Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Deepika Padukone च्या लाल लुकने साऱ्यांना घातली भुरळ घातली!
अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्सचेही प्रेक्षक चाहते आहेत. स्टॉकहोममध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्टियर इव्हेंटमधून दीपिका पदुकोणच्या भव्य आणि देखण्या फोटोंनी तिच्या चाहत्यांचे मन जिंकले. दीपिका पदुकोण केवळ भारतातील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक नाही, तर एक ग्लोबल आयकॉनही आहे. ती भारताची पहिली ग्लोबल लक्झरी ब्रँड अॅम्बेसडर बनली असून, इंटरनॅशनल लक्झरी जगतात भारताच्या अस्तित्वाला एक सशक्त ओळख मिळवून देत आहे. गेल्या काही वर्षांत ती भारतीय प्रतिनिधीत्वाचं एक शक्तिशाली प्रतीक बनली आहे.( Actress Deepika Padukone)

२०१७ मध्ये तिने एका ग्लोबल लक्झरी ब्रँडसाठी पहिला भारतीय चेहरा बनून इतिहास घडवला होता. आणि याच क्षणामुळे आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सने भारतीय प्रतिभेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. दीपिकाच्या या नेमणुकीने जागतिक लक्झरी ब्रँड्सच्या विचारसरणीत मोठा बदल घडवून आणला असून भारतालाही आता महत्त्व दिलं जातंय. अलीकडेच, दीपिका स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या EN ÉQUILIBRE या कार्टियर हाय ज्वेलरी इव्हेंटमध्ये सहभागी झाली. या इव्हेंटसाठी तिने एक रॉयल लाल ड्रेस परिधान केला होता, स्लीक आणि खुले केस ठेवले होते आणि कार्टियरची खास हाय ज्वेलरी घातली होती.

या आधीही दीपिकाने अबू धाबी येथे झालेल्या कार्टियरच्या २५व्या वर्धापनदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला होता, जिथे ती कार्टियरच्या अमूल्य दागिन्यांमध्ये झळकली होती. फ्रेंच लक्झरी ब्रँड कार्टियरच्या ग्लोबल अॅम्बेसडरची भूमिका निभावणारी दीपिका ही पहिली भारतीय कलाकार आहे. या प्रतिष्ठित इव्हेंटमधील तिच्या उपस्थितीने पुन्हा एकदा तिच्या जागतिक प्रभावाची प्रचिती दिली आहे. ( Actress Deepika Padukone)
=========================================
=========================================
दीपिका पदुकोणची ही जागतिक ओळख भारतीय संस्कृतीशी असलेल्या तिच्या घट्ट नात्याने आणि दमदार चित्रपटांमधील भूमिकांमुळे घडली आहे. तिने आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेची खरी ताकद समजून घेण्यास भाग पाडले आहे. तिची जागतिक व्यासपीठावरील उपस्थिती आंतरराष्ट्रीय लक्झरी वर्ल्डमध्ये सातत्याने आपली छाप सोडत आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News