Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!

 महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!
बात पुरानी बडी सुहानी

महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!

by धनंजय कुलकर्णी 02/12/2022

हिंदी सिनेमाच्या इतिहासात बऱ्याचदा असे होते की, मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या अपेक्षेने एखाद्या मोठ्या बिग बजेट सिनेमाची निर्मिती होते आणि त्या सिनेमाला अपेक्षित यश मिळत नाही. परंतु त्याच वेळी अगदीच किरकोळ अपेक्षा आणि बजेट ठेवून तयार केलेला चित्रपट अनपेक्षित रित्या प्रचंड यशस्वी होतो. हीच बॉलीवूडची खरी गंमत आहे! याचा अनुभव निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना सत्तरच्या दशकामध्ये आला होता. १९७२ साली  दिलीप कुमार – शर्मिला टागोर यांना घेऊन ‘दास्तान’ या चित्रपटाची निर्मिती केली.( वस्तुतः हा चित्रपट त्यांच्याच १९५१  साली  आलेल्या ‘अफसाना’ या चित्रपटाचा ऑफिशियल रीमेक होता!) परंतु या ‘दास्तान’ ला  प्रेक्षकांनी अजिबात साथ दिली नाही आणि हा सिनेमा फ्लॉप झाला. बी आर चोप्रा यांनी यानंतर एका लो बजेट चित्रपटाची निर्मिती सुरू केली. ख्यातनाम लेखिका अगास्था ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ‘द एक्स्पेक्टेड गेस्ट’ या कादंबरीवर त्यांनी ‘धुंद’ हा चित्रपट निर्माण करायचे ठरवले. एक जबरदस्त मर्डर मिस्ट्री असलेला हा सिनेमा होता.

या चित्रपटातील प्रमुख खलनायकाच्या भूमिकेसाठी डॅनीला घेतले होते. डॅनी(Danny Story)  यांनी अतिशय उत्तम भूमिका केली. त्यांच्या सिने कारकिर्दीतील कदाचित हा सर्वोत्कृष्ट रोल असावा. परंतु हा रोल त्यांना सहजासहजी मिळाला नाही. ’बहुत पापड बेलने पडे..’ कारण बी आर चोप्रा यांनी या भूमिकेसाठी सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना विचारले होते परंतु अमिताभ त्यावेळेला ‘जंजीर’ या चित्रपटात व्यस्त असल्यामुळे त्यांनी नकार दिला. पुढे ही भूमिका संजीव कुमार, शत्रुघन सिन्हा, मदनपुरी यांना विचारली गेली. पण काही कारणाने ही भूमिका त्यांच्यापर्यंत पोचली नाही. डॅनी (Danny Story) यांना भूमिका पहिल्यापासून आवडली होती आणि ती करायची इच्छा देखील होती परंतु बी आर चोप्रा यांना, डॅनी(Danny Story) या भूमिकेसाठी जास्त तरुण वाटत होते. १९६९ साली जेंव्हा  बी आर चोप्रा पुण्याच्या एफटीआय मध्ये गेले होते; त्यावेळी त्यांची नजर पहिल्यांदा पडली होती डॅनीवर. डॅनीने(Danny Story)  तिथे केलेल्या काही शॉर्ट फिल्म्स त्यांनी बघितल्या होत्या आणि त्यांनी त्याला  सांगितले होते की मुंबईला आल्यानंतर मला भेट. त्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॅनी(Danny Story) त्यांच्या ऑफिसमध्ये गेला त्यावेळी बी आर त्यांच्या ‘दास्तान’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त होते. त्यांनी डॅनी ला  सांगितले, “हा चित्रपट माझा फॅमिली ड्रामा आहे. इथे तुला कुठलीही भूमिका मिळणार नाही पण, आगामी माझ्या प्रोजेक्टमध्ये तुला नक्की भूमिका देईल.” 

