Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Piya Ka Ghar : वपुंच्या कथेवरील धमाल सिनेमा

 Piya Ka Ghar : वपुंच्या कथेवरील धमाल सिनेमा
बात पुरानी बडी सुहानी

Piya Ka Ghar : वपुंच्या कथेवरील धमाल सिनेमा

by धनंजय कुलकर्णी 14/05/2025

मराठी साहित्य दरबारातील एक मानाचं पान होतं व पु काळे. शहरी मध्यमवर्गीयांच्या भाव भावनांचं फार सुरेख चित्रण त्यांच्या कथांमधून असायचं. १९७० साली त्यांच्या ’कुचंबणा’ या कथेवर एक चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ’मुंबईचा जावई’. याच सिनेमाचा रीमेक हिंदीत राजश्री प्रॉडक्शनने  १९७२ साली केला ‘पिया का घर’ (दि. बासू चटर्जी) मुंबईतील जागेची समस्या व चाळीतील दोन खोल्यांच्या खुराड्यात होत असलेली एका नव विवाहित दांपत्याची अडचण दाखविलेल्या या सिनेमाच्या निर्मितीची कथा मनोरंजक देखील आहे. (Entertainment news)

१९६९ साली पुण्याच्या FTI मधील विद्यार्थ्यांनी याच कथेवर एक short film बनवली. त्यावर मराठीत ‘मुंबईचा जावई’ १९७० साली बनला. मुंबईतील छोट्या जागेत राहणारी मंडळी किती मोठ्या मनाची असतात याचं खूप भावस्पर्शी चित्रण केलं गेलं. दुसर्‍याच्या सुखासाठी झटणारी,त्यांच परस्परांवरील प्रेम, जिव्हाळा,आपुलकीचं नातं, त्यागाची,समर्पणाची भावना याच सुरेख सादरीकरण यात होतं. (Marathi movies)

=============

हे देखील वाचा : Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य सिनेमा!

=============

मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या राम (अनिल धवन) करीता वधू संशोधन चालू असते. चाळीतल्या त्या खुराड्यात वन रूम किचन मध्ये त्याची आई (सुलोचना चटर्जी), वडील गिरधारीलाल शर्मा (आगा), मोठा भाऊ (सुरेश चटवाल) वहिनी (रजिता ठाकूर) आणि धाकटा भाऊ दाटीवाटीने रहात असतात.त्यांचे हे घर शेजारी आणि मित्रांनी कायम भरलेले असते.राम करीता मालती (जया भादुरी) चे स्थळ सुचविले जाते. मालती ग्रामीण भागातील ऐसपैस घरात शांत ‘सुशेगात’ जीवन जगणारी. गर्दी,गोंगाट,धावपळ या पासून कोसो दूर. मुंबईला राहायला मिळणार या आनंदात हरखून जाते. महानगरीची स्वप्ने तिच्या मनात रंगू लागतात. लग्न तिच्या गावीच होते. साठच्या दशकातील तो काळ ; ज्यावेळी पत्र हेच संपर्काचे साधन. (Indian cinema)

मध्यस्थाच्या सल्ल्यानुसार लग्न यथासांग पार पडते. मालती च्या काकाला गौरीशंकरला (राजा परांजपे) मात्र मुंबईच्या लोकांचे राहणीमान , त्यांच्या खानपान शैली , स्रियांचे पेहराव, त्याचं पुरुषांसोबत मोकळ ढाकळ वागणं पटत नाहीत. लग्नानंतर वऱ्हाड महानगरीत येते. गावाकडच्या ऐसपैस घरात वाढलेल्या मालती ला चाळीतील घर पाहून धक्काच बसतो.लग्नापूर्वी ज्या घरात ती वाढलेली असते त्याच्या पासंगालाही न पुरणारे ते घर असते. नवविवाहित दांपत्याला एकांत काही केल्या मिळत नाही. स्वयंपाक घरातल्या छोट्याश्या जागेत जिथे एकमेकाचा श्वास देखील सर्व घरभर ऐकू जाईल अशा जागेत त्यांचा संसार सुरू होतो.मध्यरात्री अचानक पाणी आल्याने सारे घर जागे होते. दिवसभर घर माणसांनी गच्च भरलेले.माणसं,माणसं आणि माणसं….मुंबई जे शहर कधीच झोपत नाही,कधीच थांबत नाही.जिथे जागेसाठी,हवेसाठी, एकांतासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागतो. अशा शहरात मालतीची कुचंबना होणं साहजिक असते. मालती वैतागते,चिडते. या टीचभर जागेत संसार ही कल्पनाच तिला छळू लागते. (Bollywood tadaka)

