Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्या कोऱ्या वेब सिरीज

 ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्या कोऱ्या वेब सिरीज
Press Release

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्या कोऱ्या वेब सिरीज

by Kalakruti Bureau 01/09/2020

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन काळात घरी अडकल्यामुळे सगळे चित्रपट, वेबसिरीज, मालिका, विविध कार्यक्रम बघून झाले. परंतु, या गर्दीत मराठी चित्रपट, वेबसिरीज किंवा कोणत्याही प्रकारचा मराठी कंटेंट फार झळकला नाही. पुरेसा मराठी भाषेतील कंटेंट कोणत्याच ओटीटी माध्यमावर उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षकांनी त्यांची ही भावना विविध सोशल मीडिया मंचावर व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’ने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’या नव्याकोऱ्या खास मराठी ओटीटी माध्यमाची घोषणा केली.

आता त्यासाठी १० नव्या कोऱ्या वेब सिरीज आणि सुमारे ८५० तासांचे लहान मुलांसाठीचे कन्टेन्ट बनविण्यासाठी प्लॅनेट मराठीने कंबर कसली आहे. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांना घेऊन या १० वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लहान मुलांसाठीचे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजनाने भरपूर असं कंटेंट देखील निर्मितीच्या तयारीत आहे.

‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगू लागली आहे. ‘म मानाचा, म मराठीचा’ म्हणतं दणक्यात प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. येत्या डिसेंबर २०२० पासून प्रेक्षकांसाठी खुल्या होणाऱ्या प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या कंटेंटमुळे प्रेक्षकवर्ग नक्की सुखावेल अशी खात्री प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएम डी अक्षय बर्दापूरकर व्यक्त करतात.

प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिजिटल थिएटरची घोषणाही नुकतीच करण्यात आली. सिने निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपले चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावेत या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं अक्षय सांगतात. सिने निर्मात्याला सिनेमा रिलीजचा आव्हानात्मक वाटणारा प्रवास यामुळे सुकर होणार आहे. आता घरबसल्या पे-पर-व्ह्यूच्या तंत्रावर प्रेक्षकांना चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा आनंद घेता येणारं आहे. डिजिटल थिएटरमुळे निर्मात्यांच्या खिशावर कमी भार पडणार आहे. 

प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असलेला आणि प्रदर्शित झालेला ‘एबी आणि सीडी’ चित्रपट, लवकरच येणारा शंतनू रोडे दिग्दर्शित अभिनेत्री सायली संजीवची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा आगामी चित्रपट अशा अनेक प्रोजेक्ट्सचा चित्रपटाच्या निर्मिती पासून ते प्रदर्शनापर्यंतचा अनुभव अक्षय बर्दापूरकर यांच्या गाठीशी आहे. आणि त्यामुळेच  भविष्यात चित्रपटमाध्यमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सिनेमा रिलीजच्या आव्हात्मक वाटणाऱ्या प्रवासाला एक पर्याय म्हणून निर्माते डिजिटल थिएटरचा मार्ग अवलंबवू शकतात असे ते म्हणाले. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Kalakruti Media ott Webseries
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.