त्यामुळे डॅनी(Danny Story)  बी आर चोप्रा यांना ‘धुंद’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना कायम भेटत असे. यश मिळत नव्हतं. पण म्हणतात ना ‘दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम…’ त्या पद्धतीने अखेर ही भूमिका डॅनीच्याच नशिबात होती. ती कशी मिळाली? याचा किस्सा खूप जोरदार  आहे. डॅनी त्याची  स्क्रीन टेस्ट द्यायला जेव्हा बी आर यांच्या ऑफिसमध्ये गेला त्यावेळी चोप्रा यांनी त्याला सांगितले,” ही भूमिका एका अपंग व्यक्तीची आहे. जो संपूर्ण चित्रपटात व्हीलचेरवर दाखवलेला आहे. तो अत्यंत रागीट आणि चिडका आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीवर त्याचा राग आहे. तो सायको आहे. त्याला प्रचंड राग आहे त्यामुळे तुला हे बेअरिंग सांभाळले पाहिजे. त्याचप्रमाणे तो टेबलवरील प्रत्येक वस्तू समोरच्याला फेकून मारत असतो हे तंत्र तुला सांभाळता आले पाहिजे!”  

स्क्रीन टेस्टच्या वेळेला त्याने टेबलवरील काही प्लेट्स समोर फेकून दाखवल्या. त्याचा त्वेष,द्वेष ,आवेश आणि चेहऱ्यावरील चिडका भाव पाहून बी आर चोप्रा यांचे बंधू छायाचित्रकार धरम चोप्रा यांनी ग्रीन सिग्नल दिला. अशा पद्धतीने बी आर चोप्रा यांच्या ‘धुंद’ या चित्रपटात डॅनी चा प्रवेश झाला. खरी गंमत पुढेच आहे. ज्यावेळी चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वरला सुरू झाले त्यावेळी प्लेट समोरच्याकडे रागाने फेकण्याचा सिन आला. डॅनीने  मोठ्या त्वेषाने  प्लेट फेकली. रिहर्सल च्या वेळेला प्लेटचा निशाणा बरोबर लागत होता परंतु शूटिंगच्या वेळेला अनावधानाने डॅनीच्या हातून फेकलेली प्लेट थेट धरम चोप्रा यांच्या कॅमेऱ्या वर येऊन आदळली! या मुळे कॅमेऱ्याची लेन्स फुटली. कॅमेरा खराब झाला. परंतु बी आर  मात्र खुश झाले. कारण हा शॉट त्यांनी ज्या वेळेला त्यांनी पाहिला त्यावेळेला थेट कॅमेरा वरती प्लेट आल्यामुळे एक ‘थ्रीडी इफेक्ट’ त्यातून मिळाला आणि सिनेमात प्रेक्षकांच्या अंगावर थेट प्लेट येत आहे असा ‘आभास’ निर्माण झाला. या शॉटची त्या काळात खूप चर्चा झाली होती. अशा पद्धतीने डॅनीच्या हातून झालेली एक चूक चित्रपटातील ‘हायलाईट’ ठरली. 

========

हे देखील वाचा : जेव्हा छोट्या वैजयंतीमालाने पोप समोर नृत्य करून शाबासकी मिळवली!

========

‘धुंद’ हा सिनेमा सुरुवातीला काही दिवस चालला नाही. पण माऊथ पब्लिसिटीने याची प्रचंड हवा निर्माण झाली आणि आज देखील हा चित्रपट एक क्लासिक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. या चित्रपटात संजय खान, नवीन निश्चल, झीनत अमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी साहिर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत चोप्रा कॅम्पस चे फेमस संगीतकार रवी हे यांचे होते. या चित्रपटातील ‘संसार की हर शय का बस इतना ही फसाना है एक धुंद से आना है एक धुंद में जाना है’ हे  महेंद्र कपूर यांनी गायलेले थीम सॉंग त्याकाळी प्रचंड गाजले होते. या सिनेमाचे पार्श्वसंगीत छायाचित्रण अतिशय जबरदस्त झाले होते. धरमचोप्रा यांच्या  कॅमेर्‍याने टिपलेला पावसाळ्यातील महाबळेश्वर अप्रतिम भासत होता.

धनंजय कुलकर्णी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.