मुंबई बाबत पाहिलेल्या स्वप्नांचा दिवसागणिक चुराडा होवू लागतो. राम तिला हर तऱ्हेने खुलवायचा प्रयत्न करतो.तुटपुंज्या पगारात नवीन वास्तू त्याला शक्य नसते. घरातील सर्वांना दु:खाची , तिच्या अपेक्षांची कल्पना असते पण नाईलाज असतो.त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न होताच असतात पण दरवेळी काहीतरी कारण घडून त्यांचे प्लॅन फसतात. एकदा राम तिला हॉटेल वर घेवून जातो. पण तिथेही पोलिसाची रेड पडते आणि नको तो ससेमिरा मागे लागतो. आता मालती वैतागते व घरी पत्र लिहून सारा प्रकार कळवते. नवीन घर घेतल्याशिवाय मी मुंबईत परत येणार नाही असा निर्वाणीचा इशारा देते.तिचे काका मुंबईत तिला न्यायला येतात.  आल्यावर ते सर्वांचा चांगलाच पाणउतारा करतात. (Bollywood news)

इकडे रामचे कुटुंबीय मालती परत जावू नये म्हणून जोमाने नव्या जागेसाठी प्रयत्न सुरू करतात. त्याचे शेजारी पण मोठ्या मनाने रक्कम उभी करतात. आता फक्त मिशन एकच ‘मालती करीता नवीन घर’. काका मूकपणे सारे प्रयत्न पाहत असतात. माणसं छोट्या जागेत रहात असली तरी त्यांची मन मोठी आहेत याची त्यांना खात्री पटते. प्रेमाचे, सुखाचे मोजमाप घराच्या आकारावर अवलंबून नसते तर त्यांच्या हृदयातील प्रेमावर असते हे त्यांना मनोमन पटते. मालती पण सारं काही आपल्या नजरेने टिपत असते. हे लोक आपल्यासाठी इतके धडपडतायत हे पाहून तिचं ही मन द्रवते. आणि शेवटी मुंबई संस्कृतीचा विजय होतो! (Entertainment update)

दिग्दर्शक बासू चटर्जी हे मूळचे डाव्या विचारसरणीचे त्यात पुन्हा कार्टुनिष्ट! त्यामुळे कलाकृती कडे पाहताना त्यांच्या नजरेतून ती दाखवतात. (यातही लग्नानंतर band वाजविणाऱ्या कलाकाराच्या डोक्यापासून कॅमेरा खाली खाली जातो आणि त्याचे अनवाणी पायावर स्थिर होतो!) खरं सौंदर्य हे साधेपणात असते याचा प्रत्यय राजश्रीचे चित्रपट पाहताना नेहमीच येतो.मान्यवर कलाकार असूनही चित्रपट बासुदा यांचा वाटतो; राजश्रीचा वाटतो.जया भादुरी,अनिल धवन या दोघांनी मध्यवर्ती भूमिकेत चांगले रंग भरले. आगा,केष्टो मुखर्जी, मुक्री या विनोदवीरानी यात हटके भूमिका केल्या.

=============

हे देखील वाचा : Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!

=============

आपल्या राजाभाऊ परांजपे यांनी छोटी पण लक्षात राहील अशी भूमिका केली. यातली गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होतं. ‘ये जीवन है इस जीवन का यही हैं यही हैं रंग रूप’(किशोर), ये जुल्फ कैसी है जंजीर जैसी है (रफी लता), मेरे पिया का घर है रानी हूं मै (लता), बंबई शहर की तुझको चाल सैर करादू (किशोर) हि गाणी छान होती. मुंबई शहराचं सत्तरच्या दशकातील चित्रण पाहताना आज मजा वाटते. ‘मुंबईचा जावई’ शी तुलना करता यात स्टार कास्ट चांगली होती. पण सुधीर फडके + गदिमा या जोडीच्या गीतांची खुमारी यात नव्हती. (Bollywood classic cinema)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood classics bollywood masala bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Indian Cinema jaya bachchan piya ka ghar raja paranjape va pu kale
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.