्लेख होता आणि विशेष म्हणजे ती आजही सोशल मिडियात पाहायला मिळतेय.)तो संपल्यावर कुलाबा येथील एका पंचतारांकित हाॅटेलमधील पार्टीसाठी जात असतानाच सिनेपत्रकार देवयानी चौबळने राजेश खन्नाला कल्पना दिली की, एक नवा सुपर स्टार जन्माला आलाय ( अर्थात अमिताभ बच्चन), राजेश खन्नाला या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसच याची जाणीव होत गेली होती व आता प्रीमियरनंतरच्या पार्टीला तो जाणीवपूर्वक उशिरा पोहचला. दरम्यान दक्षिण मुंबईत गाडी फिरवत राहिला. त्या काळातील हा सर्वाधिक वाचला गेलेला किस्सा आहे. अनेक गाॅसिप्स मॅगझिनमधून हे रंगवून खुलवून प्रसिद्ध होत गेले.

मिडियात आल्यावर मला नाॅव्हेल्टीची (Novelty Theater) आणखीन ओळख होत गेली. त्यात एक गोष्ट म्हणजे, यात बाल्कनीच्या शेजारीच असलेल्या मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचे अनेक शोज आयोजित केले गेले. तर कधी मेन थिएटरमध्ये एकादा चित्रपट दाखवत. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे”( १९९५) चे मुंबईतील मेन थिएटर न्यू एक्सलसियर होते. पण आम्हाला मात्र याच नाॅव्हेल्टीत यशराज फिल्म्सच्या वतीने त्यांच्या पाहुण्यांसह डीडीएलजे दाखवला. मला आठवतय दिवाळीचा दिवस होता तो. आणि हा गेस्ट व प्रेस अशा दोघांसाठी मेन हाॅलमध्ये शो आहे म्हणून चक्क आदित्य चोप्राने दुपारीच येऊन अतिशय छान डेकोरेशन केले होते…

नाॅव्हेल्टीच्या यशापयशाचा स्कोर कार्ड रंजक आहे. काही चित्रपट प्रचंड हिट ( रौप्यमहोत्सवी) तर काही दणदणीत फ्लाॅप झाल्याचे दिसेल.

सुपर हिट असे, जीने की राह, हाथी मेरे साथी, जैसे को तैसा, नमक हराम, मजबूर, स्वर्ग से सुंदर, नागिन, मोहरा, नगिना, प्यार झुकता नहीं, बडे मियां छोटे मियां, वगैरे

सुपर फ्लाॅप असे, मेरा नाम जोकर, दास्तान, मेहबूबा, शरीफ बदमाश, मेहबूब की मेहंदी, आशिक हू बहारों का, इमान धरम, साहिब बहादूर, डार्लिंग डार्लिंग, चांदी सोना, दो और दो पांच, शालिमार, दर्द, यतिम, सगिना , परंपरा वगैरे

नाॅव्हेल्टीतील विशेष उल्लेखनीय यश गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘अर्धसत्य’ ( १९८३) या चित्रपटाचे. या चित्रपटापासून समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यामधील अंतर कमी होत गेली..दोन्ही चित्रपटांच्या हुकमी प्रेक्षकांनी हा चित्रपट स्वीकारला. या थिएटर संस्कृतीत तो फिट बसला..

साधारण यशस्वी असे, राज ( राजेश खन्ना व बबिताचा पहिला चित्रपट), आदमी और इन्सान, मिली, जुर्माना, घर , लव्ह 86, आयना, यह दिल्लगी वगैरे

नाॅव्हेल्टीत (Novelty Theater) अनेकदा तरी नवीन चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होत. अरुणा विकास दिग्दर्शित ‘गहराई’ असाच मॅटीनी शोला यशस्वी ठरला. पद्मिनी कोल्हापूरेच्या पाठमोर्‍या दृश्याने गाजलेला पण तार्किकदृष्ट्या समतोल म्हणून हा चित्रपट गाजला. पद्मनाभ दिग्दर्शित ‘दो चोर ‘, के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘कामचोर’, प्रकाश झा दिग्दर्शित ‘मृत्युदंड’, येथेच मॅटीनी शोला यशस्वी ठरले. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘अंकुश’ही हिट ठरला. शंभर दिवसांची उत्तम घौडदौड झाल्यावर कसलीही कल्पना न देता थिएटर मॅनेजमेंटने ‘अंकुश’ काढल्याचे समजताच एन.चंद्रा थेट मातोश्रीवर गेले आणि बाळासाहेबांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी लगेचच प्रमोद नवलकरांना फोन करुन या सगळ्याची कल्पना देताच प्रमोद नवलकरांनी सूत्रे हलवली आणि ‘अंकुश’चा रौप्य महोत्सवी आठवड्यापर्यंतचा मार्ग मोकळा करुन दिला.

======

हे देखील वाचा : न्यू एक्सलसियर मिनी थिएटरचा नवीन अनुभव…

======

नाॅव्हेल्टीच्या(Novelty Theater) अशा अनेक आठवणी आहेत. आता त्या फक्त आणि फक्त आठवणीच तेवढ्या राहिल्यात. अन्यथा याही थिएटरचे शो केव्हाच थांबलेत. अगदी कार पार्किंगमधून स्टाॅलच्या तिकीटसाठी जाण्याचा रस्ताही उदास उदास वाटला….याच नाॅव्हेल्टीच्या समोरच्या फूटपाथवर हुसेनवाली बुकलेटवाला याची टपरी होती. येता जाताना मी तेथील तीस,चाळीस,पन्नासच्या दशकातील ब्लॅक अँड व्हाईट काळातील हिंदी चित्रपटांचे दुर्मिळ फोटो, पोस्टर, एकादे वृत्तपत्र अथवा मासिक पाह्यचो. मग मीही त्याच्याकडून जुने फोटो विकत घेऊ लागलो ( मोठ्या वृत्तपत्रात असलेल्या ‘ए ग्रेड’च्या सुविधा मला कधीच नव्हत्या त्यामुळेच मी अशा अनेक गोष्टींचे शोध घेऊ लागलो.) त्यातून त्याची मी दोनदा सविस्तर मुलाखत प्रसिद्ध केली. असे संबंध वाढल्यावर त्याने नाॅव्हेल्टीच्या अगदी शेजारच्याच गल्लीत असलेले त्याचे जबरा कलेक्शन पाहिले आणि थक्क झालो. संपूर्ण खोलीभर चित्रपट विषयक मटेरियल होते. अनेक फोटो, पोस्टर वगैरे वगैरे त्यात होते. नाॅव्हेल्टीत जाण्यापूर्वी मी या हुसेनीला भेटायचो..अतिशय नाॅर्मल वागणूक होती त्याची. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने हा सगळा डोलारा सांभाळला. कालांतराने हे सगळेच मागे पडत गेले. आणि आज ते नाॅव्हेल्टीच्या निमित्ताने आठवतेय.

दिलीप ठाकूर

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured movies rajesh khana theater
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.