Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Sholay : ‘शोले’ तील सुरमा भोपालीची भूमिका करायला जगदीप का तयार नव्हते?
मागच्या शतकातील महान चित्रपट ‘शोले’ यावर्षी ५० वर्ष पूर्ण करत आहे. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ ने मागची पुढचे सर्व विक्रम मोडत प्रचंड यश मिळवले. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळी आयडेंटिटी मिळाली. आज पन्नास वर्षानंतर देखील विरू,जय, गब्बर, बसंती, ठाकूर यांच्यासोबतच सुरमा भोपाली, सांबा, अहमद, रहीम चाचा , हरिराम कालिया… हि पात्र नाव वाचलं किंवा ऐकलं की आपल्या डोळ्यापुढे लगेच येतात. (Sholay iconic movie)

यातील सुरमा भोपालीची भूमिका कॉमेडियन जगदीप यांनी केली होती. जगदीप यांच्या रुपेरी कारकीर्दीतील हि सर्वात गाजलेली भूमिका म्हणावी लागेल. याच भूमिकेने त्याला आयडेंटीटी मिळाली. पण गंमत म्हणजे हा रोल करण्यासाठी जगदीप अजिबात तयार नव्हता. त्यांना भरपूर समजावल्यानंतर ही भूमिका त्यांनी निभावली आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकीएक ठरली. जगदीप यांनी ही भूमिका करायला सुरुवातीला नकार का दिला होता? ‘शोले’ चित्रपट जरी १९७५ ला आला असला तरी हे कॅरेक्टर जावेद अख्तर यांच्या डोक्यात आधीपासून होते. (Bollywood movies)
======================
हे देखील वाचा: Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
======================
साठच्या दशकाच्या अखेरीस सलीम जावेद या जोडीतील सलीम खान एका चित्रपटात नायकाची भूमिका करत होता या चित्रपटाचे डायलॉग जावेद अख्तर लिहीत होते आणि या सिनेमा जगदीप विनोदी कलाकार म्हणून काम करतहोता. जावेद अख्तर यांना मिमिक्री करायची खूप आवड होती. एकदा युनिटच्या लोकांसोबत गप्पा मारताना त्यांनी भोपाळ मध्ये त्यांना भेटलेल्या एका फॉरेस्ट ऑफिसर च्या आवाजाची नक्कल करून दाखवली. खास भोपाली शैलीतील त्यांचं ते बोलणं ऐकून सर्वांचे खूप मनोरंजन झाले. हि आवाजाची स्टाईल घेऊन एक चांगली भूमिका चित्रपटात आपण सादर करू शकतो असा विश्वास त्यांना वाटला. परंतु तो चित्रपट पूर्ण झाल्यामुळे ही संकल्पना तिथेच राहीली. नंतर सलीम यांनी अभिनय सोडून जावेद अख्तर यांच्यासोबत काम करणे सुरू केले. (Javed-salim)

‘अंदाज’, ‘हाथी मेरे साथी’, ‘सीता और गीता’, ‘जंजीर’, ‘यादों की बारात….’ या सिनेमाच्या यशानंतर सलीम जावेद ‘शोले’ या रमेश सिप्पी दिग्दर्शित मेगा मुव्ही वर काम करत होते. त्यावेळी त्यांना या सिनेमात हे कॅरेक्टर ॲड करावे असे वाटले. तसे त्यांनी रमेश सिप्पी यांना बोलून देखील दाखवले. चित्रपटाचे बऱ्यापैकी शूटिंग पूर्ण झाले होते पण सिप्पी यांना हे कॅरेक्टर आवडल्यामुळे त्यांनी ते घ्यायचे ठरवले. या भूमिकेसाठी प्राण यांना विचारावे असे ठरले पण ज्यावेळी जावेद अख्तर यांनी सांगितले,” ही भूमिका कुणी साकारू शकेल तो एकच कलाकार म्हणजे जगदीश!” (Untold stories)
जेव्हा जगदीपला विचारले तेव्हा त्याने की भूमिका करायला नकार दिला याची दोन कारणे त्यांनी सांगितले. एक तर ‘ब्रह्मचारी’ (१९६८) या सिप्पी यांच्या चित्रपटात त्याने काम केले होते त्याचे पुरेसे त्याला मिळाले नव्हते. दुसरे कारण त्याला ‘शोले’ या चित्रपटातील सुरमा भोपाली नव्हे तर जेलर ची भूमिका त्याला हवी होती. ही भूमिका ऑलरेडी असरानीला साईन केली होती. जावेद अख्तर यांनी जगदीप यांना समजावून सांगितले .अखेर जगदीश ही भूमिका करायला राजी झाले. (Entertainment)

खरंतर सुरमा भोपाली हे कॅरेक्टर आणि सिनेमातील ते प्रसंग हे कथानकाशी संबंधित नाहीत ते जोडलेले वाटतात. पण तरीही जावेद अख्तर यांनी अशा पद्धतीने ते पात्र रंगवले आहे की चित्रपटाच्या एकसंधतेत कुठेही बाधा आणत नाहीत. आणि जगदीप काय परफेक्ट साकारला आहे सुरमा भोपाली… जगदीपच ते खास भोपाली शैलीतल बोलणं आज देखील तितकंच लोकप्रिय आहे! (Bollywood)