Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

टॉलिवूडचा व्ही….ओटीटीवर

 टॉलिवूडचा व्ही….ओटीटीवर
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

टॉलिवूडचा व्ही….ओटीटीवर

by सई बने 01/09/2020

टॉलिवूडचा नॅचरल स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नानी चा आगामी व्ही हा चित्रपट 5 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. यावर्षीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हा सर्वात बीगबजेट चित्रपट ठरणार आहे.  टॉलिवूडचा नॅचरल स्टार म्हणून ओळख असलेला नानी व्ही या चित्रपटातून पहिल्यांदाच व्हिलनच्या भूमिकेतून समोर येत आहे. 

मोहन कृष्णा दिग्दर्शित व्ही या चित्रपटाची अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती.  कोरोनामुळे चित्रपटगृह बंद झाल्यावर नानीने लवकरच  ओटीटी प्लॅटफऑर्मवर भेटू अशी पोस्ट जून अखेरीस शेअर केली होती.  तेव्हापासून व्ही ओटीटीवर येणार अशी अटकळ बांधण्यात येत होती.  आता थेट नानींनेच ही गोष्ट जाहीर केल्यानं नानीच्या चाहत्यांना 5 सप्टेंबरची प्रतीक्षा आहे. 

या चित्रपटातील वास्तुन्ना वाचेस्तुन्ना आणि मनसु मारे ही गाणी लोकप्रिय झाली आहेत.  फेब्रुवारी महिन्यात रिलीज झालेल्या टीझरमध्ये सुधीर बाबू डॅशिंग पोलीस अधिका-याच्या भूमिकेत असल्याचे दिसले.  तर त्याच्या नायिकेची भूमिका निवेता थॉमसचे करत आहे.  याशिवाय व्ही मध्ये अदिती राव हैदरी आणि निवेठा थॉमस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.  व्ही हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.  मोहन कृष्णा हेच या चित्रपटाचे लेखक आहेत.   

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नानीचा परिचय नॅचरल स्टार म्हणून आहे.  पण या त्याच्या 25व्या चित्रपटात त्याने एका सायको किलरची भूमिका केली आहे.  नानीचा हा चित्रपट 25 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार होता.  पण त्याआधीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्ही चे प्रदर्शन मागे पडले.  तेव्हापासून या चित्रपटाची ओटीटीवर प्रतीक्षा होती.  व्ही मधील बदललेल्या लूकमुळे  नानीला मोठी उत्सुकता आहे. 

आपले चाहते आपली नकारात्मक भूमिका स्विकारतात, का हे त्याला पहायचे आहे.  त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात ओटीटीसाठी त्याचा नकार होती.  पण आता करोनाचे संकंट वाढले,  त्यामुळे त्यानेही ओटीटीला पाठिंबा दिला.  2013 मध्ये नानीने डी फॉर डोपीडी या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये प्रवेश केला.  हा चित्रपट सुपरहिट झाला. 

त्यानंतर नानीचे बहुधा सर्वच चित्रपट सुपरहीट ठरले.  राईड, पिल्ला जमींदार, जेंटलमॅन, नेनु लोकल, निन्नू कोरी,जर्सी, गँग लीडर या त्याच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई केली आहे.  सध्या नानी शिव निर्वाण यांच्या जगदीश या बिगबजेट चित्रपटात व्यस्त आहे.  साहू गरपती आणि हरीश पेड्डी निर्मित या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राजेश, रितु वर्मा यांच्या भूमिका आहेत. त्याआधी नानीचा व्ही किती कमाई करतो, आणि त्याचा नवा लूक त्याच्या चाहत्यांना किती भावतो,  यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागेल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Kalakruti Media Nani V
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.