‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
‘इन आखों की मस्ती के मस्ताने हजारों है…’ हे गाणं ऐकून… सौंदर्याची खाण, उत्कृष्ट अभिनेत्री Bold अॅण्ड ब्युटीफूल रेखा (Rekha) हिचा चेहरा डोळ्यांसमोर आला ना.. एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रेखा यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र फ्लॉप होतं..रेखा यांच नाव खरं तर बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं .. पण रेखा आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं प्रेमप्रकरण हे आजही तितकंच ताजं तवाणं आहे..

अमिताभ व रेखा कधीच आपल्या प्रेमप्रकरणावर बोलले नाहीत. पण याऊपरही रेखा व अमिताभ या जोडीचे किस्से चवीने आजही चघळले जातात. आजही रेखा यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर जीवापाड प्रेम असल्याचं म्हटलं जातं.. पण तुम्हाला माहित आहे का जगाला त्यांच्या प्रेमाची भनक कशी लागली? चला तर रेखा-अमिताभच्या लव्हस्टोरीचा खास किस्सा जाणून घेऊयात आणि रेखा यांचं वैवाहिक आयुष्य कधीच हॅप्पी का राहिलं नाही याचं कारणंही जाणून घेऊयात…

तर, रेखा आणि अमिताभ यांनी १९७६ साली ‘दो अंजाने’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं.. या आधी १९७३ मध्ये ‘नमक हराम चित्रपटात दोघे होते पण रेखा राजेश खन्ना यांची हिरोईन होती… असो… रेखा-अमिताभ यांच्या अफेरबद्दल लोकांना कसं कळलं तो हा किस्सा…याचा उल्लेख रेखा यांचं आत्मचरित्र ‘रेखा-द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये करण्यात आला आहे. यासीर उस्मान लिखित या पुस्तकात तेव्हाचा हा किस्सा..तर अमिताभ व रेखा ‘गंगा की सौगंध’ या सिनेमाचं शूट करत होते. जयपूरमध्ये शूटींग सुरू होतं. आता तेव्हा शूटींग म्हटल्यावर गर्दी होणारच. आणि त्यातही अमिताभ व रेखाच्या सिनेमाचं शूटींग सुरु आहे हे कळल्यावर लोकांची तोबा गर्दी तर फिक्स…

अमिताभ-रेखाला पहायला मोठ्या संख्येनं लोक जमले होते. या दरम्यान गर्दीत घुसलेल्या एका व्यक्तीनं रेखावर खूप घाणेरड्या कमेंट्स करायला सुरूवात केली. त्याला समजवण्याचा क्रु मेंबर्सनी देखील बराच प्रयत्न केला गेला. युनिटनं अनेकदा त्याला तंबीही दिली. पण तो काही मागे हटेना . शेवटी अमिताभ बच्चन यांचा संयम संपला. त्यांचा रागाचा पारा चढला. आणि रेखावर अश्लिल कमेंट्स करणाऱ्या त्या माणसाला अमिताभ यांनी चांगलाच चोप दिला. खरं तर तो माणूस आणि ते प्रकरण तिथे जयपूरमध्येच मिटलं होतं. पण त्यानंतर इंडस्ट्रीत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरवर लोकांनी शिक्कामोर्तबच केला..अमिताभच्या मनात रेखाबद्दल काहीतरी खास आहे, म्हणूनच त्याने त्या माणसाची धुलाई केली, अशा बातम्याही पसरल्या. रेखाबद्दल अमिताभ पझेसिव्ह आहे, हे या घटनेनंतर पहिल्यांदा समोर आलं. झालं…! फायनली रेखा अमिताभच्या अफेअरची जी लोकांना शंका होती ती खरी आहे हे लोकांना काही अंशी पटलं…
==============
हे देखील वाचा : ‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !
==============
बरं, दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल ऑनस्क्रिन कुठेही वाच्यता केली नाही..पण काहीही न बोलता रेखा आणि अमिताभ यांचं अफेअर जगजाहिर होतं… आणि त्यामुळेच insecure झालेल्या जया बच्चन (Jaya Bachchan) ‘सिलसिला’ चित्रपटाच्या सेटवर त्यांचं शुट नसलं तरीही जात होत्या.. ‘सिलसिला’चे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मुलाखतीत म्हटलं देखील होतं की ‘सिलसिला’ चित्रपटाची कथा ही अमिताभ, जया आणि रेखा यांच्याच आयुष्यावर होती असं वाटत होतं.. कारण real life reel life म्हणून दिसत होती… मात्र, नंतर हे प्रकरण अधिक चिघळेल आणि त्यामुळे अमिताभ यांच्या संसारात अडचणी येतील म्हणून अमिताभ यांनी रेखा सोबत ‘सिलसिला’ चित्रपटानंतर काम केलं नाही…

