Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prem Parbat : सिनेमाच्या सर्व प्रिंटस खरंच जळून नष्ट झाल्या कां?

 Prem Parbat : सिनेमाच्या सर्व प्रिंटस खरंच जळून नष्ट झाल्या कां?
बात पुरानी बडी सुहानी

Prem Parbat : सिनेमाच्या सर्व प्रिंटस खरंच जळून नष्ट झाल्या कां?

by धनंजय कुलकर्णी 10/05/2025

आपण सिनेमाचा इतिहास जतन करण्याबाबत फारच बेफिकीर असतो. सत्तर च्या दशकातील एका सिनेमाबाबात समाज माध्यमात उलट सुलट वाचायला मिळते. त्याची सत्यता तपासणे गरजेचे असते. खरोखरच या सिनेमाच्या प्रिंट्स जळून खाक झाल्या होत्या कां? (Bollywood classic movies)

हिंदी सिनेमाच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत जे पूर्ण तर झाले पण प्रदर्शित होऊ शकले नाहीत तर काही सिनेमे अर्धवट बनून तसेच राहिले. काही सिनेमे  मुहूर्तानंतर एकही रील शूट न होता बंद झाले. तर काही सिनेमांच्या एक-दोन रील्स बनले पण  नंतर पैसा किंवा अन्य अडचणी मुळे हे सिनेमे बंद पडले आणि कायम स्वरूपी डब्यात गेले. (Untold stories of indian cinema)

१९८३ साली फिल्म ही फिल्म या नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अशा अर्धवट सिनेमांचा आढावा घेतला होता. पण असं म्हणतात एक सिनेमा असा होता जो पूर्ण तर  झाला होता पण प्रदर्शनापूर्वीच तो नष्ट झाला. आज या सिनेमाची फक्त चार ऑडिओ गाणी उपलब्ध आहेत. यातील एक गाणे लता मंगेशकर यांच्या टॉप टेन गाण्यांपैकी एक आहे. नेमका काय झाला होता हा  प्रकार?  कोणते होते ते गाणे?  आणि कोणता होता तो नष्ट झालेला चित्रपट? (Entertainment)

============

हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !

============

सत्तरच्या दशकामध्ये दिग्दर्शक वेद राही यांनी ‘प्रेम पर्बत’ नावाचा एक चित्रपट सुरू केला होता. या चित्रपटामध्ये सतीश कौल, रेहाना  सुलतान, नाना पळशीकर, आगा हे कलाकार होते. या चित्रपटाची गाणी जां निस्सार अख्तर आणि पद्मा सचदेवा यांनी लिहिली होती. तर चित्रपटाला संगीत जयदेव यांचे होते. जयदेव यांनी अतिशय तब्येतीने या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटाचे निर्माते शांती सागर होते. हा चित्रपट पूर्णपणे काश्मीर आणि हिमालय प्रदेश भागात शूट केला गेला चित्रपट अतिशय सुंदर बनला होता. अभिनेता सतीश कौल यांचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट पूर्ण झाला आणि ज्या गोडाऊनमध्ये याच्या सर्व कॉपीच ठेवल्या होत्या त्या गोडाऊन आग लागली आणि सिनेमाच्या सर्व प्रिंट्स जळून खाक झाल्या.

त्या काळात बॅकअप कॉपी नावाचा काहीच प्रकार नव्हता त्यामुळे या सिनेमाच अक्षरशः कोळसा झाला. या सिनेमाची फक्त चार ऑडिओ गाणी मात्र उपलब्ध आहेत ते देखील आकाशवाणीच्या सौजन्याने कारण या सिनेमाची चार गाणी आकाशवाणीकडे दिले होते आणि त्यांच्याकडे ती सुरक्षित राहिली नंतर या गाण्यांवरून या सिनेमाच्या रेकॉर्ड्स आल्या चित्रपट मात्र कोणालाच पाहता आला नाही. निर्मात्याचे बजेट कमी असल्यामुळे पुन्हा री शूट करणे शक्य नव्हते. आज युट्युब वर आपण यातील गाणी  ऑडिओ स्वरूपात पाहू शकतो. यातील ‘ये दिल और उनकी निगाहों के साये…’  हे गाणं युट्युब वर व्हिडिओ स्वरूपात आहे; परंतु ते चुकीचे आहे.

कुणी तरी ‘मधुमती’ च्या आजा रे परदेसी… या गाण्याला म्युट  करून तिथे हे गाणे डब केले आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना ‘प्रेम पर्वत’ चित्रपटात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला आहेत की काय असे वाटते. हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. बिनाका गीतमाला मध्ये या गाण्याला पाचवा क्रमांक मिळाला होता. सिनेमाच्या प्रिंट जाळून खाक झाल्या हि एक सोशल मिडीया वरील थिअरी आहे.

============

हे देखील वाचा : vinod khanna : आणि इम्रान खान यांच्या सिंथॉल साबणाच्या या जाहिराती आठवतात का?

============

ख्यातनाम चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्या मते,” हा सिनेमा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला होता. मुंबईच्या इम्पिरियल थिएटर मध्ये रिलीज झाला होता. तिथून तो एका आठवड्यातच रॉक्सी मध्ये मॅटीनी शो मध्ये शिफ्ट झाला. प्रिंट जाळून खाक झाल्याची बातमी कुठून आली ते कळत नाही!”  पण आज गुगल वर या सिनेमाच्या प्रिंट जाळून खाक झाल्या असेच वाचायला मिळते. चित्रपटाची प्रिंट जर खरच नष्ट झाली असेल तर हा चित्रपट पुन्हा एकदा रिशूट व्हायला होता किमान यातली गाणी तरी शूट करून टाकायला हवी होती कारण सत्तर दशकात ‘किस्सा कुर्सी  का’ हा चित्रपट असाच पुन्हा एकदा री शूट  करून प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे गूढ काही कमी होता नाही . वाचकांपैकी कुणाकडे अधिकची माहिती असेल तर नक्की शेअर करा.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Classic movies Dilip kumar Entertainment Hema Malini Indian Cinema lata mangeshkar prem parbat vaijayantimala
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.