दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शम्मी कपूरला ‘किस’ करण्याचे नर्गीसने केले होते ‘प्रॉमिस’ पण….
अभिनेता शम्मी कपूर (Shammi Kapoor) त्याच्या रोमँटिक इमेजमुळे आजही तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याची स्टाईल, त्याचा हेअर कट, त्याचा किलिंग लूक आणि त्याची गाणी यावर रसिक जाम फिदा होती. हॉलिवूडच्या ‘एल्विस प्रिस्ले’ यांच्या अभिनयाचा त्याच्यावर खूप प्रभाव होता.
हा किस्सा शम्मी कपूर चित्रपटात येण्यापूर्वीचा आहे. ज्यावेळी राज कपूर यांच्या ‘बरसात’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. त्याच वेळी राजकपूर आणि नर्गिस यांच्यात प्रेमालाप सुरु झाली होता. नर्गिस राज कपूरवर मनापासून प्रेम करत होती. राजसोबत लग्न करायची तिची इच्छा होती. परंतु राज कपूर विवाहित होते.
राज कपूर हा सदैव चित्रपटाचा विचार करणारा कलावंत होता. एक चित्रपट सेटवर असताना तो पुढच्या चित्रपटाचा विचार करत असायचा. ‘बरसात’ चित्रपटाच्या सेटवर असतानाच त्याच्या डोक्यात त्याच्या आगामी ‘आवारा’ या चित्रपटाची जुळवाजुळव चालू होती. बऱ्याचदा तो नर्गिस सोबत या विषयावर बोलत असे.
नर्गिसला या चित्रपटात काम करण्याची मनोमन इच्छा होती. परंतु त्याचवेळी नर्गिसच्या घरातील व्यक्तींना राज कपूरकडे तिचा वाढणारा ओढा पसंत नव्हता. एकतर राज कपूर त्यांच्या धर्माचा नव्हता आणि दुसरी गोष्ट तो विवाहित होता. त्यामुळे नर्गिसच्या घरवाल्यांना राज कपूर सोबतची तिची मैत्री अजिबात पसंत नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला यापुढे राज सोबत काम करू नकोस असा आदेशच दिला होता. पण नर्गिसला मात्र काही करून राज कपूर सोबत काम करायचे होते. तिला मनोमन राज आवडला होता. यासाठी तिने घरच्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण ‘जालीम’ घरवाले त्यांच्या भूमिकेवर ठाम होते!
याच काळात शाळकरी शम्मी कपूरचे ‘बरसात’ च्या सेटवर जाणे होत असे. नर्गिस त्याच्याशी खूप आपलेपणाने बोलायची. आपल्या छोट्या मित्रासोबत ती तासन् तास गप्पा मारायची. एकदा ती खूप उदास होती. खिन्नपणे बसली होती. त्यावेळी शम्मी तिथे पोहोचला. शम्मीने तिच्या नाराजीचे कारण विचारल्यावर तिने सांगितले, “मला राज कपूर यांच्या आगामी ‘आवारा’ या चित्रपटात काम करायचे आहे. परंतु माझ्या घरातील लोक मला राज सोबत काम करायला नकार देत आहेत.. ” (Interesting Story of Shammi Kapoor and Nargis)
शाळकरी शम्मी कपूर तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाला, “काळजी करू नकोस. तुझे घरचे लोक नक्की तुझ्या विचारांना पाठिंबा देतील आणि तुला आवारा या चित्रपटात काम करण्याची परवानगी देतील..” लहानग्या शम्मीचे ते आश्वासक बोल ऐकून नर्गिस मनोमन खूष झाली ती म्हणाली, “तसेच जर झाले तर मी तुला एक ‘किस’ देईन..” शाळकरी शम्मी ते नर्गिसचे बोल ऐकून मनोमन लाजला आणि लगेच निघून गेला.
बरसात प्रदर्शित २२ एप्रिल १९४९ ला प्रदर्शित झाला आणि हिट झाला. राजकपूर नर्गिस या जोडीला रसिकांनी स्वीकारले. नर्गिसचा सिनेमाच्या दुनियेतील भाव वाढला. पुढे तिच्या घरच्यांनी तिला ‘आवारा’ या चित्रपटात काम करायला परवानगी दिली. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू झाले. आता शम्मी कपूर देखील मोठा झाला होता कॉलेजला जाऊ लागला होता. त्याच वेळेला तो त्याच्या वडिलांच्या ‘पृथ्वी’ थिएटर सोबत काही नाटकातून कामे देखील करू लागला होता. एकदा ‘आवारा’ या चित्रपटाच्या सेटवर शम्मी कपूर जाऊन पोहोचला.
तिथे बऱ्याच वर्षांनी त्याची भेट नर्गीस सोबत झाली. त्याला त्यावेळेला नर्गिसने प्रॉमिस केलेल्या ‘किस’ ची आठवण झाली. त्याने त्या भेटीत नर्गिसला विचारले, “तुम्हाला तुम्ही दिलेल्या एका गोष्टीची आठवण आहे का?” त्यावर नर्गिसला शम्मीला किस करण्याच्या प्रॉमिसची आठवण झाली. ती म्हणाली, “हो तर आठवण आहे.” (Interesting Story of Shammi Kapoor and Nargis)
मग शम्मी म्हणाला, “त्या कीस करण्याच्या प्रॉमिसचे काय?” यावर ती म्हणाली, “अरे त्यावेळी तू खूप लहान होतास. आता मी तुला किस कसं करणार? तू आता मोठा झाला आहेस. त्याऐवजी मी तुला दुसरं काहीतरी गिफ्ट देते. काय गिफ्ट देऊ तुला?” त्यावर शम्मी कपूर म्हणाला, “मला एक चांगला ग्रामोफोन गिफ्ट म्हणून दे.”
=========
हे देखील वाचा – भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण
=========
लगेच नर्गिस शम्मी कपूरला आपल्या गाडीतून घेऊन मार्केटमध्ये गेली आणि एक चांगला ग्रामोफोन आणि त्याला आवडणाऱ्या भरपूर रेकॉर्ड्स त्याला गिफ्ट म्हणून दिल्या. अशाप्रकारे शम्मी कपूरला नर्गिसचा किस तर मिळाला नाही, पण त्याच्या आवडता ग्रामोफोन मात्र त्याला मिळाला.