
सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच कुणावर चित्रित झाले!
आपल्याकडे नायक आणि पार्श्वगायक यांच्या परफेक्ट जोड्या जमलेल्या दिसतात. भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये तर हे कॉम्बिनेशन खूप सक्सेसफुल होत असे. त्या काळी राजकपूर आणि मुकेश यांची जोडी प्रचंड लोकप्रिय होती. मग त्या आर के फिल्म्स असो की आर के बाहेरचे सिनेमे . मुकेश यांनी राज कपूर साठी ११० गाणी लागली. साठच्या दशकामध्ये शम्मी कपूर आणि मोहम्मदरफी हे कॉम्बिनेशन खूप जोरात होते.. मोहम्मद रफी यांनी शम्मी कपूर साठी तब्बल १९० गाण्यांमध्येआपला स्वर दिला होता. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात राजेश खन्ना या स्टारचा जन्म झाला.

किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे कॉम्बिनेशन या काळात प्रचंड लोकप्रिय झालं. हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘खामोशी’ (१९६९) चित्रपटातील ‘वो शाम कुछ अजीब थी…’ या गाण्यापासून हा सिलसिला सुरू झाला. याच वर्षी आलेल्या ‘आराधना’ पासून तर या जोडीचा धुमाकूळ सुरू झाला. १९६९ ते १९७१ या तीन वर्षाच्या काळात राजेश खन्नाने सलग १७ सुपरहिट सिनेमे दिले. हा विक्रम आजही अबाधित आहे. या सर्व सिनेमांमध्ये राजेश खन्ना करीता किशोर कुमार यांचा स्वर प्रामुख्याने असायचा. या १७ सिनेमांपैकी १५ चित्रपट सोलो हिरोचे म्हणजे एकट्या राजेश खन्ना नायक असलेले होते.
या १७ पैकी दोन चित्रपट ‘मर्यादा’ आणि ‘अंदाज’ या चित्रपटात मात्र राजेश खन्ना सोबत अन्य हिरो देखील होते. राजेश खन्ना साठी किशोर कुमारने २४४ गाणी गायली. त्या काळात राजेश खन्नाचा जबरदस्त हंगामा होता.सिनेमाच्या ओपनिंग क्रेडीटस मध्ये (श्रेय नामावली) मध्ये किशोर कुमार यांचे नाव दिसले की पब्लिक थेटर मध्ये शिट्ट्या वाजवित. हे गाणं राजेश खन्ना वर चित्रित असणार याची त्यांना खात्री असायची आणि 99% वेळेला त्यांचे उत्तर बरोबर निघायचं. पण एकदा मात्र गंमत झाली होती. या १७ चित्रपटां पैकी एका चित्रपटात राजेश खन्ना नायक होता. चित्रपटात किशोर कुमारचा गाणं होतं. पण ते गाणं राजेश खन्ना वर चित्रित केलं नव्हतं!!! या चित्रपटात राजेश खन्नावर चित्रित जे गाणं होतं ते मोहम्मद रफी यांनी गायलं होतं आणि किशोर कुमार यांनी गायलेले गाणे एका ज्युनिअर आर्टिस्ट वर चित्रीत झालं होतं! हा अजीबो गरीब प्रकार त्या काळात घडला होता.

लोक सुद्धा गोंधळून गेले होते हे असं का घडलं याचं कारण माहिती नाही. पण त्याचे परिणाम काय झाले? कोणता होता तो चित्रपट आणि कोणते होते ते गाणे? राजेश खन्नाच्या सलग १७ सुपरहिट सिनेमाच्या यादीत 1971 साली राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा ‘छोटी बहू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट के बी तिलक यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला संगीत कल्याणजी आनंदजी आणि गाणी इंदीवर यांनी लिहिली होती. या चित्रपटात राजेश, शर्मिला, निरूपा रॉय, आय एस जोहर, बेबी सारिका यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ख्यातना बंगाली लेखक शरदचंद्र चटर्जी यांच्या गाजलेल्या ‘बिन्दूर छेले’ या कादंबरीवर या चित्रपटाची कथानक होते.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
या चित्रपटात एकूण सहा गाणी होती. त्यापैकी मेल व्हाईस मध्ये फक्त दोनच गाणी होती. बाकी सर्व फिमेल वाईस मध्ये होती. दोन पुरुष स्वरातील एक गीत मोहम्मद रफी यांनी गायलेले होते. गीताचे बोल होते ‘ये रात है प्यासी प्यासी…’ हे गाणे राजेश खन्ना चित्रित झाले होते. यातील दुसरे गाणे किशोर कुमार यांनी गायले होते. जे गाणे एका ज्युनिअर आर्टिस्ट वर चित्रीत झाले होते. गाण्याचे बोल होते ‘ हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया…’ गंमत म्हणजे राजेश खन्ना वर चित्रित झालेलं मोहम्मद रफी यांचे गाणे अजिबात चाललं नाही. मात्र एका अनमोन जु निअर आर्टिस्टवर चित्रित गाणं हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया.. मात्र सुपर डुपर हिट झालं. त्या काळात गाण्याची लोकप्रियता मापण्याचे साधन बिनाका गीतमाला होते.
मोहम्मद रफी यांचे या चित्रपटातील गाणे बिनाका गीतमालात कुठेच दिसले नाही. पण किशोर कुमार यांनी गायलेले ‘हे रे कन्हैया किसको कहेगा तो मैया…’ हे गाणं वार्षिक बिनाका गीतमाला तेराव्या नंबर वर होतं. यावरून एक गोष्ट सिद्ध झाली; राजेश खन्नाचा स्टारडम असो वा नसो किशोर कुमार यांचा स्वर त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला होता. यातून आणखी एक देखील सिद्ध झालं की उद्या राजेश खन्ना स्टार जरी नसला तरी किशोर कुमारच्या लोकप्रियतेमध्ये अजिबात बाधा येणार नाही. राजेश खन्नाच्या लाटेत हा चित्रपट देखील लोकप्रिय झाला. आम्ही या ज्युनिअर आर्टिस्ट याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
गुगलवर काहीच माहिती नाही. आमचे पुण्यातील सन्मित्र चित्रपट अभ्यास केलास मुंदडा यांनी या कलाकाराची ओळख सांगितली.हा कलाकार मनोहर नायडू. तो ग्रुप डान्सर होता. कोरिओग्राफर पी एल राज यांनी त्याला संधी दिली. नंतर तो स्वत: देखील कोरिओग्राफर बनला. मनोजकुमार यांच्या काही सिनेमात त्याने नृत्यदिग्दर्शन केले होते. राजेश खन्ना नायक असलेल्या चित्रपटात किशोर कुमार चे गाणे असून देखील त्याच्यावर चित्रीत न झालेला हा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. तुम्हाला दुसरे कुठले उदाहरण आठवते का?