Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं

Salman Khan सोबत झळकलेली ‘ही’ मराठी अभिनेत्री; लग्नाला ३७ वर्ष होऊनही घरच्यांनी नाकारलंय नातं
१९८९ मध्ये ‘मैने प्यार किया’ (Maine Pyaar Kiya) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारी मराठमोळी अभिनेत्री आज हिंदीसह मराठी चित्रपचसृष्टीतही लोकप्रिय झाली आहे. ती गोंडस अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (Bhagyashree Patwardhan)… सलमान खान सोबत मैने प्यार किया या चित्रपटातील तिची जोडी विशेष गाजली आणि आज ३० वर्ष उलटून गेली असली तरी तो चित्रपट क्लासिक आहे. अगदी कमी चित्रपटात झळकलेली भाग्यश्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली आणि तिने लग्न करुन नवा संसार थाटला. पण तुम्हाला माहित आहे का तिने पळून जाऊन लग्न केलं आणि आज ३७ वर्ष लग्नाला झाली अशूनही तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला नाही आहे. काय आहे किस्सा जाणून घेऊयात..

तर, भाग्यश्रीने हिमालय (Himalaya Dasani) यांच्याशी लग्न करायचं आहे असं जेव्हा आई-वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी नकार दिला होता. इतकंच नाही तर तिने हिमालयशी नातं संपवून टाकावं असं देखील त्यांचं म्हणणं होतं. पण घरच्यांच्या विरोधाला न जुमानता भाग्यश्रीने पळून जाऊन लग्न केलं. याबद्दल हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने सांगितले की, “माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की तू त्याला असं काही सांग जेणेकरून तो तुझा तिरस्कार करेल. त्यावेळी मी त्यांचा ऐकलं आणि हिमालयाला बोलले की मला तुझं तोंडही बघायचं नाही मला तुझा खूप त्रास होतोय. खरंतर या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. मला माझं प्रेम माझ्या पालकांसमोर सिद्ध करायचं होतं. माझ्या आई-वडिलांनी आमची प्रेमपत्रे जाळून टाकली. पण शेवटी प्रेम जिंकलं. त्या दोघांनी मंदिरात लग्न केले. माझ्या लग्नाबद्दल फक्त सलमान खान आणि सुरज बडजात्या यांना ठाऊक होते”…(Bollywood)

पुढे भाग्यश्री म्हणाली की, “आम्ही लग्नानंतर माझ्या घरी आई वडिलांच्या पाया पडायला गेलेलो. पण त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले नाहीत. माझी इच्छा होती की कधीतरी माझे आई-वडील येतील पण तसं काहीच झालं नाही त्यांनी आमचं लग्न स्वीकारलं नाही. मी त्यांची मनधरणी करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी स्वतः दार उघडण्याचा ही नकार दिलेला. पुढे माझ्या मुलाचा जन्म झाल्यावर आमच्यातल्या नातं थोडं सुधारलं पण अजूनही त्यांनी आम्हाला पूर्णपणे स्वीकारलेलं नाही ही खंत माझ्या मनात कायम राहील”…(Bhagyashree Marriage Story)

जुन्या आठवणींना उजाळा देत भाग्यश्रीने सांगितलं की, “माझ्या लग्नात सलमानने भरपूर मदत केली. त्यांनी आमच्यासाठी छोटा समारंभ सुद्धा आयोजित केला होता. ज्यात सुरज बडजात्या, त्यांची पत्नी, सलमान खान अशी काही निवडक आणि खास मंडळी उपस्थित होती. इतकंच नाही तर, माझ्या लग्नातही सलमान अगदी शेवटपर्यंत माझ्यासोबत थांबला होता”…(Salman Khan)
================================
हे देखील वाचा : ‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’चा Dhamaal 4च्या रिलीजला धक्का; चित्रपटाची नवी डेट जाहीर
================================
दरम्यान, ज्या वर्षी भाग्यश्री हिचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ रिलीज झाला होता, त्याच वर्षी १९८९ला तिने लग्न केलं होतं. भाग्यश्री एखा राजेशाही कुटुंबातून येत असून ३७ वर्ष होऊनही पटवर्धन कुटुंबाने तिच्या लग्नाचा स्वीकार केला नाही आहे. तिच्या प्रोफेशन आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटात ती झळकणार आहे. तिच्यासोबत यात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, सलमान खान, संजय दत्त अशी मंडळी असणार आहेत. (Marathi Movie 2026)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi