Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

R. D. Burman : म.रफी यांचे आर डी बर्मनकडे गायलेले शेवटचे गाणे कोणते?

 R. D. Burman : म.रफी यांचे आर डी बर्मनकडे गायलेले शेवटचे गाणे कोणते?
बात पुरानी बडी सुहानी

R. D. Burman : म.रफी यांचे आर डी बर्मनकडे गायलेले शेवटचे गाणे कोणते?

by धनंजय कुलकर्णी 27/01/2025

संगीतकार राहुल देव बर्मन (R. D. Burman) सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील आघाडीचा संगीतकार होते. त्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलून टाकला. अभिजात भारतीय संगीतासोबत पाश्चात्त्य संगीताचा सुरेल मिलाफ त्यांच्या संगीतामध्ये आपल्याला दिसतो. किशोर कुमार हा त्यांचा आवडीचा गायक होता असं असलं तरी मोहम्मद रफी (Mohammed Rafi) आणि मुकेश यांना पंचम यांनी योग्य वेळी योग्य संधी दिली आणि या दोघांची पंचमकडील गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत.

सत्तरच्या दशकात खरंतर मुकेश (Mukesh) आणि रफी यांचा स्वर किशोरच्या तुलनेत काहीसा मागे पडला होता. पण संगीतकार आर डी बर्मन (R. D. Burman) यांनी रफी यांना अशी काही गाणी दिली की त्यांचा कमबॅक होऊ लागला. १९७७ साली ‘हम किसीसे कम नही’ या चित्रपटातील ‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्याने रफीचा खऱ्या अर्थाने कमबॅक झाला. या गाण्याला बिनाका गीतमाला या कार्यक्रमात त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट गीताचा सन्मान लाभला होता. त्यापूर्वी १९७३ सालच्या ‘यादो की बारात‘ या सिनेमातील ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या आशा सोबतच्या युगल गीतात रफीचा स्वर ठळकपणे पुढे आला होता. सत्तरच्या दशकामध्ये रफी आणि आर डी बर्मन हे कॉम्बिनेशन संख्येने कमी असलं तरी खूपच मेलडीयस अशी होती.

या दोघांच्या अखेरच्या गाण्याचा एक भावस्पर्शी किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला. रफी यांनी संगीतकार आर डी बर्मन यांच्याकडे गायलेले शेवटचं गाणं कोणतं? ते गाणं होतं रमेश सिप्पी यांच्या ‘शान’ या चित्रपटातील. या चित्रपटात मोहम्मद रफी आणि आर डी बर्मन (R. D. Burman) यांनी एक गाणे गायलं होतं गाण्याचे बोल होते ‘यम्मा यम्मा यम्मा यम्मा ये खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा…’ या गाण्याचे रेकॉर्डिंग थोडे घाईत करावे लागले होते. कारण शूटिंग शेड्युल लागले होते. रेकॉर्डिंगच्या दिवशी नेमका आर डी बर्मन यांचा घसा खराब होता. त्यामुळे काय करायचे हा प्रश्न होता. (Entertainment masala)

परंतु मोहम्मद रफी पंचमला म्हणाले, ”आज आपण रेकॉर्डिंग करून घेऊ. कारण उद्या शूटिंग आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा हे गाणे डब करू. तोपर्यंत तुमचा घसा देखील बरा झालेला असेल!” आर डी आणि रफी यांनी ‘यम्मा यम्मा’ हे गाणं रेकॉर्ड केलं. गाण्याचे शूटिंग देखील व्यवस्थित झालं. आता हे गाणं पुन्हा एकदा डब करायचे होते. मोहम्मद रफीला आर डी बर्मन (R. D. Burman) यांनी विचारले, ”आपण हे गाणं केव्हा डब करायचं?” त्यावेळेला रफी म्हणाले, ”डब कशाला आपण पुन्हा एकदा हे गाणं रेकॉर्ड करू.”

दोघांच्या पुन्हा रिहर्सल सुरू झाल्या. आता शूटिंग झालेल्या गाण्याची पुन्हा एकदा रेकॉर्डिंग होणार होते. पण करताना कोणालाही कल्पना नव्हती की हे गाणं पुन्हा रेकॉर्ड होऊ शकणार नाही. कारण ३१ जुलै १९८० या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मोहम्मद रफी यांचे निधन झालं आणि हे गाणं पुन्हा रेकोर्ड होवूच शकले नाही. तसंच चित्रपटांमध्ये आणि रेकोर्डवर ठेवावं लागलं. (Untold stories)

=============

हे देखील वाचा : 36 Chowringhee Lane : अपर्णा सेनची पहीली कलाकृती

=============

आर डी बर्मन (R. D. Burman) यांनी तबस्सुम यांना हिला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं. ते म्हणाले, ”सर्वोत्कृष्ट ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे असा रफीचा आग्रह असायचा. आज हे गाणं जेव्हा मी ऐकतो त्यावेळेला रफीच्या आवाजात कुठेही काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. पण तरीही रफी पुन्हा एकदा रेकॉर्डिंगला तयार झाले होते!” ‘शान’ हा चित्रपट ११ डिसेंबर १९८० या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये ‘आते जाते हुये मै सबपे नजर रखता हूं नाम अब्दुल है मेरा सबकी खबर रखता हूं..’, ’दर्या में जहाज चले पाशा’ ही गाणी देखील रफीच्या स्वरामध्ये होती. आर डी बर्मन यांच्याकडील रफीने शेवटचं गाणं मात्र ‘यम्मा यम्मा’ हेच होत!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured hum kisise kum naheen Kishore Kumar Mohammed Rafi R. D. Burman Ramesh Sippy shaan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.