Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
एव्हाना तुम्हा चित्रपट रसिकांनाही चांगलेच माहित झालेय, पन्नास वर्ष पूर्ण होताहेत यानिमित्त जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ देशविदेशात अतिशय मोठ्या प्रमाणावर पुन्हा प्रदर्शित होत आहे.आजपर्यंत अनेकदा तरी ‘शोले’ (Sholay) चित्रपट अनुभवणारे या वृत्ताने अतिशय रोमांचित झाले आणि पुन्हा एकदा ‘शोले’ पाहायचाच असा त्यांनी निर्णय घेऊन झाला देखिल असेल. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण आतापर्यंत किमान शंभर, सव्वाशे वेळा एकाग्र चित्ताने ‘शोले’ पाहणारे आपल्या चित्रपट व क्रिकेटवेड्या देशात खूप आहेत. (Bollywood trending news)

काही महिन्यांपूर्वीच ‘शोले’ची पन्नाशी व पटकथा संवाद लेखक सलिम जावेद यांच्या गोडधोड माहितीपटाच्या (डॉक्युमेंट्री) निमित्ताने दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात ‘शोले’चा खास खेळ आयोजित करण्यात आला असता मी गेलो तेव्हा मला असा एकशेएक वेळा ‘शोले’ पाहणारा सत्तरीपार चित्रपट रसिक भेटला. ‘शोले’चे गारुड असं भन्नाट आहे की ते अनेक चित्रपट रसिकांत भिनलयं.(Bollywood)
‘शोले’चा प्रवास १५ ऑगस्ट १९७५ पासून जो सुरु आहे तो त्याच्या पन्नाशीतही तसाच सुरु आहे. याला म्हणतात अस्सल यश. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट हीच आपल्या हिंदी चित्रपटाची खरी ओळख आणि तीच ‘शोले’ चे खणखणीत चौफेर यश अधोरेखित करीत आहे. (indian cinema)

मुंबईतील ‘शोले’ चे मुख्य चित्रपटगृह मिनर्व्हा हे आता वेगळे सांगायची गरज नाहीच ते जगभरातील अनेक चित्रपट रसिकांना चांगलेच ज्ञात आहे. सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या युगात ‘शोले’ पडद्यावर आला. मिनर्व्हात सत्तर एमएम व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम असा होता, ही त्याची वाढलेली ताकद होती. मोठीच सपोर्ट सिस्टीम होती. तशी भव्यता नसती तर कदाचित ‘शोले’ अनेक ज्युबिली हिट चित्रपटांप्रमाणेच एक सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखला जाण्याची शक्यता जास्त होती. जोरदार डायलॉगबाजीला उत्फुर्त टाळ्या व शिट्ट्या त्यात वाजणे सत्तर एमएम व उर्वरित चित्रपटगृहात पस्तीस एमएमलाही पडल्या. (Entertainment tadaka)
==============
हे देखील वाचा : Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते
==============
एकपडदा चित्रपटगृहाच्या काळात पडद्यावर आलेला ‘शोले’ ऐंशीच्या दशकात व्हीडीओ (व्हीसीआर), व्हीडीओ थिएटर्स,नव्वदच्या दशकात मनोरंजन उपग्रह वाहिनीवर,त्यानंतर मल्टीप्लेक्स,त्यात तो आधुनिक तंत्रज्ञानाने त्रीमिती (थ्री डी) करण्यात आला, त्यानंतर मोबाईल स्क्रीन,डिजिटल असा प्रवास करतोय. रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या या काळात ओलांडल्या गेल्या.मुद्रित माध्यमापासून सोशल मिडियापर्यंत ‘शोले’ वर सतत काहीना काही येते आहेच. म्हणून तर तो आता अतिशय थाटात पुन्हा प्रदर्शित करीत आहेत ही गोष्ट ट्रेडिंगवर होती. तात्पर्य, ‘शोले’ मागे हटणारी कलाकृती नक्कीच नाही.(इतका काही तो ग्रेट ब्रिट सिनेमा नाही असे ओरडून सांगणारे बरेच असले तरी त्याचे मोठेपण नाकारता येणार नाही) (Sholay cult movie)

प्रत्येक पिढीत कायमच एक कुतुहल असते, इतिहासात डोकावणे. त्या वृत्ती व मानसिकतेचा ‘शोले’ला सतत फायदा होत राहिला. आजच्या डिजिटल पिढीसमोर जगभरातील अनेक देशांतील अनेक भाषेतील उत्तम कंटेन्ट आहे, त्यांना ‘शोले’ एकदम भारी चित्रपट कदाचित वाटणार नाही. पण वर्षानुवर्ष ज्याची सतत चर्चा होते, त्या ‘शोले’ त नेमके काय आहे या उत्सुकतेपोटी ते पन्नास वर्षानिमित्त पुन्हा मोठ्याच प्रमाणावर प्रदर्शित होत असलेला ‘शोले’ नक्कीच पाहतात.आतापर्यंत मॅटीनी शो, रिपीट रन, गल्ली चित्रपट, दूरचित्रवाणी (अर्थात छोटा पडदा)यावर अनेकदा ‘शोले’ येऊनही तो पुन्हा पाहिला जातोय हेदेखील एक यशच. (Entertainment)

साठच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्या पिढीला त्या दशकातील अनेक चित्रपट हे सत्तरच्या दशकात मॅटीनी शो, रिपीट रन, गल्ली चित्रपट, रविवार संध्याकाळी दूरदर्शन यावर पाहायची संधी मिळाली. ते चित्रपट आजही क्लासिक म्हणूनच ओळखले जातात.आवर्जून नावे सांगायची तर,चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो ऑखे बारह हाथ’, ‘नवरंग’,
मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’ व ‘मदर इंडिया’, गुरुदत्त दिग्दर्शित ‘प्यासा’, चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकिकत’,विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’,’ज्वेल थीफ’, ‘तिसरी मंझिल’, राज कपूर दिग्दर्शित ‘बरसात’, ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, राज खोसला दिग्दर्शित ‘सी.आय.डी.’, ‘वह कौन थी’, बी.आर.चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’, ‘हमराज’,यश चोप्रा दिग्दर्शित ‘धूल का फूल’, ‘इत्तेफाक’, मनोजकुमार दिग्दर्शित ‘उपकार’हे चित्रपट माझ्या पिढीला सत्तरच्या दशकातील प्रसार माध्यमातील जुन्या चित्रपटावरील (त्यातील कलाकार व लोकप्रिय गीत संगीत) सदरातून माहित झाले. (Classic Bollywood movies)
================================
हे देखील वाचा: Dulhan Hum Le Jayenge चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण
=================================
‘फ्लॅशबॅक’, ‘घुंगट के पट खोल’, ‘यादों की बारात’, ‘कहा गये वो लोग’ अशा सदरातून जुने चित्रपट माहित होत राहिले आणि मग ते पाहण्याची जिज्ञासा वाढली.या चित्रपटांना आज पंचावन्न साठ वर्षे झालीत,तरी ते आजही पहावेसे वाटतात. ‘शोले’ या परंपरेतील नसला तरी तो समाजातील तळागाळापर्यंत पोहचलेला चित्रपट आहे. आणि तेच त्या चित्रपटाचे अस्तित्व कायम ठेवून आहे. कालची व आजची पिढी पुन्हा प्रदर्शित होत असलेला ‘शोले’ आता एकत्र पाहतील….(Bollywood update)