Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून थिएटरमध्ये हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक गर्दी करत आहेत. १ मे २०२५ रोजी ‘रेड २’ (Rad 2) चित्रपटाला टक्कर देत मराठीत २ चित्रपट रिलीज झाले होते. आता जवळपास १ महिना उलटून गेला असून अजूनही थिएटरमध्ये ‘गुलकंद’ (Gulkand) आणि ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटांचे शो सुरु आहेत. जाणून घेऊयात १ महिन्यात सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओकच्या गुलकंद चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.(Marathi entertainment news)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,’गुलकंद’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५ लाख, दुसऱ्या दिवशी २५ लाख, तिसऱ्या दिवशी ४२ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाख, पाचव्या दिवशी २३ लाख, सहाव्या दिवशी २२ लाख, सातव्या दिवशी १४ लाख, आठव्या दिवशी २ लाख, नवव्या दिवशी १८ लाख, दहाव्या दिवशी ३७ लाख, अकराव्या दिवशी ३८ लाख, बाराव्या दिवशी २६ लाख, तेराव्या दिवशी १९ लाख, चौदाव्या दिवशी १९ लाख, पंधराव्या दिवशी, १८ लाख, सोळाव्या दिवशी १६ लाख, सतराव्या दिवशी १८ लाख, अठराव्या दिवशी २५ लाख, एकोणिसाव्या दिवशी १५ लाख, विसाव्या दिवशी १४ लाख, एकविसाव्या दिवशी १४ लाख, बाविसाव्या दिवशी १२ लाख, तेविसाव्या दिवशी १ लाख, चोवीसाव्या दिवशी २१ लाख, पंचवीसाव्या दिवशी १७ लाख, २६ व्या दिवशी ९ लाख, सत्ताविसाव्या दिवशी ९ लाख, अठ्ठाविसाव्या दिवशी ८ लाख, एकोणतिसाव्या दिवशी ९ लाख, तिसाव्या दिवशी ७ लाख, एकतिसाव्या दिवशी १ लाख, बत्तीसाव्या दिवशी २ लाख कमवून आत्तापर्यंत एका महिन्यात ६.६७ कोटींचा गल्ला जमवला आहे.(Gulkand movie box office collection)
================================
हे देखील वाचा: Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!
=================================
सचिन गोस्वामी यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘गुलकंद’ चित्रपटाची कथा सचिन मोटे यांनी लिहिली आहे. चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय वनिता खरात (Vanita Kharat), मंदार मांडवकर, जुई भागवत, सचिन मोटे असे अनेक कलाकार चित्रपटात आहेत. एकीकडे मराठी नाटकांनाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांनीही मारलेली भरारी कौतुकास्पद आहे.(Gulkand movie cast)