आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

“मी घरी स्टाफशी मराठीत बोलतो, पण भाषासक्तीवरुन मारहाण चुकीची”; Suneil Shetty ने मराठी भाषेच्या मुद्द्यावर व्यक्त केलं मत
राज्यात काही महिन्यांपूर्वी किंबहूना अजूनही मराठी भाषेचा वाद फारच चिघळला होता… मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही या मुद्द्यावरुन परप्रांतीय लोकं महाराष्ट्रामध्ये दादागिरी करतात किंवा काही वेळेस मराठी माणसं परप्रांतीयांवर मराठी भाषा शिकण्यावरून वाद घालतात ही प्रकरण फार सुरु होती… अशातच मराठी भाषा वादावर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली होती… काही कलाकारांनी परप्रांतीय असूनही मुंबईत राहात असल्यामुळे मराठी बोलता आलं पाहिजे असं देखील म्हटलं होतं… आता पुन्हा एकदा या विषयावर अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) याने त्याचं मत मांडलं असून “मराठी भाषेवरून राजकारण करणे आणि सक्तीने बोलायला लावण्यासाठी हिंसाचार करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. गरीब माणसाला मारहाण करून काही साध्य होणार नाही”, असं म्हटलं आहे… नेमकं काय म्हणाला सुनील शेट्टी जाणून घेऊयात…
तर, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुनील म्हणाला की, “मी स्वतः मुंबईकर आहे. या शहराने मला नाव, यश प्रतिष्ठा सगळं काही दिलं. म्हणूनच मी नेहमी मनापासून सांगतो की मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोलणं आणि शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जिथे राहतो तिथल्या भाषेत बोललो की त्या ठिकाणच्या लोकांचे आपल्याला प्रेम आणि आदर दहापटीने मिळते.” (Entertainement News)

पुढे तो म्हणाला की, “मी घरी माझ्या स्टाफशी नेहमीच मराठीत बोलतो पण हेही तितकंच खरं आहे की माझ्या भाषा शिकण्यासाठी किंवा ती भाषा बोलायला लावण्यासाठी कोणावरही जबरदस्ती झाली नाही पाहिजे. आपल्या स्वतःच्या लेकराला जबरदस्तीने काही शिकवता येत नाही मग दुसऱ्याला का तसे करायला भाग पाडायचे?”… (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Suneil Shetty : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….
================================
दरम्यान, सुनील शेट्टी याच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘केसरी वीर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याव्यतिरिक्त ‘वेलकम टू द जंगल’, ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमध्येही त्याचा विनोदी ठसका प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे… (Suneil Shetty Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi