Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून
१४५ कोटी भारतीयांपैकी Avatar : Fire & Ash पाहणारे पहिले व्यक्ती ठरले राजामौली!
दिग्दर्शक जॅम्स कॅमरॉन (James Cameron) यांचा बहुप्रतिक्षित ‘अवतार: फायर अँड ऍश’ हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे… जगभरातील चाहते या चित्रपटाची वाट पाहात असून भारतातील एका दिग्दर्शकाने मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पाहिला आहे. आणि ते दिग्दर्शक आहेत एस.एस.राजामौली.. अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे भारतातील १४५ कोटी लोकांपैकी ‘अवतार: फायर अँड एश’ (Avatar : Fire and Ash) पाहणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. (Hollywood Movies)
दरम्यान, राजामौलींनी ‘अवतार ३’ पाहून जेम्स कॅमेरॉन यांच्याशी व्हर्च्युअल संवादही साधला. यावेळी ते म्हणाले की, “१४५ कोटी भारतीयांमध्ये हा चित्रपट पाहणारा मी पहिला व्यक्ती ठरलो, याचा मला अभिमान वाटतो. हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. जेव्हा मी ‘फायर अँड ॲश’ पाहिला, तेव्हा मला पुन्हा एकदा थिएटरमध्ये बसलेल्या लहान मुलासारखं वाटलं. डोळ्यांचे पारणे फेडणारे व्हिज्युअल्स पाहून मी भारावून गेलो आहे”. (Ss Raja Mouli and Avatar 3 review)

अवतार ३ मधील राजामौलींचं फेव्हरेट पात्र जेक सुली असून याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ” मी थिएटरमधून बाहेर आलो होतो, पण चित्रपट माझ्या डोक्यातून जात नव्हता. पहिल्या अवतारातील जेक सुलीची मूल्ये जितकी मजबूत होती, त्यापेक्षाही अधिक प्रगल्भ आणि वेदनादायी प्रवास या तिसऱ्या भागात पाहायला मिळाला”. (Entertainment news)
पुढे ते असं देखील म्हणाले की, “या चित्रपटात दोन सुंदर संघर्ष दाखवले आहेत. पहिला माइल्स आणि जेक यांच्यातला आणि दुसरा नेत्री आणि वरांग यांच्यातला. पहिल्या अवतारमध्ये मला माइल्स अजिबात आवडला नव्हता, पण ‘अवतार: फायर अँड ऍश’ मध्ये मी त्याचा तिरस्कार करायचा प्रयत्न करतोय, पण ते जमत नाही. माइल्स आणि जेक यांच्यातील संवाद अतिशय संवेदनशीलतेने लिहिलेले असून, त्यात खूप वेदना लपलेल्या आहेत”.
================================
हे देखील वाचा : Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”
================================
‘अवतार’ चित्रपटाच्या फ्रेंचायझीबद्दल बोलायचं झालं तर या दोन्ही भागांनी जगभरात बक्कळ कमाई केली असून सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट असा शिक्का ‘अवतार’ आणि ‘अवतार २’ वर लागला आहे… ‘अवतार’ २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि दुसरा भाग ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि आता तिसरा भाग १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Avatar movie franchise)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi