MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Radhika Apte : लेकीच्या जन्मानंतर राधिका अभिनयातून ‘या’ क्षेत्रात करणार एन्ट्री!
कोणत्याही क्षेत्रात गॉडफादर किंवा मार्गदर्शक असणं फार महत्वाचं असतं असं म्हटलं जातं. मात्र, मार्गदर्शक असण्याची संकल्पनाच न आवडणाऱ्या राधिका आपटेने हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबत हॉलिवूडमध्येही डंका गाजवला आहे. चौकटीत न राहता विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनेक अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका आपटे. एका गोंडस मुलीची आई झाल्यानंतर राधिका आपटे हिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Radhika Apte)
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आजपर्यंत मनोरंजित करणारी राधिका आपटे आता दिग्दर्शकाच्या रुपात समोर येणार आहे. ‘कोट्या’ या चित्रपटाचं ती दिग्दर्शन करणार असून हा एक अॅक्शन-फँटसी चित्रपट असेल. महत्वाचं म्हणजे ‘कोट्या’ हा हिंदीसह मराठी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. राधिका आपटे दिग्दर्शित आणि विक्रमादित्य मोटवानी निर्मित ‘कोट्या’ चित्रपटात उसतोड तरुणाची कथा दाखवली जाणार आहे. (Bollywood update)

Radhika Apte ने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात मराठी चित्रपटांपासून केली होती. त्याआधी आपले शिक्षण करत ती चित्रपटसृष्टीत सक्रीय होतीच मात्र मुख्य भूमिकेत तिचे पदार्पण २००९ मध्ये ‘घो मला असला हवा’ या चित्रपटातून झाले. या सिनेमात तिने खेड्यातल्या एका सामान्य स्त्रीचे पात्र साकारले होते. त्यानंतर मग एकामागोमाग एक मराठी चित्रपटांतून तिचा अभिनयाचा ग्राफ वर चढतच गेला. ‘तुकाराम’, ‘पोस्टकार्ड’, ‘लय भारी’, ‘समांतर’ अशा काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेता रितेश देशमुख सोबत ‘लय भारी’ चित्रपट हा तिचा मराठीतील शेवटचा चित्रपट ठरला. (Entertainment masala)
============
हे देखील वाचा : Sthal Movie Review : अरेंज मॅरेजची वैचारिक गोष्ट!
============
विद्येचे आणि कलेचे माहेर घर असणाऱ्या पुण्याची राधिका आपटे. जिचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. वडिल जरी पेशाने डॉक्टर असले तरी मातृभाषेत शिक्षण घ्यायचे असा त्यांचा अट्टहास होता. शाळेतील शिक्षण पुर्णत: मराठी माध्यमातून झाल्यानंतर अचानक महाविद्यालयात अफाट इंग्रजी भाषेचा डोंगरही राधिकाने सर केला. लंडनला स्क्रिप्ट राईटिंगचे शिक्षण शिकायला गेल्यामुळे इंग्रजी भाषेत अधिक सुधारणा झाल्याचेही राधिकाने मुलाखतीत म्हटले होते. हल्ली कलाकाराने केवळ अभिनयच करावा लिखाण किंवा दिग्दर्शन करु नये असा फंडाच राहिला नाही आहे. कलाकार अभिनय करताना आपलं लिखाण कौशल्य, संगीतातील कौशल्य दाखवत असतोच. तशीच आवड राधिकालाही आहे. सध्या राधिका लंडनमध्ये राहात असून ती स्क्रिप्ट राईटिंगचे शिक्षण घेत आहे. तिला भविष्यात दिग्दर्शनही करायचे आहे. त्यामुळे लवकरच राधिका आपटे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्याच्या रुपातही आपल्याला दिसेल यात शंका नाही.

‘फोबिया’, ‘मांझी’, ‘बदलापूर’, ‘बाजार’, ‘पारछेड’, ‘अंधाधुंद’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या राधिकाने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राततच पुढे जायचे असे ठरवले होते. मात्र, बऱ्याच जणांना माहित नसलेली एक गोष्ट म्हणजे राधिकाला बऱ्याच जणांना न आवडणारा विषय आवडतो, तो म्हणजे गणित. गणितात तिने आपले शिक्षण पुर्ण केले असून जर ती अभिनेत्री नसती तर तिला गणिताच्या क्षेत्रात पुढे करिअर करायला आवडले असते अशी इच्छा तिने व्यक्त करुन दाखवली. करिअरची सुरूवात केल्यापासून कधीही सुट्टी न घेतलेलया राधिकाला करोना काळातील टाळेबंदी काहीशी आवडल्याचे ती कबूल करते. करोना काळात सर्व मंडळी शेफ झाले होते. मात्र, राधिकाला खरोखरीच स्वयंपाकाची आवड असून विशेषत: पेस्ट्री बेकिंगचे शिक्षण तिला घ्यायचे आहे, असंही तिने सांगितले. मराठमोळ्या राधिका आपटेने भाषेचा, दिसण्याचा कोणताही न्युनगंड न ठेवता समोर आलेली प्रत्येक भूमिका गांभिर्य़ाने केली. तिच्या कामाची पोचपावती वारंवार प्रेक्षकांकडून तिला मिळालीच आहे.