Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास
Pushpa 2 पुष्पा २ सिनेमात जोडले जाणार बोनस फुटेज, ‘रीलोडेड’ नावाने पुन्हा होणार प्रदर्शित
५ डिसेंबर २०२४ मध्ये मोठ्या गाजावाज्यामध्ये अल्लू अर्जुनाचा (Allu Arjun) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा पुष्पा २ (Pushpa 2) सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर कमाईचा नुसता तडाखा लावला आहे. महिना उलटूनही सोशल मीडियावर, मीडियामध्ये देखील ‘पुष्पा 2’बद्दलच बोलले जात आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने अफाट लोकप्रिय मिळवत बक्कळ कमाई केली आहे. (Pushpa 2)
अल्लू अर्जुनच्या जगभरातील चाहत्यांनी ‘पुष्पा 2’ला खूपच प्रेम दिले आहे. या चित्रपटाने भारतात १८०० पेक्षा जास्त कोटींची कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच आठवडे होऊनही या सिनेमाची कमाई थांबायचे नाव घेत नाही. पुष्पा २ या सिनेमाबद्दल आता नवीन बातमी समोर येत आहे. (Pushpa 2 News)
नुकतेच ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक खास घोषणा केली आहे. सुकुमार दिग्दर्शित (Sukumar) या चित्रपटाचे २० मिनिटांचे वाढीव फुटेज आता सिनेमात जोडले जाणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना हा सिनेमा २० मिनिट जास्तीचा बघता येणार आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, पुष्पा २ या चित्रपटाची रीलोडेड क्लिप येत्या ११ जानेवारीपासून सर्वच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (Pushpa 2 Reloaded Version)
या अधिक बोनसबद्दल माहिती देताना पुष्पा २ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “पुष्पा २ द रूल रीलोडेड व्हर्जन २० मिनिटांच्या बोनस फुटेज सर ११ जानेवारीपासून सिनेमागृहात दाखवले जाईल.” आधी ३ तास २० मिनिटांचा असलेला हा सिनेमा आता नवीन अपडेटनुसार ३ तास ४० मिनिटांचा होणार आहे. त्यामुळे हा २० मिनिटाचा बोनस प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. (Pushpa 2 Social Media Post)
पुष्पा सिनेमाच्या सर्वच फॅन्ससाठी ही एक पर्वणी आहे. ज्यांना ज्यांना पुष्पा २ हा सिनेमा आवडला आहे, ते पुन्हा हा सिनेमा पाहायला जाणार यात शंका नाही. हा सिनेमा १५ जानेवारीनंतर पुन्हा हाऊसफुल झाला तरी आता आश्चर्य वाटायला नको. (Entertainment mix masala)
दरम्यान पुष्पा २ हा सिनेमा २०२१ साली आलेल्या ‘पुष्पा‘ या सिनेमाचा दुसरा भाग आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. आता पुष्पा २ सिनेमाने देखील अफाट कमाई केली. या दोन्ही सिनेमांना मिळालेले यश पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची ‘पुष्पा ३: द रॅम्पेज‘ घोषणा केली आहे. (Allu Arjun’s Pushpa 2)
=========
हे देखील वाचा : Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास
Actor Yash कन्नड मालिकांचा हिरो ते ग्लोबल स्टार; जाणून घ्या केजीएफ अभिनेता यशचा अभिनय प्रवास
=========
पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुनने चंदन तस्कर ‘पुष्पराज’ची भूमिका साकारली असून, रश्मिकाने त्याच्या पत्नीची म्हणजेच श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. या दोघांसोबतच या सिनेमात फहद, जगपती बाबू, प्रकाश राज, सुनील, अनसूया भारद्वाज, राव रमेश, धनंजय आणि अजय यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर चित्रपटातील ‘पीलिंग्स’ आणि ‘किसिक्’ ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. (Social News)
पुष्पा २ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच वादात सापडला. या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणात, अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर १४ डिसेंबर रोजी त्याला अंतरिम जामिनावर सोडण्यात आले.