जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

Sant Tukaram Maharaj Biopics : महाराष्ट्राच्या वारकरी संताची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही भूरळ!
‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..’याच ओळी सध्या आपल्या सगळ्यांच्या कानात ऐकू येत असतील… वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.. वाटेत अभंग गात, रिंगण घालत वारकरी आपली सारी दु:ख बाजू ठेवून केवळ हरिनामाचा जप करत आहेत… वारकऱ्यांसाठी विठोबा म्हणजे बाप आणि संत तुकाराम म्हणजे जगद्गुरु. १७व्या शतकातील वारकरी संत तुकाराम यांनी लोकांना आपल्या अभंगांमधून जगण्याचा, आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला… सध्या वारी सुरु आहे म्हटल्यावर संत तुकारामांचं नाव येणारच.. चला तर जाणून घेऊयात आजवर त्यांच्या जीवनावर आधारित कोणते चित्रपट मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये आले…(Marathi Movies)

१९२१ साली संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित एक Silent चित्रपट ‘संत तुकाराम’ आला होता ज्याचं दिग्दर्शन गणपत शिंदे यांनी केलं होतं..त्यानंतर १९३६ साली संत तुकाराम महाराज यांचं जीवनचरित्र मांडणारा ‘संत तुकाराम’ (Saint Tukaram Movie 1936) हा मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला चरित्रपट प्रदर्शित झाला होता… व्हेनिस चित्रपट महोत्सवात कौतुकाचा मानकरी ठरत आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारा हा पहिला भारतीय चित्रपट मानला जातो . या चित्रपटाने खरं तर इतिहासच रचला आहे…१९३६ साली रिलीज झालेला हा चित्रपट त्यावेळी थिएटरमध्ये जवळपास वर्षभर सुरु होता… इतकंच नाही तर या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारली होती आणि त्यांनी या भूमिकेसाठी एकही रुपये मानधन घेतलं नव्हतं… मानधन न घेण्याचं कारण निर्मात्यांना सांगताना ते म्हणाले होते की, “ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेऊ ? मी मानधन घेणार नाही!”. आणि त्यांच्या या निर्णयाचा निर्मात्यांनी मान राखला होता. दरम्यान, संत तुकारात या चित्रपटात विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि सबंध चित्रपटादरम्यान ते तुकाराम जगले.(Marathi entertainment news)

दरम्यान, संत तुकाराम चित्रपटाची निर्मिती प्रभात चित्रपट कंपनीने केली होती; तर, विष्णूपंत गोविंद दामले आणि शेख फत्तेलाल यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे १९३६ साली जवळपास ६० लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला होता…दुर्दैव म्हणजे या चित्रपटाचे मूळ डॉक्युमेंट्स हरवले होते. ते १९७४ साली सनी जोसेफ नावाच्या सिनेमॅटोग्राफरला पुण्यातील लॉ कॉलेजच्या कचराकुंडीत सापडले. यानंतर त्यांनी हे डॉक्युमेंट्स National Film Archive of India कडे दिले होते.

मराठीसह दाक्षिणात्य भाषेतही संत तुकाराम महाराजांचे बायोपिक्स तयार करण्यात आले होते… १९६३ साली ‘संथा तुकाराम’ (Santha Tukaram Kannada Movie)) हा कन्नड भाषेत चित्रपट तयार केला गेला होता; ज्याचं दिग्दर्शन सुंदरराव नाडकर्णी यांनी केलं होतं आणि निर्मिती बी राधाकृ्ण यांनी केले होते. राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटात राजकुमार यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती…

याशिवाय, हिंदीत ११६५ मध्ये संत तुकाराम हा चित्रपट आला होता ज्याचं दिग्दर्शन राजेश नंदा यांनी केलं होतं. या चित्रपटात मधु आपटे, अनिता गुहा, हेलन, शाहू मोडक, ब्रिज मोहन व्यास यांच्या प्रमुख भूमिका होत्या… त्यानंतर १९७३ मध्ये तेलुगु भाषेत भक्त तुकाराम हा चित्रपट आला होता… अंजली पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन व्ही. मधुसूदन राव यांनी केलं होतं….या चित्रपटात अक्कीनेनी नागेश्वर राव यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती. याशिवाय चित्रपटात अंजली देवी, सिवाजी गनेसन, श्रीदेवी, रामकृष्णा अशा दिग्गज कलाकरांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या..

याशिवाय, २०१२ मध्ये तुकाराम (Tukaram Marathi movie) हा चित्रपट आला होता ज्याचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं होतं आणि तुकाराम महाराज अभिनेता जितेंद्र जोशी याने साकारले होते. जितेंद्र जोशीसह चित्रपटात प्रतिक्षा लोणकर, राधिका आपटे, पद्मनाभ गायकवाड, वीणा जामकर, निनाद लिमये, शरद पोंक्षे, स्मिता तांबे यांनी देखील कामं केली होती….

दरम्यान, आता लवकरच अभिनेता सुबोध भावे याचा संत तुकाराम हा चित्रपट भेटीला येणार असून विशेष म्हणजे हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे… महत्वाची बाब म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित हा पहिला हिंदी भाषिक चित्रपट असणार आहे… आदित्य ओम प्रस्तुत आणि दिग्दर्शित संत तुकाराम चित्रपट १८ जूलै २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi