‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Prasad Oak : “५ हजार ऑडिशन दिल्या पण एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही”
नाट्य, चित्रपट आणि मालिकासृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) लवकरच त्याच्या अभिनयातील १००वा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे… ‘वडापाव’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं दिग्दर्शनही प्रसाद ओक यानेच केलं आहे… आजवर मराठीसह हिंदीतही विविधांगी भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याने मात्र एका मुलाखतीमध्ये एक खंत बोलून दाखवली… नेमकं तो काय म्हणाला जाणून घेऊयात… (Marathi movies 2025)

‘वडापाव’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओकने एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, “किती मालिका, चित्रपट, व्यावसायिक नाटके केली याचा संपूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे आहे. या सगळ्यात आजपर्यंत एकही कमर्शियल जाहिरात मला मिळालेली नाही. मी सांगतोय ते कदाचित खोटं वाटेल पण मी जाहिरातीसाठी जवळपास ५-६ हजार ऑडिशन्स दिल्या आहेत. पण मला एकही जाहिरात अद्याप मिळालेली नाही. बाकी प्रिंट जाहिरात किंवा बाकी सगळ्या जाहिराती केल्या आहेत. पण टेलिव्हिजन कमर्शियल ज्याला आपण म्हणतो तशी एकही जाहिरात अजून मिळालेली नाही. मी वाट बघतोय बघुया लवकरच मिळेल”. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Prasad Oak : सहाय्यक दिग्दर्शकापासून सुरु झाला होता प्रसाद ओकचा अभिनय प्रवास
=================================
दरम्यान, आजवर प्रसाद ओक याने ‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’, ‘सुशीला-सुजीत’, ‘हाय काय नाय काय’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं… आता येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या ‘वडापाव’ चित्रपटात प्रसाद ओकसह अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, गौरी नलावडे, सविता प्रभुणे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर अशी स्टारकास्ट झळकणार आहे… तसेच, या चित्रपटाचा सामना हिंदीतील सनी संस्कारी की तुलसी कुमारी आणि कन्नडच्या कांतारा : ए लेजंड चॅप्टर १ या दोन चित्रपटांसोबत होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi