‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         दिग्दर्शक एस.एस.राजामौलींच्या Bahubali Franchiseच्या अद्भूत गोष्टी!
“कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?”, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ८ वर्ष झाली मिळालं आहे… पण तरीही या चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी झाली नाही आहे… एस.एस.राजामौली यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कनक्ल्युजन’ या तेलुगु भाषेतील चित्रपटांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात बरेच रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले… बाहुबली २ देशात १००० कोटींचा आणि जगात १५०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता… आता लवकरच राजामौली या दोन्ही भागांचा मिळून एक भव्य चित्रपट अर्थात Bahubali : The Epic प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत… बरं पुन्हा एकदा दोन भागांचं एकत्रिकरण करुन त्याचा एकच भव्य चित्रपट रिलीज होणारा हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे…. जाणून घेऊयात बाहुबली फ्रेंचायझीबद्दल असेच काही Unknown Facts….

कुठलाही भव्य चित्रपट निर्माण करायचा म्हणजे अफाट पैसा हवा… कारण, ‘बाहुबली’ सारखा लार्जर दॅन लाईफ चित्रपट तयार करायचा म्हटलं की भव्य सेट्स, इतर टॅक्निकल गोष्टी अशा सगळ्याचसाठी तगडं बजेट असावं लागलं… पण बाहुबली द बिगनिंग या २०१५ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचं बजेट होतं १८० कोटी आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा पार केला होता…

तर, ‘बाहुबली २’ चं बजेट होतं २५० आणि या चित्रपटाने भारतात १०३० कोटींच्या पुढे कमाई केली होती… इतकंच नाही तर बाहुबली २ चित्रपटाची तिकीटं १०० कोटींच्या घरात विकली गेली होती आणि आधी हा रेकॉर्ड १९७५ मध्ये रिलीज झालेल्या शोले चित्रपटाच्या नावावर होता… केवळ बॉक्स ऑफिस पुरताच बाहुबली चित्रपटाचा रेकॉर्ड नसून सर्वात बाहुबली द बिगनिंग या चित्रपटाचं कोचीमध्ये जवळपास ५१ हजार स्क्वेअर फीट उंच पोस्टर उभारण्यात आलं होतं आणि याचा वर्ल्ड़ रेकॉर्डही नोंदवण्यात आला आहे… (Bahubali Movie Unknown Facts)
आधी जाणून घेऊयात बाहुबली द बिगनिंग चित्रपटाच्या खास गोष्टी…
‘बाहुबली : द बिगनिंग’ हा चित्रपट एकूण ४००० स्क्रिन्समध्ये रिलीज झाला होता ज्यात १३५ स्क्रिन या अमेरिकेत होत्या… इतकंच नाही तर मुळ तमिळ आणि तेलुगु भाषेत असणाऱ्या या चित्रपटाचं इंग्रजी, फ्रेंच आणि जॅपनिज भाषेतही डबिंग करण्यात आलं आहे… बाहुबली हा चित्रपट आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या प्रभास आणि राणा दग्गुबत्ती यांनी आपापल्या भूमिकांसाठी जवळपास १०० किलो वजन वाढवलं होतं… फक्त प्रभासच्याच बॉडी बिल्डिंगच्या इक्व्पमेंट्ससाठी १.५ कोटी खर्च करण्यात आले होते…

तर, या चित्रपटातील वॉर आणि अॅक्शन सीक्वेन्ससाठी विएतनाम येथून ट्रेनर्स बोलावण्यात आले होते… आता राजामौली म्हटलं की चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही अलौकिकच असते… या चित्रपटासाठी २६ VFX स्टुडिओ आणि ६०० ग्राफिक आर्टिस्ट निवडण्यात आले होते… ४५०० VFX शोट्स घेतलेल्या या चित्रपटासाठी जवळपास ८५ कोटी केवळ व्हिजुअल इफेक्ट्सवर खर्च करण्यात आले होते… या फ्रेंचायझीसाठी Jurassic World या चित्रपटाच्या ग्राफिक्स टीमची देखील मदत घेण्यात आली होती… (Bahubali movie news)
आता वळूयात बाहुबली द कन्क्लुजन चित्रपटाच्या खास गोष्टींकडे…
‘बाहुबली द कन्क्लुजन’ या चित्रपटाने २०१६ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या दंगल चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून काढला होता… जगभरात १००० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाच्या फक्त क्लायमॅक्स सीनसाठी ३० कोटींचा खर्च करण्यात आला होता… तर, बाहुबली ही भूमिका अजरामर करणाऱ्या प्रभासने ५ वर्ष दुसरा कुठलाही प्रोजेक्ट साईन केला नव्हता… तसेच, बाहुबली द कन्क्लुजन हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचा प्रिमियर Royal Albert Hall, UK मध्ये झाला होता…

तर, या चित्रपटातील किलीकिली ही भाषा Kalakeya Warriors साठी खास तयार करण्यात आली होती… भारतीय चित्रपटासाठी Fictional भाषा तयार करणारा बाहुबली द कन्क्लुजन हा पहिला चित्रपट ठरला होता… आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भल्लाळदेव या भूमिकेसाठी राजामौलींची पहिली पसंती राणा दग्गुबत्ती नाही तर अमेरिकन अॅक्टर Jason Momosa हा होता… बाहुबली द कन्क्लुजन या चित्रपटातील प्रत्येक सीन हा लक्षवेधी आहेच.. पण यात भल्लाळदेवची भव्य मुर्ती ही ग्राफिकली नाही तर खरोखरीच उभारण्यात आली होती जिचं वजन ८००० किलो होतं आणि उंची १२५ फुट इतकी होती… (SS Rajamouli)
================================
================================
‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांच्या रेकॉर्ड्सबद्दल बोलावं तितकं कमीच आहे… आता आपल्याच दोन भागांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी राजामौली ‘बाहुबली : द एपिक’ हा चित्रपट घेऊन येत असून जगभरात हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… या चित्रपटाने रिलीजपूर्वीच ३ कोटींपेक्षा अधिक तिकिटांची विक्री करत रेकॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे… आता Babhubali : The Epicआणखी कोणते सरप्राईज देणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
