‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         कल्पक आणि वेगळी दृष्टी असलेले Piyush Pandey!
आज आपण कळत नकळतपणे विविध प्रकारच्या जाहिरातीच्या विळख्यात सापडलो आहोत. मुद्रित माध्यमापासून ते सार्वजनिक जीवनात आज कुठे ना कुठे आपल्या नजरेसमोर म्हणा अथवा कानावर जाहिरात अथवा जाहीरातीतील गाण्याचा मुखडा येतो. हातातील मोबाईलवरही अनेक जाहिरातपट समोर येतात. जाहिरातीच्या त्या भडिमारात अथवा जंजाळात आपलीच जाहिरात अधिकाधिक लक्षवेधक ठरावी, तीच ग्राहकांच्या मनात वा मेंदूत फिट्ट बसावी यासाठी ती बनवणारा अतिशय कल्पक हवा. पियूष पऻडे अगदी तस्सेच होते. जाहिरात क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने विलक्षण ठसा उमटवलेल्या पियूष पऻडे यांचे २४ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आणि एकूणच मनोरंजन विश्व शोकाकुल झाले.

पियूष पऻडे यांच्या जाहिरातपटाच्या गाजलेल्या कॅचलाईन अनेक. त्यांची भारतीय राजकारणवर विलक्षण प्रभाव टाकणारी कॅचलाईन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ‘अब की बार मोदी सरकार’ ही आहे. ती समाजातील खालच्या माणसापर्यंत पोहोचल्याचा सकारात्मक प्रत्यय निवडणूक निकालात दिसला. पियूष पांडे यांच्या अशा अनेक जाहिराती आणि त्यांच्या ओळी गाजल्या. काही उदाहरणे अशी; ‘हर खुशी में रंग ला ए’ ,( एशियन पेंटस,), ‘दो बूँद जिंदगी के’,( पोलिओ डोस), ‘कुछ खास है’ ( कॅडबरी ), ‘थऺडा मतलब कोका कोला’, ‘हमारा बजाज’, ‘चल मेरी लुना’, ‘हर रंग कुछ कहता है’, अशा अनेक जाहिराती आणि त्यांच्या लोकप्रिय ओळी वा टॅग लाईन आहेत. त्यांचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे भारतीय संस्कृती आणि संवेदनशीलता यांचा सकारात्मक प्रत्यय दैते.

एखाद्या व्यावसायिक पातळीवरून वा दृष्टीकोनातून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे एवढ्यापुरतीच त्यांची बांधिलकी नव्हती. काही सेकंदाच्या जाहिरातीत ते उत्पादन, एकादी छोटीशी गोष्ट आणि मनोरंजन यांचा उत्तम ताळमेळ ते राखत. काही वेगळे करणे आवश्यक आहे हे त्यांचे खास वैशिष्ट्य.
जयपूर येथे १९५५ साली जन्मलेल्या पियूष पऻडे यांचे वडिल बॅंकेत नोकरी करत. त्यांना सात मुली आणि दोन मुले अशी एकूण नऊ भावंडं. मोठे झाल्यावर प्रसून पांडे व इला अरुण मनोरंजन क्षेत्रात आले आणि यशस्वी ठरले. पियूष यांना क्रिकेटमध्ये विलक्षण रस होता. ते देखील १९८२ साली मुंबईत आले. मुंबईत ओगिल्वी या जाहिरात संस्थेत ते रुजू झाले आणि मग हे कमी वेळेत जास्त सांगणारे प्रभावी माध्यम समजून घेतले. ते जाहिरात माध्यमात आले त्याच वर्षी देशात रंगीत दूरदर्शन व चित्रफित (व्हिडिओ) आला, दशकभरात उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले, असे करत करत डिजिटल युगात आपण पोहोचलो. या बदलासह आणि वेगासह पियूष पऻडे यानीही स्वतःमध्ये बदल घडवून आणले. कॉपी रायटीग ते कॅमेराचा वापर असे हे माध्यम शिकून घेतानाच कमीत कमी शब्दांत व सेकदात आपली जाहिरात विलक्षण प्रभावी ठरेल यावर फोकस कायम ठेवला.
================================
हे देखील वाचा : Agnipath ते ‘मुनवली’; अमिताभ अलिबागकर झाला…
================================
पियूष पांडे यांना भारत सरकारने ,२०१६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. यासह त्यांना,२०१२ साली क्लिओ जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. शोजित सिरकार दिग्दर्शित ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित,२०१५ साली ‘पाडेमोनियम’ या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. ते मराठीत ‘पांडे पुराण’ या नावाने भाषांतरीत करण्यात आले. त्याशिवाय त्यांनी ‘ओपन हाऊस’ या नावाचे पुस्तक लिहिले. जाहिरात हे बहुस्तरीय क्षेत्र आहे. तैथे केवळ दिखावा, भरपूर पैसा, मोकळी ढाकळी संस्कृती, नाईट लाईफ, मॉडेल इतकेच नव्हे तर कल्पकता आणि अभ्यासू वृत्ती देखील आहे याचे एक उदाहरण म्हणजे पियूष पऻडे.