रेखा आजही कुठल्या अॅवॉर्ड function मध्ये सुंदर साडी आणि भांगात कुंकू लावलेल्या दिसतात..त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात एक प्रश्नही आहे की रेखा कोणाच्या नावाने कपाळावर कुंकू लावतात? १९८० मध्ये रेखा ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या. यावेळी रेखा यांच्या कपाळावरील सिंदूरकडे सगळ्यांचं लक्ष होतं..या लग्नात रेखा यांनी अमिताभ यांच्या नावाने सिंदूर लावल्याची चर्चाी रंगली होती. अखेर रेखा यांनी या सर्व चर्चांचं उत्तर दिलं होतं की, “मी कोणाच्याही नावाचं सिंदूर लावत नाही. मी माझ्या फॅशनसाठी सिंदूर लावते. माझ्या मेकअपवर सिंदूर लावल्यामुळे माझं सौंदर्य आणखी फुलून दिसतं. म्हणून मी सिंदूर लावते”.

अमिताभ आणि रेखा यांच्या नात्यात मीठाचा खडा पडला.. त्यानंतर रेखा यांनी मुव्ह ऑन होण्याचा विचार केला आणि १९९० मध्ये दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश कुमार यांच्याशी लग्न केलं.. काही काळ सुखी संसार टिकल्यानंतर मात्र त्यांच्या लग्नात अडचणी आल्या..लग्नाच्या केवळ सहा महिन्यांनंतर मुकेश यांनी आत्महत्या केली. त्यावेळी काही लोकांनी रेखा यांना या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं होतं. तर काहींनी मुकेश त्यांच्या व्यवसायातील नुकसानामुळे तणावात होते आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. मुकेश यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा रेखा यांच्या हसऱ्या आयुष्यात मीठाचा खडा पडला..

त्यानंतर रेखा यांचं नाव अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. या दोघांची जवळीक होती. त्याशिवाय दोघं लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. असंही म्हटलं जातं, की विनोद मेहरा आाणि रेखा यांनी लग्न केलं होतं. पण विनोद यांच्या आईने रेखा यांचा कधीही स्वीकार केला नव्हता आणि त्यामुळेच विनोद मेहरांनी रेखा यांची साथ सोडली होती. इतकंच नाही तर, रेखा या मांगलिक असल्यामुळे त्यांची love life आणि married life कधीच सुखी झाली नाही असं म्हटलं गेलं… त्यांना मंगळ असल्यामुळे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता असंही म्हटलं गेलं.. आणि त्यामुळे नंतर कधीच त्यांच्याशी कुणी लग्न केलं नाही अशाही चर्चा रंगल्या होत्या… आता रेखा यांना मंगळ होता किंवा आहे हे काही फिक्स माहित नाही… पण त्यांच्या नशीबात प्रेमाची रेषा नव्हती असं तरी नक्कीच दिसतंय…

जाता जाता इतकं मात्र नक्की सांगेन की बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींची नावं एकमेकांशी जोडली गेली… काही खरी काही स्टंटसाठी म्हणून खोटी… पण रेखा आणि अमिताभ यांचं अफेअर आणि त्यांची जोडी ही ऑल टाईम फेव्हरेट होती आणि राहिल यात शंकाच नाही… सहकलाकार म्हणूनही ही जोडी प्रचंड गाजली आणि रिअल लाईफमध्ये यांच्या नात्याने एक वेगळाच इतिहास घडवून ठेवला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
रसिका शिंदे-पॉल
===========
हे देखील वाचा :Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत
===========