Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

Shreyas Talpade : “फसवणुकीचे आरोप खोटे आणि…”, टीमकडून स्पष्टीकरण
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या अडचणीत सापडला आहे. गावकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा श्रेयसवर आरोप केल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर दुप्पट करून देण्याची योजना सांगण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांकडून पैसे घेऊन कंपनीचे एजंट लोक अचानक गायब झाल्यानंतर लोकांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी श्रेयसचं नाव आल्यानंतर त्याच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (Bollywood update)
श्रेयसच्या टीमने 9Shreyas talpade) एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे की, “आजच्या जगात एखाद्या व्यक्तीने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे अनावश्यकपणे कलंकित होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. श्रेयस तळपदे यांच्यावर फसवणूक किंवा गैरवर्तनाचा आरोप करणारे सर्व वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून, इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे श्रेयस तळपदे यांना वारंवार विविध कॉर्पोरेट आणि वार्षिक कार्यक्रमांना आमंत्रित केले जाते, ज्यात ते उपस्थित राहतात. अशा उपस्थितीव्यतिरिक्त, त्यांचा संबंधित कंपनीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप आणि प्रसारित होणाऱ्या फसव्या किंवा बेकायदेशीर कृत्यांशी त्यांचा कोणताही संबंध नाही.” (Fraud case against Shreyas talpade)

पुढे असं म्हटलं आहे की,“आम्ही सर्वांना विनंती करतो की, त्यांनी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तथ्ये पडताळून पहावीत आणि श्रेयस तळपदे यांचे नाव या निराधार अफवांपासून दूर ठेवावे. श्रेयस तळपदे कायद्याचे पालन करणारे नागरिक आहेत. तसेच प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकतेचा सर्वोच्च मान राखण्यासाठी ते कायमच वचनबद्ध असतात.” त्यामुळे आता श्रेयसकडून स्पष्टीकरण आल्यामुळे त्याच्यावरील आरोपांना सध्या पुर्णविराम लागला आहे. (Entertainment trending news)
दरम्यान, या फसवणूकीच्या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने लोकांकडून पैसे गोळा करुन जिल्ह्यातून एकाएकी पळ काढला. यामुळे गावकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. तक्रार केल्यानुसार महोबा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. (Shreyas Talpade fraud case)
===========================
हे देखील वाचा: Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन
===========================
गावकऱ्यांच्या आर्थिक नुकसान प्रकरणात अभिनेता श्रेयस तळपदेचं (Shreyas Talpade) नाव समोर आल्याने सगळ्यांचाच गोंधळ उडाला होता. तक्रारीनुसार, कंपनीच्या जाहिरातीत किंवा प्रचारात श्रेयस याचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात श्रेयस तळपदेसह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके शेट्टी, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, दलचंद कुशवाह, सुनील विश्वकर्मा, सचिन रायकवार, कमल रायकवार, सुनील रायकवार, महेश रायकवार, मोहन कुशवाह, जितेंद्र नामदेव, नारायण सिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bollywood masala)